Mutual Fund: एका फॉलोवरने मला इंस्टाग्रामवर असा प्रश्न विचारला की “Groww App वर एका फंडची रेटिंग ४ स्टारवरून २ स्टार केली आहे. याने काही प्रॉब्लेम होणार नाही ना?” खरं तर, असा प्रश्न पडणे साहजिक आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की फक्त रेटिंग बघून जर आपण म्युच्युअल फंड निवडत राहिलो तर कधीच एका फंडसोबत टिकून राहू शकत नाही.
ऑनलाइन रेटिंग एजन्सीज, जसे की Value Research, यांचे कामच असते की सतत विविध म्युच्युअल फंडची रेटिंग तपासणे आणि त्यामध्ये बदल करणे. प्रत्येक महिन्याला एखादा म्युच्युअल फंड नेहमीच त्याच रेटिंगवर राहू शकत नाही. कधी ना कधी त्याची रेटिंग नक्कीच बदलणार, ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
मग म्युच्युअल फंड निवडताना रेटिंगऐवजी कोणत्या गोष्टीवर फोकस करावा?
याचे उत्तर खूप सोपे आहे. तुम्ही जो फंड निवडला आहे, तो फंड तुम्हाला हवा तसा रिटर्न देत आहे का? असा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे. जर उत्तर होय असेल, तर त्या म्युच्युअल फंडची रेटिंग बदलली असली तरी तो फंड बदलायची काही गरज नाही. आणि जर एखादा म्युच्युअल फंड तुमच्या अपेक्षेप्रमाणे रिटर्न देत नसेल, तर तसाही त्याला पोर्टफोलिओमधून बाहेर काढणे गरजेचे असते.
ज्या फॉलोवरने मला हा प्रश्न विचारला तो HDFC Index Fund – Sensex Plan या इंडेक्स फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट करत आहे. इंडेक्स फंड म्हटला की रिटर्न साधारणतः १२-१५% एवढा येतो. पण या फंडने चांगला परफॉर्म करत ३ वर्षांत १९.४१% एवढा रिटर्न दिला आहे.
आता हा रिटर्न तुम्ही त्यामध्ये कधी पैसे इन्व्हेस्ट करता, कधी पैसे काढता तसेच किती काळ पैसे इन्व्हेस्ट करत आहात, या सगळ्या गोष्टींवरून ठरतो. त्यामुळे फक्त रेटिंग पाहू नका, तुमचे ध्येय बघा. त्यानुसार एखादा फंड रिटर्न देत असेल तर त्यामध्ये बदल करू नका.
ही पोस्ट वाचा 👉 सेबीच्या नव्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल
Mutual Fund निवडताना किंवा बदलताना पुढील टिप्स तुमची हेल्प करतील
- फंडाचा ट्रॅक रेकॉर्ड: एखाद्या फंडाचा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड तपासा. ५-१० वर्षांचा परफॉर्मन्स पाहणे अधिक महत्त्वाचे आहे.
- फंड मॅनेजरचा अनुभव: फंड मॅनेजरचा अनुभव आणि त्यांचे पूर्वीचे परफॉर्मन्स पाहा. अनुभवी फंड मॅनेजरचे निर्णय अधिक चांगले असू शकतात.
- फंडाचा Expense Ratio: कमी Expense Ratio असलेल्या फंडाचा निवड करा. हा फंडाचा मॅनेजमेंट खर्च आहे, जो थेट तुमच्या रिटर्नवर परिणाम करतो.
- फंडाचा पोर्टफोलिओ: फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे ते तपासा. विविधिकरण (Diversification) किती आहे हे पाहा.
- जोखमीचा स्तर (Risk Level): फंडाच्या जोखमीची पातळी समजून घ्या. तुमच्या जोखमीच्या सहनशक्तीप्रमाणे फंड निवडा.
रेटिंग हा एक महत्त्वाचा घटक आहे, परंतु तो एकमेव निकष नाही. आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या आधारावर आणि फंडाच्या विविध घटकांचा विचार करून निर्णय घ्या. ऑल द बेस्ट!
ही पोस्ट वाचा 👉 SBI Mutual Fund चा ऐतिहासिक टप्पा: 10 लाख करोड AUM पार, जाणून घ्या कसे जमले एवढे पैसे!
Frequently Asked Questions
१. फंडाची रेटिंग कमी झाली तर मी काय करावे?
जर फंडाची रेटिंग कमी झाली, तर लगेच घाबरून फंड विकू नका. पहिल्यांदा तपासा की हा फंड तुम्हाला अपेक्षित रिटर्न देत आहे का. जर होय, तर फंड बदलायची गरज नाही.
२. म्युच्युअल फंड निवडताना कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे?
फंडाचा दीर्घकालीन ट्रॅक रेकॉर्ड, फंड मॅनेजरचा अनुभव, खर्च गुणोत्तर (Expense Ratio), फंडाचा पोर्टफोलिओ, आणि जोखमीची पातळी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे.
३. ऑनलाइन रेटिंग एजन्सीज काय काम करतात?
ऑनलाइन रेटिंग एजन्सीज, जसे की Value Research, सतत विविध म्युच्युअल फंडांची रेटिंग तपासतात आणि त्यामध्ये बदल करतात. त्यांचे उद्दिष्ट फंडांची कार्यक्षमता मोजणे आणि गुंतवणूकदारांना मदत करणे असते.
४. रेटिंग बदलणे सामान्य आहे का?
होय, रेटिंग बदलणे सामान्य आहे. बाजारातील परिस्थिती, फंडाच्या परफॉर्मन्समध्ये होणारे बदल यामुळे रेटिंग बदलू शकते.
५. इंडेक्स फंड काय असतो?
इंडेक्स फंड हा असा फंड असतो जो ठराविक निर्देशांक (Index) च्या कामगिरीची नक्कल करतो. उदा. HDFC Index Fund – Sensex Plan हा फंड Sensex निर्देशांकाच्या कामगिरीशी निगडित असतो.
६. इंडेक्स फंडामध्ये रिटर्न काय असू शकतो?
सामान्यतः इंडेक्स फंडाचे रिटर्न १२-१५% दरम्यान असतात. मात्र, बाजारी स्थितीनुसार हे रिटर्न बदलू शकतात. काही वेळा चांगला परफॉर्म करून जास्त रिटर्न मिळवता येऊ शकतो.
७. फंडाच्या खर्च गुणोत्तराचा (Expense Ratio) महत्त्व काय आहे?
फंडाचा खर्च गुणोत्तर हा फंडाच्या प्रशासनाचा खर्च आहे. कमी खर्च गुणोत्तर असलेले फंड निवडल्यास जास्त रिटर्न मिळू शकतो.
८. फंड मॅनेजरचा अनुभव का महत्त्वाचा आहे?
फंड मॅनेजरचा अनुभव महत्त्वाचा आहे कारण अनुभवी मॅनेजरचे निर्णय अधिक चांगले असतात आणि त्यांचा परिणाम फंडाच्या परफॉर्मन्सवर होतो.
९. फंडाचा पोर्टफोलिओ तपासणे का आवश्यक आहे?
फंडाचा पोर्टफोलिओ तपासल्याने त्या फंडात कोणत्या कंपन्यांचा समावेश आहे, विविधिकरण किती आहे हे समजते. हे आपल्या गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे आहे.
१०. फंडाची जोखमीची पातळी कशी तपासावी?
फंडाची जोखमीची पातळी फंडाच्या गुंतवणुकीच्या प्रकारावरून कळते. उच्च जोखमीचे फंड जास्त रिटर्न देऊ शकतात, परंतु तेवढ्याच प्रमाणात नुकसान होण्याचा धोकाही असतो. आपल्या जोखमीच्या सहनशक्तीप्रमाणे फंड निवडावा.