How to Become Rich: आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज)

How to Become Rich with Action, Behavior & Knowledge: पैसा हा आपल्या प्रत्येकाच्या लाइफचा एक आधार आहे. पण पैशाला योग्यरित्या मॅनेज करणे म्हणजे फक्त आकड्यांना समजून घेणे किंवा जी इन्वेस्टमेंट सध्या ट्रेंडमध्ये आहे त्यामध्ये पैसे इन्वेस्ट करणे अस होत नाही. तुमच्या पैशाला योग्यरित्या मॅनेज करण्यासाठी तुम्हाला 3 गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्या म्हणजे कृती, स्वभाव आणि नॉलेज (action, behavior, and knowledge)

आता या गोष्टी एवढ्या महत्वाच्या का आहेत? हे आपण अगदी डीटेलमध्ये आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

1) Action: वेल्थ बनविण्याच बियाण (इथूनच सुरवात होते) 

Action म्हणजे काय तर काम किंवा कृती. जेव्हा तुम्ही पैसे कमविण्यासाठी पहिल पाऊल उचलता ती असते एक प्रकारची Action. जॉबला लागणे असो, Freelancing करणे असो किंवा बिझनेस करणे असो. स्वताला मेहनत घेऊन काम करणे आणि त्यातून पैसे कमविणे ही पैसे बनविण्याची पहिली स्टेप झाली.

कारण  काही न करता काहीच होत नाही. म्हणून Action घ्यायला शिका. यूट्यूबवर विडियो पाहून तुम्ही एखाद स्किल शिकलात? तर त्याचा वापर लाइफमध्ये कसा करता येईल हे बघा. त्यातून इन्कम बनविता येईल का याचा विचार करा.

एखाद फायनॅन्स बूक वाचलत, त्यामध्ये काही नवीन गोष्टी शिकलात तर त्याचा फायदा तुमचे पैसे मॅनेज करताना कसा होईल ते बघा. जेव्हा तुम्ही Action Mindset बनविता तेव्हा तुम्ही लाइफमध्ये प्रगती करता. नाहीतर एका मागोमाग एक यूट्यूबवरील विडियो बघून तेवढ्या पुरत वाटत, अरे मला तर हे समजल पण काही दिवसांनी काही डोक्यात राहत नाही.

म्हणून जे काही शिकाल ऑनलाइन असो की ऑफलाइन त्यातून इन्कम कशी करता येईल याचा विचार करा. नेहमी लक्षात ठेवा की मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्या पावलाने सुरू होते. 

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Plan for Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्याचा सोपा मार्ग (जो तुम्हाला शक्य आहे)

2) Behavior: पैसे तर कमवाल पण ते जपायला शिका (ते कस ते समजून घेऊ) 

तुम्ही जॉब कराल किंवा बिझनेस. जशी तुमची इन्कम सुरू होईल खर्च करायच्या सवयींवर लक्ष द्यायच आहे. आणि इथे तुमचा स्वभाव खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. तुमचा पैशाविषयी असलेला स्वभाव म्हणजे तुमच्या सवयी जसे की बजेट बनविणे, खर्च ट्रॅक करणे, काटकसर करणे, नको त्या वस्तुसाठी कर्ज न घेणे इत्यादी. 

नेहमी लक्षात ठेवा की या सवयी काय एका दिवसात विकसित करता येत नाही त्यासाठी तुम्हाला जाणीवपूर्वक मेहनत घ्यायला लागेल. तुमच्या सेविंगला ऑटोमॅटिक करणे, खर्च ट्रॅक करणे, योग्य ते फिनान्शिअल गोल्स बनविणे इत्यादी सवयी तुमचं आर्थिक भविष्य चांगलं बनविण्यास मदत करतात.

नेहमी लक्षात ठेवा की फक्त एक दिवस खूप सारी मेहनत घेऊन काही होत नाही. अगदी तसंच एक दिवस खर्च ट्रॅक करून किंवा एक दिवस सेविंग करून काही होणार नाही. तुम्हाला नियमितपणे ही कामे करायची आहेत. त्यामुळे तुमचा स्वभाव (Behaviour) बदला लाइफ बदलायला वेळ लागणार नाही. 

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
3) Knowledge: याशिवाय तुम्ही या प्रवासात टिकून कस राहणार? (सतत शिकण्याची भूक हवी) 

नॉलेज तुमच्या आर्थिक प्रवासाला सामर्थ्य देत. पर्सनल फायनॅन्स असो की इतर Investing Strategies असो किंवा रिस्क मॅनेज करण्यासाठी लागणार बेसिक नॉलेजबद्दल शिकणे  तुम्हाला माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सुसज्ज करते. या ठिकाणी तुमच नॉलेज सूर्यासारखे काम करते, तुमच्या आर्थिक वाढीचा मार्ग प्रत्येक दिवशी प्रकाशित करत राहते. 

आर्थिक साक्षरता घ्या, पुस्तके वाचा, यूट्यूब आहे, पॉडकास्ट एका किंवा चांगले फायनॅन्स ब्लॉग वाचा. काही हव ते करा पण शिकत रहा. कॉलेज झाल म्हणजे शिक्षण झाल अस होत नाही. आणि तुम्हाला पण आता पर्यन्त समजल असेल की खर शिक्षण तर स्वताच्या अनुभवातून येत.

लक्षात ठेवा, नॉलेज हे एकदा घेतल आणि काम झाल अशी कन्सेप्ट नाहीये तर ही एक सतत चालणारी प्रोसेस आहे.  तुम्ही आर्थिक  परिस्थिती जसजशी विकसित होत जाते, तसतशी तुमची आर्थिक समजही विकसित व्हायला हवी.

या 3 गोष्टींचा ताळमेळ म्हणजे Financial Success 

खरी कमाल तर तेव्हा होते जेव्हा कृती, स्वभाव आणि नॉलेज या तिन्ही गोष्टींमध्ये अगदी योग्य ताळमेळ असतो. तुम्ही काम करता त्यातून पैसे कमविता. तुमचा स्वभाव योग्य असेल तर तो पैसा तुम्ही इन्वेस्ट करता आणि वाढवीता, आणि हे सगळ करताना तुमची हेल्प करत ते म्हणजे तुमच नॉलेज. (तिन्ही गोष्टी एकत्र काम करत आहेत)

पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. Keep Learning & Earning!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा | How to Become Rich in Marathi (marathifinance.net)

2 thoughts on “How to Become Rich: आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज)”

Leave a Comment