How to Become Rich in Marathi: आपल्या आजूबाजूला दुनिया अशी आहे ना की सगळे जण इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यास लागले आहेत. सतत एकमेकाला Judge करत आहेत. लोकांना काय वाटेल याचा विचार लोक पहिला करतात. अशा परिस्थितीत आर्थिक स्वातंत्र्य मिळवणे खूप कठीण होवून जाते. ते कस काय? चला यावर चर्चा करू.
जर तुम्ही पैसा कमविण्यावर जास्त फोकस केलात तर लोक तुम्हाला लालची बोलतील. तुम्ही पैसा काटकसर करून सेव करायचं ठरवलत तर लोक तुम्हाला कंजूस बोलतील. तुम्ही पैसे नीट इन्वेस्ट करायचे ठरवलेत तर लोक तुम्हाला खूपच रिस्क घेतोय असे बोलतील.
थोडक्यात काय तर, तुम्ही काहीही करा लोक तर बोलणारच. तुमचे स्वताचे आर्थिक ध्येय आणि तुमच्या आजूबाजूला असलेले लोक यामध्ये सतत चालणारी एक प्रकारची लढाई आहे. मग नक्की आता करायच काय?
तुम्ही पैसे कमविण्यावर फोकस करा
कारण पैसे कमविणे म्हणजे तुम्ही लालची आहात अस अजिबात होत नाही. पैसे कमविणे ही एक स्वताची लाइफ सुधारण्याची, तुमच्या फॅमिलीची परिस्थिति बदलण्याचा एक निर्णय आहे. पुरेसे पैसे कमविणे म्हणजे लाइफमध्ये Financial Stability घेऊन येणे. तुम्हाला नाही आवडणार का Financial Stability? मग पैसे कमविण्यावर दुर्लक्ष करून चालायच नाही.
दुनिया अशी आहे की सतत खर्च करा, जरा इन्कम वाढली की शॉपिंग करा. पण तुम्ही सुद्धा याच मार्गावर चालायच ठरवल तर तुम्हाला रिजल्ट काही नवीन मिळणार नाही. तुम्ही आयुष्यभर एक Average लाइफ जगाल.
आणि जर एक Average लाइफ तुम्हाला नकोय तर पैसे कमवा. पैसे कमवणार तेव्हाच तुम्ही Save करू शकता आणि मग इन्वेस्ट करू शकता तरच तुम्ही एक चांगल भविष्य बनवू शकाल.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
लोकांन बोलूदेत पण तुम्ही काटकसर करा
जो व्यक्ती काटकसर करून जगतो त्याला नेहमीच कंजूस हा शब्द नेहमीच एकावा लागतो. काटकसर करून पैसे Save करणे म्हणजे लाइफ जगण्यात तडजोड करणे न्हवे तर जाणीवपूर्वक तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यकडे वाटचाल करणे.
मी तुम्हाला गरजेच्या गोष्टी किंवा वस्तु न घेता काटकसर करा अस सांगत नाही. पण तुम्हाला समजल पाहिजे की तुम्ही कुठे वायफळ खर्च करत आहात आणि ते थांबवून तुम्हाला पैसे Save करायचे आहेत.
जेव्हा काटकसर कराल तेव्हा एक्स्ट्रा पैसे तुम्ही Save करू शकाल. आणि हेच एक्स्ट्रा पैसे तुम्ही नीट इन्वेस्ट करून तुमचे Financial Goals लवकर पूर्ण करू शकता.
Investing करणे खूप Risky आहे.
शेअर मार्केटमध्ये डायरेक्ट स्टॉक घेणे असो की म्यूचुअल फंडच्या माध्यमातून पैसे इन्वेस्ट करणे असो, भारतात लोक नेहमीच Investing पासून दूर राहतात. आणि याच कारण काय तर Investing खूप Risky असते.
पण Risk न घेता पैसे फक्त FD किंवा गोल्डमध्ये इन्वेस्ट करून तुम्ही आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत नाही. आर्थिक स्वातंत्र्य हवय तर आधी आर्थिक शिक्षण घ्या. आणि त्याच्या मदतीने तुमचे पैसे योग्य ठिकाणी इन्वेस्ट करा आणि त्यांना ग्रो करा.
शेअर मार्केटला समजणे, म्यूचुअल फंडचे बेसिक, पोर्टफोलियो Diversify करणे इ. गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत.
Conclusion हेच आहे की…
आर्थिक स्वातंत्र्याकडे जाणाऱ्या प्रवासात अनेकदा सामाजिक नियमांचे उल्लंघन करणे आणि इतरांच्या निर्णयाच्या पलीकडे Mindset स्वीकारणे यांचा समावेश होतो. अधिक पैसे कमावणे असो, परिश्रमपूर्वक बचत करणे असो किंवा हुशारीने पैसे इन्वेस्ट करणे असो, तुमचा प्रत्येक निर्णय तुम्हाला श्रीमंत होण्याच्या मार्गात योगदान देत.
म्हणून, लोक काय बोलतील याची लागण्याची भीती सोडून द्या आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करा – शेवटी, अशा जगात जिथे अनेकजण financial insecurity साठी झगडत आहेत, थोडा वेगळा मार्ग निवडणे ही खऱ्या यशाची गुरुकिल्ली असू शकते.
3 thoughts on “How to Become Rich: श्रीमंत व्हायच आहे तर लोक काय बोलतील याकडे दुर्लक्ष करा”