BLS E-Services IPO subscription status: बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर 15.67 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
रिटेल कॅटेगरीमधून या आयपीओसाठी सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये बीएलएस-ई सर्विसेस आयपीओ 49.40 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.
तसेच NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये आयपीओ 29.70 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक, NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.
QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओसाठी एवढा चांगला प्रतिसाद दिला नाही. या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ फक्त 2.19 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
BLS-E Services Company Details
बीएलएस-ई सर्विसेस आयपीओची सुरुवात 30 जानेवारी 2024 रोजी होणार आहे आणि हा आयपीओ 1 फेब्रुवारी रोजी बंद होणार आहे. बीएलएस-ई सर्विसेस आयपीओची इश्यू साइज ₹310.91 करोड एवढी आहे.
या आयपीओचा प्राइज बॅन्ड ₹129 ते ₹135 रुपये प्रति शेअर ठरविण्यात आला आहे. आयपीओसाठी अप्लाय करताना तुम्ही एका लॉटमध्ये कमीत कमी 108 शेअर्ससाठी अप्लाय करू शकता ज्याची किंमत ₹14,580 रुपये एवढी असेल.
बीएलएस-ई सर्विसेज लिमिटेड एक टेक्नॉलजीचा वापर करून डिजिटल सर्विस देणारी कंपनी आहे. डिजिटल सर्विसेस जस की 1) भारताच्या मोठ मोठ्या बँकना बिझनेस Correspondent च्या सर्विसेस देणे 2) Assisted E-services म्हणजेच PAN कार्ड, लाइट बिल भरणे, ट्रेन तिकीट काढणे, मनी ट्रान्सफर इ. 3) देशभरात E-Governance Services पुरविण्यास मदत करणे जस की आयुषमान भारत आणि अशा बऱ्याच सुविधा.
BLS-E Services IPO Allotment & Listing Dates
Anchor Investors Allotment: | January 29, 2024 |
IPO Open Date: | January 30, 2024 |
IPO Close Date: | February 1, 2024 |
Basis of Allotment: | February 2, 2024 |
Refunds: | February 5, 2024 |
Credit to Demat Account: | February 5, 2024 |
IPO Listing Date: | February 6, 2024 |