सेक्टर फंड काय आहे? इनवेस्ट कराव की नाही? | Sector Fund in Marathi

शेअर मार्केटमध्ये पैसे Invest करण्याचे दोन मुख्य मार्ग आहेत. एक म्हणजे स्वतः शेअर्स निवडा आणि विकत घ्या. आणि दुसरा मार्ग म्हणजे Mutual Funds. (अजून पण मार्ग आहेत पण हे मुख्य मार्ग आहेत)

Mutual Funds मध्ये पैसे Invest करताना लॉस होवू नये म्हणून आपण प्रत्येक जण पैसे एका Mutual Fund मध्ये न ठेवता विविध Funds मध्ये Invest करतो. Diversify करणे म्हणजे थोडे पैसे Equity, थोडे पैसे Debt किंवा रिअल इस्टेट, गोल्ड इ. मध्ये Invest करणे.

Diversify करण्याचा अजून एक प्रसिद्ध मार्ग म्हणजे विविध Sectors मध्ये Invest करणे. मार्केटमध्ये खूप सारे Sectors आहेत आणि त्या Sectors वर आधारित खूप सारे Mutual Funds तुम्हाला बघायला मिळतील.

आज आपण त्यापैकी Sector Fund बद्दल अगदी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया!

Sector Funds काय आहेत?

तुम्हाला नाव वाचून अंदाज आला असेलच. पण तरीही सांगतो, Sector Funds म्हणजे असे Funds जे ठराविक सेक्टरमध्ये पैसे Invest करतात. Sector Funds इतर फंड्सपासून वेगळे आहेत कारण त्यांना एकाच प्रकारच्या सेक्टरमध्ये Invest करण्यासाठी बनविले जात. मुख्य उद्देश मार्केटमध्ये अनेक Sectors आहेत त्यापैकी काही महत्त्वाचे Sectors पुढीप्रमाणे:

  • Agriculture 
  • Aviation 
  • Automobiles 
  • बँक्स आणि फिनान्सियल सेक्टर 
  • इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक 
  • FMCG (Fast Moving Consumer Goods) 
  • गॅस आणि पेट्रोलियम 
  • इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 
  • Infrastructure 
  • फार्मा 
  • टेलिकॉम 
  • टुरिझम

Sector Funds ची खास वैशिष्ट्ये 

1) एका ठराविक सेक्टरवर फोकस

जस या फंडच नाव आहे अगदी नावाप्रमाणे Sector Funds फक्त आणि फक्त एका सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सवर फोकस करतात जस की टेक्नॉलॉजी, बँकिंग, फार्मा इ. त्यांचा पूर्ण फोकस फक्त एकाच सेक्टरमध्ये पैसे इनवेस्ट करून त्यातून जास्तीत जास्त रिटर्न मिळवणे हा असतो. 

2) ठराविक Industry मधील एक्स्पर्ट

Sector Funds चा फंड मॅनेजर हा एका ठराविक सेक्टरमधील एक्स्पर्ट असतो आणि त्यामुळे तो फक्त त्या सेक्टरमधील कंपन्यांवर पैसे Invest करत असतो. बाकी सेक्टरमध्ये काय चालल आहे यावर सहसा ते लक्ष देत नाहीत. 

3) कमी Diversification

आपण बाकीचे Funds जर पाहिले तर ते एका पेक्षा जास्त सेक्टर्समध्ये पैसे Invest करतात त्यामूळे पैसे चांगल्या रित्या Diversify होतात आणि रिस्क कमी होते पण Sector Funds मध्ये याच्या अगदी उलट केलं जात. इथे फक्त एकाच सेक्टरमधील विविध स्टॉक्समध्ये इनवेस्ट केल जात. 

4) फंडचा परफॉर्मन्स सेक्टरवर अवलंबून असत

समजा एखादा फंड आहे जो IT सेक्टरमधील कंपन्यांवर पैसे Invest करत आहे. जर IT सेक्टरमध्ये चांगली वाढ झाली तरच तो फंड चांगले रिटर्न देऊ शकतो. जस 2000 सालच्यानंतर आयटी सेक्टरमध्ये मोठी वाढ झाली कारण इंटरनेटचा जमाना येत होता. अशा वेळी तुम्ही आयटी सेक्टमध्ये पैसे इनवेस्ट केले असते तर जबरदस्त रिटर्न नक्कीच कमविले असते. 

5) इतर सेक्टरकडे दुर्लक्ष

Sector Funds मधील पैसा इतर सेक्टर्समध्ये Invest केला जात नाही. भलेही इतर सेक्टर कितीही चांगली कामगिरी करत असतील. जस 2022 मध्ये करोना महामारी आली तेव्हा फार्मा सेक्टरमधील स्टॉक मोट्या प्रमाणात वाढत होते पण आयटी सेक्टर फंडने यामध्ये काही पैसे इनवेस्ट केले नसणार त्यामुळे चांगले रिटर्न कमविण्याची संधी गेली. 

Sector Funds चे फायदे काय आहेत? 

1) एका सेक्टरवर टार्गेट

सगळ्यात मोठा फायदा हाच आहे आहे (आणि नुकसान पण) की Sector Funds एका ठराविक सेक्टरमध्ये पैसै Invest करायची संधी देतात. जर तुम्हाला ठामपणे वाटत आहे की एखादा सेक्टर भविष्यात मोठ्या प्रमाणत वाढणार आहे तर त्याचा फायदा तुम्ही नक्कीचं घेऊ शकता कारण जर तो सेक्टर चालला तर खूप जबरदस्त रिटर्न तुम्ही कमवू शकता. 

2) एक्स्पर्ट मॅनेजमेंट

जस आपण आधी चर्चा केली की Sector Funds चे फंड मॅनेजर हा ज्या सेक्टरवर आधारित तो फंड आहे, त्याचा एक्स्पर्ट असतो. एका ठराविक सेक्टरमध्ये काय होत आहे हे समजून तो कंपन्या निवडत असतो जेणेकरून Investors ना जास्तीत जास्त फायदा देता येईल. 

3) सजह पैसै काढता येतात

इतर Funds प्रमाणेच Sector Funds देखील सहज खरेदी करतात येतात किंवा त्यामध्ये SIP करता येते. आणि गरज लागली तर पैसे आरामात काढता येतात. पण तुम्ही पैसे कसे आणि कुठून इनवेस्ट केले आहेत हे बघणे गरजेच आहे. (जर तुम्ही ऑनलाईन Apps जस की Groww, Zerodha Coin इ वापरत असाल तर पैसे 2-3 दिवसात काढता येतील पण जर तुम्ही ऑफलाइन एखाद्या बँक किंवा एजेंटकडून पैसे इनवेस्ट केले असतील तर त्यात वेळ लागतो) 

Sector Funds चे तोटे काय आहेत? 

1) Diversification नाहीच

सगळे पैसे एकाच पाकीटमध्ये ठेवले आणि समजा तेच चोरीला गेल तर काय होईल? अगदी तसच सेक्टर फंडमध्ये होत. जेव्हा तुम्ही या फंडमध्ये पैसे इनवेस्ट करता ते त्या ठराविक  सेक्टरमध्ये Invest केले जातात त्यामुळे पैसे Diversify होत नाहीत. 

2) प्रचंड रिस्क असते 

आपल्याला सगळ्यांना चांगलंच माहित आहे की शेअर मार्केट किती रिस्की असत. आणि त्यामध्ये फक्त एकाच सेक्टरमध्ये पैसे लावणे अजूनच रिस्क. सेक्टर फंड या बाबतीत खूपच risky असतात. 

3) Timing महत्वाची असते

प्रत्येक वेळी एक सेक्टर चांगले रिटर्न देईल अस होत नाही. समजा काही वर्ष Technology कंपन्या अगदी चांगले रिटर्न देत असतील तर काही वर्ष फार्मा सेक्टरमधील कंपन्या रिटर्न देतील (जे कोरोना टाईममध्ये झालं, सगळ्या फार्मा कंपन्यांचे शेअर्स अगदी सुसाट वाढत होते पण आता पुन्हा त्या सेक्टरमध्ये घसरण झाली असून जस आधी वाढत होत अगदी त्याच स्पीडने वाढत आहे)

4) Management मोठी फी घेते 

इतर Funds सारखी Sector Funds मध्ये एक फी घेतली जाते ज्याला Expense Ratio अस म्हणतात. आणि काही वेळा ही फी खूपच जास्त असते. कोणताही फंड घेताना सगळ्यात आधी expense ratio तपासा. 

Sector Funds मध्ये कोणी Invest केलं पाहिजे? 

  • जर तुम्ही एक नवीन Investor आहात तर तुम्ही यापासून ४-५-१० हाथ लांब राहील पाहिजे. 
  • Sector Funds मध्ये अशा लोकांनी Invest करावं जे शेअर मार्केटमध्ये खूप टाईमपासून आहेत. आणि त्यांना शेअर मार्केटच्या चढ उताराची सवय झाली आहे.
  • जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल ज्यांना एखादया ठराविक सेक्टरवर खूप विश्र्वास आहे की हा सेक्टर पक्का वाढणार तर त्या सेक्टरमधील Funds मध्ये तुम्ही Invest केलं पाहिजे.
  • जर तुम्ही एक लाँग टर्म Investor आहात आणि पुढील 7-10 वर्षांसाठी तुम्ही एखादा फंड निवडत आहात तर सेक्टर फंडमध्ये पैसे Invest करा.
  • जर तुम्हाला जबरदस्त रिटर्न हवे आहेत पण त्यासाठी तुम्ही खूप सारी रिस्क घ्यायला तयार आहात तरच Sector Funds मध्ये पैसै Invest करा.
  • जर तुम्ही आधीपासून इतर Funds घेतले आहेत जस की इंडेक्स फंड, फ्लेक्सी कॅप फंड किंवा इतर. आणि तुमच्याकडे अजून काही पैसे आहेत जे तुम्हाला Invest करायचे असतील तर Sector Funds निवडा.

Sector Funds वरील काही Intresting डेटा

जेव्हा ही मी पोस्ट लिहायला घेतली तेव्हा ट्विटरवर ET Money ने लिहिलेला एक थ्रेड वाचला जो सेक्टर फंडबद्दल होता. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेऊ. ET Money ने 2013 पासून काही टॉप सेक्टरच्या रिटर्न्सना Nifty 50 च्या रिटर्नसोबत Compare केलं तर पुढील गोष्टी समजल्या. 

2018 मध्ये टॉपवर आयटी हे सेक्टर होत. त्यावेळी आयटी सेक्टरने 19.7% एवढा रिटर्न दिला होता. आणि पुढील 3 वर्षात आयटी सेक्टरने 42.7% एवढा रिटर्न दिला. आणि त्यावेळी Nifty50 चा रिटर्न 18.1% होता. (सेक्टर फंडमध्ये सगळा टायमिंगचा खेळ आह, ज्याने योग्य वेळी पैसे Invest केले त्याला भरभरून रिटर्न मिळतो)

2019 मध्ये टॉप सेक्टर आयटी नव्हत. त्यावेळी आयटी सेक्टरमधून कमी रिटर्न आले असणार. 2019 मध्ये टॉप सेक्टर बँकिंग आणि Financial Services हे होत. त्यावेळी या सेक्टरने 19.7% एवढा रिटर्न दिला पण पुढील 3 वर्षांत मात्र 10.7% 

2020 मध्ये टॉप सेक्टर होत फार्मा आणि हेल्थ केअर. याच कारण आपल्याला चांगलच माहीत आहे ते म्हणजे कारोना. त्यावेळी फार्मा सेक्टरने 68.3% एवढा रिटर्न दिला पण पुढील 3 वर्षात मात्र फक्त 12.2%. या तुलनेत Nifty50 ने 14.4% एवढा रिटर्न दिला आहे. 

या 3 वर्षांच्या माहितीला जर आपण लक्ष देऊन पाहिलं तर एक गोष्ट लक्षात येते की, कोणतंच सेक्टर दर वर्षी टॉपवर राहत नाही. कधी हे सेक्टर टॉपवर आहे ते कधी ते. आणि सेक्टर फंडमधून उत्तम रिटर्न घेण्यासाठी तुम्हाला योग्य वेळी एन्ट्री आणि योग्य वेळी बाहेर पडावं लागेल.

 

Sector Funds मध्ये पैसे Invest करण्याआधी पुढील गोष्टी लक्षात घ्या.

  • Sector Funds मध्ये पैसे Invest करण्याआधी तुम्ही इतर प्रकारच्या funds मध्ये पैसे Invest करून एक चांगला पोर्टफोलिओ बनवा. Sector Funds मध्ये Invest करताना तुम्ही सगळे पैसे एकाच ठिकाणी Invest करणार आहात हे खूप Risky आहे. तुमचा टोटल पोर्टफोलिओ त्यातील 5-10% फक्त रक्कम Sector Funds मध्ये Invest करा. 
  • कोणत्याही Sector मध्ये पैसे Invest करण्याआधी त्याला नीट समजून घेणे आवश्यक आहे. मार्केटमधील विविध सेक्टर मार्केटमध्ये होणाऱ्या घडामोडीनुसार खूप परिमाण देत असतात. कधी एखाद सेक्टर वर जात तर कधी अचानक खाली येत. तुमची एन्ट्री आणि एक्झीट फार महत्वाचं आहे.
  • एखाद्या सेक्टरच फ्युचर काय आहे किंवा असेल.याचा अंदाज तुम्हाला घेतला आला पाहिजे.  आणि त्या सोबत एक ठाम विश्वास त्या सेक्टरवरील कंपन्यांवर असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही मार्केट पडल तरी टिकून राहू शकता.

या पोस्ट मधून आपण काय शिकलो?

Sector Funds हे सगळ्यांसाठी नाहीत. जर तुम्ही एक असे Investor आहात ज्याची रिस्क घेण्याची क्षमता जास्त आहे तरच तुम्ही यामध्ये Invest केलं पाहिजे. आणि कोणता सेक्टर कडी नंबर 1 असेल आणि लगेच काही वर्षानी मागे येईल हे काही सांगता येतं नाही. इतर Mutual Funds च्या तुलनेत हे जास्त Risky असल्याने कमी रिस्क घेणाऱ्या Investor ने यापासून दूर राहावं. 


Information Sources - ETMoney

3 thoughts on “सेक्टर फंड काय आहे? इनवेस्ट कराव की नाही? | Sector Fund in Marathi”

Leave a Comment