Yes Bank Share Price: येस बँकचे शेअर आज सकाळच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7% ने वाढले आहेत.
येस बँकनुसार शेअर वाढण्याच कारण हे सांगितल की, एका ट्रस्टकडून बँक लोनचे पैसे रिटर्न मिळाले आहेत. येस बँकने तिचा लोन पोर्टफोलियो (NPA) JC Flowers Asset Reconstruction Private Limited या कंपनीला डिसेंबर 2022 मध्ये विकला होता. या कंपनीने या लोनची वसूली करून त्यापैकी 150 करोड रुपये येस बँकला परत मिळवून दिले आहेत.
NPA म्हणजे Non-Performing Asset. जेव्हा बँक कोणाला लोन देते आणि त्याचे पैसे त्यांना परत मिळत नाहीत तेव्हा त्या लोनला NPA अस म्हणतात.
येस बँक तसेच येस बँकच्या इन्वेस्टरसाठी ही न्यूज खरंच चांगली आहे. या न्यूजनंतर येस बँकचा शेअर 7% ने वाढून सोमवारी Rs 22.93 पोचला आहे. येस बँकचा मार्केट कॅप Rs 66,000 करोडवर पोचल आहे.
इतर पोस्ट वाचा👉 UPI New Rule: 1 जानेवारी 2024 पासून Gpay, PhonePe साठी नवीन नियम
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
4 thoughts on “Yes Bank चे शेअर्स 7% ने वाढले, मार्केट कॅप पोचल Rs 66,000 करोडवर”