Epack Durable IPO: ग्रे मार्केट प्रीमियम किती आहे? प्रॉफिट होणार की लॉस?

Rate this post

EPACK Durable IPO GMP (Grey Market Premium): बाजार निरीक्षकांनुसार, इपॅक ड्यूरेबल आयपीओ ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आज ₹31 आहे. 23 जानेवारीला GMP ₹35 रुपये होती. GMP ₹5 रुपायांनी कमी झाली आहे.

या IPO ची इश्यू किंमत 230 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 261 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ  13% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.

29  जानेवारी 2024 ला या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 230
Grey Market Premium 31
Listing Price (IPO + Premium) 261
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Epack Durable IPO Subscription Status

इपॅक ड्यूरेबल आयपीओचा बिड्डिंगसाठी 3 दिवस शेअर मार्केटमध्ये चालू होता. आणि या 3 दिवसात इपॅक ड्यूरेबल आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 15.72  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी  चांगला प्रतिसाद मिळाला  आहे. या कॅटेगरीमध्ये इपॅक ड्यूरेबल आयपीओ 5.94 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये पहिल्या 2 दिवसाप्रमाणेच उत्तम प्रतिसादासोबत शेवटच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला असून हा आयपीओ 27.68 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.

QIB (Qualified Institutional Buyers) नी पहिल्या दोन दिवसात आयपीओसाठी एवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. पण शेवटच्या दिवशी या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ फक्त 24.12  सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

EPACK Durable IPO Details 

इपॅक ड्यूरेबल आयपीओ 19 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये बिड्डिंगसाठी चालू होणार आहे आणि 23 जानेवारी 2024 रोजी बंद होईल. इपॅक ड्यूरेबल आयपीओची इश्यू साइज ₹640 करोड रुपये आहे. आयपीओचा प्राईस बॅंड ₹218 – ₹230 रुपये प्रति शेअर निश्चित केला आहे.

या आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 65 शेअर घेऊ शकता ज्याची किंमत ₹14,950 एवढी होते. इपॅक ड्यूरेबल आईपीओची अलॉटमेंट तारीख 24 जानेवारी 2024 असेल आणि आयपीओची लिस्टिंग 29 जानेवारी 2024 ही ठरविण्यात आली आहे.

EPACK Durable IPO Allotment & Listing Dates

Anchor Investors Allotment: January 18, 2024
IPO Open Date: January 19, 2024
IPO Close Date: January 24, 2024
Basis of Allotment: January 24, 2024
Refunds: January 25, 2024
Credit to Demat Account: January 25, 2024
IPO Listing Date: January 29, 2024

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Groww App Down: ग्रो ॲपवर US स्टॉक्स खरेदी करू नका (marathifinance.net)

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi