How to Become Rich: कमी सॅलरीमधून श्रीमंत कस बनायच?

How to Become Rich in Marathi with Low Salary: जेव्हा पण पैसे बनविण्याची चर्चा होते किंवा श्रीमंत कस बनायच याचा विचार येतो तेव्हा अनेकांना हेच वाटत की हे मला काही शक्य होणार नाही. जे लोक जास्त पैसे कमवितात किंवा जास्त सॅलरी घेतात तेच श्रीमंत होवू शकतात. पण असा विचार करणे अगदी चुकीच आहे कारण जर तुम्ही योग्य स्टेप्स फॉलो केल्यात तर कमी सॅलरी असून पण तुम्ही श्रीमंत बनू शकता.

I Will Teach You to Be Rich या बूकचे लेखक रमिथ सेठी यांनी कमी सॅलरीमधून श्रीमंत होण्यासाठी 3 सिम्पल स्टेप्स फॉलो करायला संगितल्या आहेत आणि आज आपण त्याच 3 स्टेप्सबद्दल या ब्लॉगमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया.

1) Investing ला सुरुवात करा (लवकरात लवकर)

रमिथ सेठी सांगतात की जस तुम्ही पहिल्या जॉबवर लागाल आणि थोडेफार पैसे कमवायला सुरुवात कराल, तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला पैसे Save आणि Invest करायचा प्लान बनवायचा आहे. कारण श्रीमंत होण्यासाठी ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे.

आता नक्की किती पैसे Save आणि Invest करायचे? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. रमिथ सेठी सांगतात की, तुमच्या सॅलरीमधील 10% रक्कम तुम्ही Save केली पाहिजे आणि 20% रक्कम ही Invest केली पाहिजे. आणि जी रक्कम तुम्ही Invest करणार आहात ती 1% ने कशी वाढवता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे.

आता पैसे Invest करायचे कुठे? रमिथ सेठी सांगतात की जास्त डोक न लावता एका सिम्पल इंडेक्स फंडपासून तुम्ही सुरवात करू शकता. नंतर हव तर तुम्ही इतर पर्याय बघू शकता पण बहुतेक जणांसाठी इंडेक्स फंड किंवा एखादा चांगला फलेक्सि कॅप फंड पुरेसा असतो.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉श्रीमंत होण्यासाठी तुम्हाला या 4 पैकी 1 गोष्ट हवीय! | How to Become RICH (marathifinance.net)

2) जॉब बदलताना चांगली सॅलरी मागा

सहसा लोक जॉब का सोडतात? कारण त्यांना चांगली सॅलरी हवी असते. किंवा जिथे ते आता काम करत आहेत तिथे कमी सॅलरी मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही जॉब बदलत असाल तर नवीन जॉबवर तुम्हाला चांगली सॅलरी कशी मिळेल याचा विचार करा.

आता सॅलरी वाढवून हवी असेल तर तुम्हाला सुद्धा तुमच्याकडे कामाचा चांगला अनुभव आहे तसेच तुमच्याकडे पुरेसे स्किल आहेत हे एखाद्या कंपनीला दाखवव लागेल. सध्या आपल्या आजूबाजूला पटापट बदल होत आहेत. सतत नवीन Technolgy येत आहे. त्यानुसार तुम्हाला स्वताला Upgrade कराव लागेल. तरच तुमची इन्कम वाढू शकते.

तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यामध्ये होणारे नवीन बदल, नवीन स्किल तुम्हाला आले पाहिजेत तरच तुमची इन्कम वाढू शकते.

3) एखाद Side Hustle चालू करा 

Side Hustle म्हणजे एखाद अस काम जिथून तुम्हाला थोडीफार इन्कम कमवू शकता. आता इथे एकदम काहीतरी मोठी इन्कम करायची गरज नाही. रमिथ सेठी सांगतात की छोटी इन्कम असली तरी चालेल पण इन्कम हवी.

जरा विचार करा तुम्ही महिन्याचे एक्स्ट्रा 1000 रुपये कमवत आहात. 1000 रुपये कदाचित तुम्हाला कमी वाटत असतील पण हेच 1000 तुम्ही लॉन्ग टर्मसाठी Invest केलेत तरी खूप मोठी रक्कम बनविता येते. (तुम्ही हव तर कॅल्कुलेट करून बघा)

काही Side Hustle Ideas ज्या तुम्ही करू शकता:

  • यूट्यूब चॅनल बनवा
  • एखादा ब्लॉग
  • Freelancing
  • Content Writing
  • फोटोग्राफी
  • ग्राफिक डिजायनिंग
  • एखाद काम जे तुम्हाला चांगल येत आणि ते तुम्ही विकू शकता
  • इत्यादी.
श्रीमंत होण्यासाठी फोकस व्हाव लागेल!

एक मुख्य कारण ज्यामुळे अनेक जण कधी वेल्थ बनवत नाहीत ते म्हणजे त्यांना कंटाळा येतो आणि त्यांचा फोकस हलतो. इंडेक्स फंड लोकांना खूप बोरिंग वाटतात. त्यामध्ये काही मज्जा येत नाही. लोकांना सतत काहीतरी Exciting हव असत. आज स्टॉक मार्केट वर गेल आज खाली आल, अशा चर्चा हव्या असतात. तरच आम्ही काहीतरी करत आहोत अस त्यांना वाटत.

पण तुम्हाला अगदी याच्या उलट करायच आहे. इंडेक्स फंड घ्या किंवा एखादा Active म्यूचुअल फंड किंवा डायरेक्ट स्टॉक. तुम्ही यामध्ये पैसे इन्वेस्ट करून लॉन्ग टर्मसाठी तेही फोकस न गमावता कस टिकून राहणार यातच तुमच्या श्रीमंतीची किल्ली आहे.

Keep Investing!

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉आर्थिक साक्षरतेचे 8 महत्वाचे धडे | Rich Dad Poor Dad in Marathi (marathifinance.net)

1 thought on “How to Become Rich: कमी सॅलरीमधून श्रीमंत कस बनायच?”

Leave a Comment