Best Health Insurance Policy कशी निवडाल?

अचानक येणाऱ्या मेडिकल एमर्जन्सिसाठी Health Insurance पॉलिसी असणे गरजेच आहे. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी एक चांगला Health Insurance Plan घ्यायला जाल तेव्हा मार्केटमध्ये तुमच्यासाठी असंख्य Insurance Plans मिळतील. पण ते बोलतात ना “अति तिथे माती” ते अगदी खर आहे. कारण खूप सारे ऑप्शन्स असल्यामुळे Confusion पण तेवढच जास्त होतं. त्यामुळे एक बेस्ट Health Insurance Plan कसा निवडायचा हे खूप कठीण होत.

त्यामूळे आपण आजच्या पोस्टमध्ये हेच समजून घेणार आहोत की एक योग्य Health Insurance Plan कसा निवडायचा. चला तर सुरुवात करूया! 

भारतामध्ये Health Insurance Plans उपलब्ध करून देणाऱ्या दोन टाइपच्या कंपन्या असतात. 

  1. Standalone Health Insurance Company
  2. General Insurance Company

Standalone Health Insurance Company Vs General Health Insurance Company – कोण बेटर आहे?

तुम्हाला कदाचित नावावरून थोडीफार आयडिया आली असेल की Standalone Health Insurance Company म्हणजे जी कंपनी फक्त आणि फक्त Health Insurance Plan देण्यावर फोकस करते. उदाहरणार्थ:- Aditya Birla Health Insurance, Star Health Insurance. याऊल General Health Insurance कंपनी अशी कंपनी जी Health Insurance सोबत इतर Insurance जसे की Car Insurance, Marine Insurance, Fire Insurance इत्यादी. उदाहरणार्थ:- Bajaj Allianz General Insurance, SBI General Insurance.

आता तुमच्यापैकी काहीना प्रश्न पडला असेल की याने काय फरक पडतो. मी एक कंपनी निवडेन जी मला Health Insurance देईल, मग माझ काम झालं. पण तस अजिबात करू नका कारण Standalone Health Insurance Company याचा अर्थ असा होत नाही की यांची सर्व्हिस एकदम बेस्ट असेल कारण ते फक्तं Health Insurance देण्यावर फोकस करत आहेत.

Health Insurance Policy काय आहे?

Health Insurance Policy हे एक प्रकारच कॉन्ट्रॅक्ट आहे जे तुमच्यामध्ये आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये केलं जात. या पॉलिसीसाठी तुम्हाला दर वर्षी, २ वर्षांनी किंवा 3 वर्षांनी एक रक्कम भरावी लागते. या Insurance Policy चे फायदे तुम्ही जेव्हा आजारी पडता किंवा एखादा अपघात होवून हॉस्पिटलमध्ये भरती होता. या Insurance Policy साठी तुम्ही एक ठराविक रक्कम Insurance Company ला देता त्याला Premium अस म्हणतात. आणि पैशाच्या रूपाने जी सुरक्षा Insurance Company तुम्हाला देते त्याला Cover किंवा Sum Insured असं म्हणतात.

किती रुपयांची Health Insurance Policy घेतली आहे?

हा प्रश्न सगळ्यांत आधी डोक्यात येतो जेव्हा तुम्ही Health Insurance काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करता. आणि हे काही गोष्टींवर अवलंबून आहे. अनेक फायनान्स एक्स्पर्ट सांगतात की तुम्ही 10-20 लाखांच Cover घेतलं पाहिजे. आता काहींना 10 लाख पण जरा जास्त वाटतील पण जरा विचार करा आजकाल हॉस्पिटलचे खर्च किती वाढलेत. जर तुम्ही फक्त 2-3 लाखांच Cover घेत आहात तर ते पुरेस नाही होणार. काहींना 2 लाख पण मोठी रक्कम वाटेल पण तुम्ही इथे मोठ्या आजारांच्या हिशोबाने विचार करा कारण आजार काय सांगून येत नाहीत. पण अशा वेळी तुझी तयार असायला हवं.

तुम्हाला जर मी आता विचार करायला सांगितल की एखादया आजारासाठी जास्तीत जास्त खर्च किती येऊ शकतो? काही आकडे तुमच्या समोर ठेवतो. कॅन्सर ट्रीटमेंटसाठी लागणारा Avarage खर्च 5 लाख आहे आणि जास्तीत जास्त 27 लाख+ जावू शकतो. अजून एक उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणजे Kindney संबंधीत आजार आणि त्यासाठी जवळ जवळ 7-8  लाख रुपये लागतं. (हॉस्पिटलनुसार यामध्ये थोडफार बदल असू शकतो? 

पण मुद्दा असा आहे की एखादा आजार म्हंटला की खर्च खूप होतो. कदाचित आता आपण अगदी तरुण आहोत, मला काही होणार नाही असाच विचार करत असतो. (आणि माझी हीच प्रार्थना आहे की तुम्हाला कोणाला कधीच काही नको होऊदेत) पण म्हणून आपण Health Insurance न घेणे योग्य नाही. त्यामुळे कमीत कमी 5 लाखचा Cover नक्की घ्या. हे अशा लोकांसाठी जे 10 लाखच Premium नाही परवडू शकत. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी 10 लाख – 20 लाखमध्ये Cover घेतलं पाहिजे. 

Health Insurance Policy कशी घ्यायची?

कोणतीही Health Insurance Policy घेण्याआधी तुम्हाला काही गोष्टींवर खर लक्ष द्यायचं आहे, त्या गोष्टींना नीट समजून घेऊत. 

  1. Claim Settlement Ratio – Claim Settlement Ratio म्हणजे, कंपनीकडे वर्षभरात जितके Claims येतात त्यापैकी किती Claims कंपनी पूर्ण करते. थोडक्यात काय तर किती लोकांना पैसे देते. हा Claim Settlement Ratio 90% च्या वर असेल तर अतिउत्तम. 
  2. हॉस्पिटल नेटवर्क – ज्या Health Insurance कंपनीची तुम्ही पॉलिसी घेणार त्यांचे देशभरातील विविध हॉस्पिटलसोबत Tie Up असल पाहिजे किंवा जास्तीत जास्त हॉस्पिटल त्यांच्या नेटवर्कमध्ये असले पाहिजेत. जेणेकरून तुम्ही आजारी कुठेही पडाल, गाव असो की शहर, तुम्ही अगदी आरामात तुमचा इलाज करू शकता.
  3. कंपनीचा ट्रॅक रेकॉर्ड – एखादी Health Insurance Company किती वर्षे या क्षेत्रात काम करत आहे आणि कसं काम करत आहे ते नक्की तपासा. एकदम नवीन कंपनी जी कमी खर्चात मोठं Cover देत असेल तरीही त्यापासून दूर रहा.
  4. खूप सारे प्रॉडक्ट ऑप्शन्स – Health Insurance कंपनीकडे विविध प्रकारचे Health Products जस की Maternity Benefits, Senior Citizen Plans, Cancer Cover इ.
  5. कस्टमर सर्व्हिस – हे सगळ्यांत महत्त्वाचं आहे कारण एकदा पॉलिसी घेतली की तुमच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये. या बाबतीत प्रायव्हेट कंपन्या जास्त चांगली सर्व्हिस देतात. 

Health Insurance Policy निवडण्यासाठी महत्वाची Checklist 

✅ No Room Restrictions: एका चांगल्या Health Insurance Policy मध्ये हॉस्पिटलमध्ये रूम निवडताना कोणत्याही प्रकारचं बंधन नसल पाहिजे. याच कारण अस की कधी कधी हॉस्पिटलमध्ये रूम उपलब्ध नसतात. अशा वेळी एक AC किंवा मोठी रूम घ्यावी लागते आणि जर तुमच्या पॉलिसीमध्ये रूम घेण्यावर बंधन असेल तर त्या रूमचे अधिक बिल तुम्हाला भराव लागेल. Health Insurance कंपनी सरळ नाही म्हणेल म्हणून अशी पॉलिसी निवडा ज्यामधे Room Restrictions नसत.

✅Co Payment Clause नको:  हे तर सगळ्यात भयंकर आहे. यामधे होत काय की हॉस्पिटलच जे काही बिल येईल ते अर्ध तुम्ही भरणार आणि अर्ध Health Insurance कंपनी. हे पॉलिसी घेताना ठरवलं जातं जर तुम्ही Co Payment Clause मान्य केलात. (यावर डिटेल पोस्ट लिहिली आहे ती वाचा – हेल्थ इन्शुरेंस Co-Payment म्हणजे काय?

✅ No Claim बोनस: समजा तुम्ही एका वर्षांसाठी 5 लाखाची पॉलिसी काढतील पण तुम्हाला काही झालंच नाही त्यामुळे ना हॉस्पिटल ना कसल बिल. पण तुम्ही वर्षभराच प्रीमियम मात्र पूर्ण भरलं आहे. अशा वेळी या वर्षी न घेतलेले Claim चा फायदा Health Insurance कंपनीने तुम्हाला दिला पाहिजे. अस कंपनी 2 प्रकारे करते पहिलं म्हणजे पुढच्या वर्षीच प्रीमियम कमी करते आणि दुसरं म्हणजे पॉलिसी Cover वाढवते. No Claim बोनस कमीत कमी 50% असावा.

✅ Pre-Existing Diseases साठी वेटींग पिरियड: Pre-Existing Desease म्हणजे पॉलिसी घेण्याआधी असलेले आजार. अशा वेळी Health Insurance कंपनी काय बोलते की आजारांचा खर्च आम्ही 3-4 वर्षांनी देऊ. यालाच वेटींग पिरियड म्हणतात. हे प्रत्येक कंपनीचं वेगळ असत. त्यामुळे हे जितकं कमी असेल तेवढं बर.

✅Pre आणि Post Hospitalization चे खर्च: Pre-Hospitalization खर्च म्हणजे हॉस्पिटलमध्ये भरती होण्याआधीचा खर्च. एका चांगल्या Health Insurance Policy मध्ये कमीत कमी 60 दिवसांचा Pre-Hospitalization चा खर्च मिळतो. आता Post Hospitalization खर्च म्हणजे तुम्ही आजारी होतात पण तुम्हाला हॉस्पिटलमधून घरी आणून काही उपचार केले जात आहेत. त्यासाठी छोटे मोठे खर्च होतात. तुम्ही जी पॉलिसी निवडाल त्यामध्ये कमीत कमी 90 दिवसांचा Post Hospitalization खर्च मिळायला हवा.

✅ Day Care Treatment ची सुविधा: असे काही आजार जिथे तुम्हाला जास्त नाही फक्त 24 तास किंवा त्या पेक्षा कमी वेळेसाठी हॉस्पिटलमध्ये admit व्हावं लागतं त्यालाच Day Care Treatment अस म्हणतात. तुम्ही Health Insurance Policy घेताना ही सुविधा आहे की नाही हे नक्की तपासा.

फ्री Health चेकअप: एका चांगल्या Health Insurance Policy मध्ये वर्षभरात फ्री Health चेकअपची सुविधा दिली पाहिजे. 

Conclusion 

एक बेस्ट Health Insurance Policy निवडणे खूप मेहनतीच काम आहे अस वाटत आहे. ही की नाही? पण जिथे प्रश्न आपल्या Health चां असतो तिथे आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे. आणि ही मेहनत एकदा घायची आहे त्यानंतर दर वर्षी किंवा 2 वर्षांनी तुम्ही पॉलिसी Renew करत असता. अजून खी doubts असतील तर नक्की कॉमेंट करा आणि या पोस्टला शेअर करा ज्यांना खरंच याची गरज आहे. भेटू आता पुढच्या पोस्टमध्ये. तो पर्यंत काळजी घ्या. 

Information Sources: -www.practo.com, economictimes.com, joinditto.in