PERSONAL FINANCE: पर्सनल फायनॅन्स म्हणजे एखाद्याचे वैयक्तिक किंवा फॅमिली इन्कम, खर्च आणि मालमत्तेशी संबंधित पैशाची मॅनेजमेंट. पर्सनल फायनान्स हा एक प्रवास आहे एखाद ठराविक ठिकाण नाही. या प्रवासात सतत काही ना काही बदल होत राहणार आहेत. प्रत्येक वेळी तुम्हाला बेस्ट किंवा परफेक्ट गुंतवणूक मिळणार नाही किँवा तूमचे आर्थिक निर्णय परफेक्ट नसतील. आता अस का? हेच आपण आजच्या पोस्टमध्ये समजून घेणार आहोत:
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
कारण संपूर्ण माहिती कोणाकडे नसते:
शेयर मार्केट: तुम्ही शेअर मार्केटमध्ये कधी काय होणार याचा फक्त अंदाज बांधू शकता. एकदम ठाम पणे सांगू शकत नाही की हा स्टॉक बेस्ट आहे किंवा हा म्युच्युअल फंड बेस्ट आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी परफेक्ट स्टॉक किंवा म्युच्युअल फंड शोधण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा तुमचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये Invest करा. लाँग टर्मसाठी Hold करा.
तुमच्या गरजा: कोणीही व्यक्ती असो त्याच्या आर्थिक गरजा या बदलत असतात. २०s मध्ये महागडे कपडे आणि मोबाईल हवे असतात. ३०s मध्ये स्वतःच घर आणि फॅमिली सुरु करायची असते आणि अगदी अशाच आर्थिक गरजा बदलत राहतात. आणि त्यानुसार तुजचे आर्थिक ध्येय बदलत असतात. त्यामुळे परफेक्ट. आर्थिक ध्येय अस काही नसत. वेळेनुसार सगळ बदलत.
ही पोस्ट वाचा 👉 पर्सनल फायनॅन्स नक्की आहे तरी काय?
कारण तुमचे निर्णय चुकतील, परफेक्ट कधीचं नसतील:
शेअर मार्केटमधील टायमिंग: मार्केटचा जाणकार असुदेत, कधी स्टॉक विकत घायचा आणि कधी विकायचा हे एक कोड आहे. कोणालाच माहीत नसत की शेअर मार्केट कधी डाऊन होणार, कधी वर जाणार. म्हणून पैसे Invest करताना परफेक्ट टायमिंग बघू नका. बस Invest करा आणि करत रहा.
वाढती लाईफस्टाईल, वाढते खर्च: जशी तुमची इन्कम वाढेल तसे तुमचे खर्च पण वाढतील. सगळे पैसे खर्च करायची सवय लावून घेऊ नका. नाहीतर कीतीही कमवा शेवटी तेपण कमी पडेल. एक बजेट बनवा आणि त्यानुसार पैसे खर्च करा.
कारण आर्थिक नियोजनात परफेक्ट उपाय कधीचं मिळणार नाही:
कर्ज घेणे: आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कर्ज घेणे वाईट आहे. पण स्वतच्या घरासाठी किंवा मुलांच्या शिकण्यासाठी कर्ज घेणे नक्कीच चांगलं आहे. आर्थिदृष्ट्या कदाचित हा परफेक्ट उपाय नसेल पण जर तुम्ही जाणीवपूर्वक कर्जाच वापर करत असाल तर कर्ज वाईट नाही. उगाच गाडीसाठी, शॉपिंगसाठी कर्ज घेणे आणि मग त्याचे हफ्ते न भरणे हे सगळ्यात बेकार असत.
काटकसर करणे गरजे आहे: काटकसर करणे म्हणजे एकदम कंजूस बनणे हे न्हवे ते जिथे गरजेच आहे, कामाचं आहे तिथे पैसे Invest करणे. एकदम काटकसर करायला गेलात, लाईफ एंजॉय करायचं सोडून दिलंत तर हे खूप चुकीचं असेल. कदाचित अस करुन तुम्ही खूप सारा पैसा Save कराल पण त्याचा काय उपयोग? म्हणून खर्च आणि काटकासर यात योग्य तो बॅलन्स बनवा.
ही पोस्ट वाचा 👉 आर्थिक स्वातंत्र्यासाठी 3 महत्वाच्या गोष्टी (कृती, स्वभाव आणि नॉलेज)
मग आता नक्की करायचं काय?
- छोटी सुरुवात करा. परफेक्ट टायमिंगची वाट बघू नका. कारण लाँग टर्ममध्ये छोटी रक्कम पण मोठा फायदा देते.
- आर्थिक प्रवासात छोटे छोटे निर्णय घ्या. आणि ही प्रोसेस एंजॉय करा. प्रत्येक Save केलेला रुपया तुम्हाला भविष्यात फायदा होईल.
- सगळ प्लॅननुसार होणार नाही. एखादा स्टॉक लॉस देईल, एखादा म्युच्युअल फंड खराब रिटर्न देईल. अशा वेळी तुमचा प्लॅन बदला, आर्थिक ध्येय नाही.
नेहमी लक्षात ठेवा
पर्सनल फायनान्स म्हटल की ते प्रत्येकासाठी वेगळ असत. जे मला योग्य वाटेल किंवा जे माझ्यासाठी योग्य असेल ते तुमच्यासाठी कदाचित योग्य नसेल. त्यामुळे तुमच्यासाठी काय काम करत ते शोधा. त्यानुसार आर्थिक प्लॅनिंग करा. सगळ परफेक्ट हवय या भानगडीत पडू नका.
ही पोस्ट वाचा 👉 7 महत्वाचे पैशाचे धडे जे तुम्ही आयुष्यात लवकर शिकले पाहिजेत
1 thought on “PERSONAL FINANCE: पर्सनल फायनान्समध्ये परफेक्ट अस काही नसत, का ते समजून घ्या”