How to Add Nominee in Groww App: सेबीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2023 च्या अगोदर म्युच्युअल फंड इन्वेस्टर आणि डिमॅट अकाउंट होल्डर यांनी नॉमिनेशन करणं गरजेचं आहे. आणि नॉमिनेशन करायचं नसेल तर Opt Out असा फॉर्म भरणे गरजेचे आहे. Opt Out म्हणजे तुम्हाला कोणाला तुमच्या अकाउंटला नॉमिनी ठेवायचं नाही. हा फॉर्म तुम्हाला ग्रो ॲपवर मिळेल.
नॉमिनी न ठेवल्यास सेबी तुमच अकाउंट फ्रिज करू शकते आणि दुसर म्हणजे त्यानंतर एसआयपी मधून पैसे काढणे किंवा स्टॉक मधून पैसे काढणे कठीण होऊन जाईल. ज्या इन्व्हेस्टरनी आधीच नॉमिनेशनची प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. आजच्या पोस्टमध्ये आपण Groww App वर नॉमिनेशन कस करायच याची प्रोसेस समजून घेऊ.
How to Add Nominee in Groww App (3 Easy Steps)
Step 1. ग्रो मोबाइल ॲप ओपन करा आणि वरती उजव्या बाजूला प्रोफाइलवर क्लिक करा किंवा वेबसाइटवर डायरेक्ट जा (लिंक) → https://groww.in/user/profile/nominee-details
Step 2. Account Details मध्ये जा अगदी शेवटी ‘Add Nominee’ असा ऑप्शन मिळेल तिथे नॉमिनीची डिटेल्स भरा
Step 3. ‘Finish with Aadhar E-Sign’ यावर क्लिक करा आणि हो इथे आधार नंबर तुम्हाला स्वतचा टाकायचा आहे नॉमिनी नाही.
लक्षात घ्या ग्रो मोबाइल ॲपवर नॉमिनेशन फक्त एकदाच करता येत. तुम्हाला पुढे जाऊन नॉमिनी चेंज करायचं असेल तर त्यासाठी फॉर्म भरावा लागेल. आणि तो फॉर्म तुम्हाला ॲपवर मिळेल.
1 thought on “ग्रो ॲपवर नॉमिनेशन कसं करायचं? | How to Add Nominee in Groww App”