Medi Assist Healthcare IPO Day 1: आयपीओ पहिल्या दिवशी 54% सबस्क्राईब झाला

Rate this post

Medi Assist Healthcare IPO Day 1: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 54% सबस्क्राईब झाला आहे.

रीटेल इन्वेस्टर कॅटेगरीमध्ये या आयपीओला सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 89% सबस्क्राईब झाला आहे.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ  45% सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ. जे २ लाखापेक्षा जास्त शेअर्ससाठी अप्लाय करतात.

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओला अजूनतरी काही प्रतिसाद दिला नाही. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ 0% सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)

Medi Assist Healthcare IPO Details 

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची प्राइज Rs 397-418 रुपये प्रति शेअर  फिक्स  करण्यात आली आहे. हा आयपीओ 15 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि 17 जानेवारी 2023  रोजी बंद होणार आहे.

इन्वेस्टर मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये टोटल 35 शेअर्स  घेऊ शकतात ज्याची टोटल किंमत ₹14,630 रुपये एवढी असेल.

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (offer for sale) असेल. ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे प्रोमोटर त्यांची हिस्सेदारी पब्लिकला विकत आहेत. या ऑफर फॉर सेलमध्ये टोटल 2.8 करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये पब्लिकला विकले जातील.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Medi Assist Healthcare IPO: आज आयपीओ चालू होणार (अप्लाय करण्याआधी हे वाचा) 

2 thoughts on “Medi Assist Healthcare IPO Day 1: आयपीओ पहिल्या दिवशी 54% सबस्क्राईब झाला”

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi