Innova Captab Share: इनोव्हा कॅपटॅबच्या आयपीओने शेअर मार्केटमध्ये एवढी खास एन्ट्री घेतली नाहीये जेवढी अपेक्षा या आयपीओपासून इन्वेस्टरकडून होती. इनोव्हा कॅपटॅब आयपीओचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 452 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत.
त्यासोबत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर या आयपीओचे शेअर्स 456 रुपये प्रति शेअरने लिस्ट झाले आहेत. याचा अर्थ असा की इन्वेस्टरना पहिल्याच दिवशी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर फक्त 1% चा प्रॉफिट झाला आहे.
इनोव्हा कॅपटॅब आयपीओ 21 डिसेंबर 2023 रोजी सुरू झाला होता आणि 26 डिसेंबर 2023 रोजी बंद झाला. आइनोव्हा कॅपटॅब आयपीओची इश्यू प्राइस 570 करोड रुपये होती. आणि या आयपीओची प्राईस बॅंड 426 रुपये ते 448 रुपये प्रति शेअर निश्चित केला होता.
इनोव्हा कॅपटॅब आईपीओची अलॉटमेंट तारीख 27 डिसेंबर 2023 ही ठरविण्यात आली होती. या आयपीओची लिस्टिंग BSE आणि NSE वर 29 डिसेंबर 2023 म्हणजेच आज झाली आहे.
Innova Captab Company Details
इनोव्हा कॅपटॅब ही एक फार्मास्यूटिकल कंपनी आहे जिची सुरवात 2005 मध्ये झाली होती. इनोव्हा कॅपटॅब कंपनी फार्मा सेक्टरमध्ये रिसर्च, डेवलपमेंट, मार्केटिंग, मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट इ. मध्ये पारंगत आहे. कंपनीकडे 600 पेक्षा जास्त प्रॉडक्ट उपलब्ध आहेत ज्यांना 5000 Distributors च्या मदतीने पूर्ण भारतभर पुरविले जात.
इनोव्हा कॅपटॅब कंपनी सध्या बड्डी, हिमाचल प्रदेशमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उपलब्ध आहे. आणि कंपनी लवकरच जम्मूमध्ये एक नवीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी उभे करायच्या तयारीत आहे. CRISIL च्या रीपोर्टनुसार इनोव्हा कॅपटॅब कंपनी टॅब्लेट आणि कॅप्सुल बनविण्याच्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेनुसार भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे.
इतर पोस्ट वाचा👉 ICICI Prudential Mutual Fund फेडरल बँकमध्ये 9.95% भागीदारी विकत घेणार (RBI ने दिली परवानगी)
शेअर करा टॅग करा 🚀
बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)