SBI Mutual Fund चा ऐतिहासिक टप्पा: 10 लाख करोड AUM पार, जाणून घ्या कसे जमले एवढे पैसे!

5/5 - (2 votes)

SBI Mutual Fund: भारताची सगळ्यात मोठी म्युच्युअल फंड कंपनी एसबीआय म्युच्युअल फंडने 10 लाख करोड एवढे Average Asset Under Management (AAUM) मॅनेज करण्याचा टप्पा पार केला आहे.

AUM म्हणजे Asset Under Management, म्हणजे आपल्या सारखे इन्वेस्टर्स जे पैसे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करतात, त्या टोटल पैशाला AUM असे म्हणतात. एसबीआय म्युच्युअल फंड भारतामध्ये टोटल 10 लाख करोड एवढे पैसे मॅनेज करते.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

मागील आर्थिक वर्षात एसबीआय म्युच्युअल फंडने 9 लाख करोड AAUM चा टप्पा पार केला होता. मागील 5 वर्षात (2019 ते 2024) एसबीआय म्युच्युअल फंडची AAUM जवळजवळ 26% ने वाढली आहे. याचा अर्थ लोक मोठ्या प्रमाणात एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करत आहेत, मग ते SIP च्या माध्यमातून असो की लम्पसम.

SBI Mutual Fund मध्ये एवढी AUM वाढण्याची नक्की कारणे काय आहेत?

आजकाल प्रत्येकजण SIP ओपन करत आहे. SIP च्या माध्यमातून थोडे थोडे पैसे लॉन्ग टर्ममध्ये जमा करणे लोकांना सोयीचे जात आहे. एसबीआय म्युच्युअल फंडच्या मते छोट्या शहरांमध्ये SIP बद्दल जागरूकता वाढली आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैसा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये येत आहे.

तुम्हाला तर माहीत असेल की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सगळ्यात जास्त शाखा भारतभर पसरल्या आहेत. एसबीआय म्युच्युअल फंड त्यांची Sponser म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोठ्या शाखा नेटवर्कमधून मोठ्या प्रमाणात SIP आणि लम्पसम इन्वेस्टमेंट एसबीआय म्युच्युअल फंडच्या विविध स्कीममध्ये इन्वेस्ट केले जातात.

ही पोस्ट वाचा   👉 सेबीच्या नव्या निर्णयामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

त्यासोबतच एसबीआय म्युच्युअल फंड नवनवीन म्युच्युअल फंड लॉन्च करत असतात. जसे की नुकतेच एसबीआय म्युच्युअल फंडने दोन नवीन म्युच्युअल फंड लॉन्च केले. पहिला आहे SBI Energy Opportunities Fund, ज्यामध्ये टोटल 6,800 करोड एवढी रक्कम जमा झाली आहे. तसेच दुसरा फंड SBI Automotive Opportunities Fund, ज्यामध्ये टोटल 5,710 करोड एवढी रक्कम AUM च्या स्वरूपात जमा झाली आहे.

सध्या, एसबीआय म्युच्युअल फंडकडे टोटल 116 वेगवेगळे म्युच्युअल फंड किंवा स्कीम चालू आहेत. त्यापैकी 44 इक्विटी फंड आहेत, 57 डेब्ट म्युच्युअल फंड आहेत, 2 Commodity-based म्युच्युअल फंड आहेत आणि बाकी 7 इंडेक्स फंड किंवा ETFs आहेत.

Frequently Asked Questions

प्रश्न 1: AUM म्हणजे काय?

उत्तर: AUM म्हणजे Asset Under Management. याचा अर्थ आपल्या सारख्या इन्वेस्टर्सने म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट केलेल्या एकूण पैशाला AUM असे म्हणतात.

प्रश्न 2: एसबीआय म्युच्युअल फंडची सध्याची AUM किती आहे?

उत्तर: एसबीआय म्युच्युअल फंड सध्या 10 लाख करोड रुपये व्यवस्थापित करते.

प्रश्न 3: एसबीआय म्युच्युअल फंडची एवढी AUM वाढण्याची कारणे काय आहेत?

उत्तर: SIP च्या माध्यमातून थोडे थोडे पैसे लॉन्ग टर्ममध्ये जमा करणे लोकांना सोयीचे वाटते. लहान शहरांमध्ये SIP बद्दल जागरूकता वाढल्याने आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मोठ्या शाखा नेटवर्कमुळे एसबीआय म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे येत आहेत.

प्रश्न 4: सध्या एसबीआय म्युच्युअल फंडकडे किती स्कीम्स आहेत?

उत्तर: सध्या एसबीआय म्युच्युअल फंडकडे एकूण 116 वेगवेगळ्या म्युच्युअल फंड स्कीम्स आहेत. त्यात 44 इक्विटी फंड्स, 57 डेब्ट म्युच्युअल फंड्स, 2 कमोडिटी-बेस्ड म्युच्युअल फंड्स आणि 7 इंडेक्स फंड्स किंवा ETFs आहेत.

Leave a Comment

तुमच्या नोकरीच्या पलीकडे, एक्स्ट्रा कमाईसाठी विचार करण्यासारखे 4 उपाय पैशाच्या या 6 सवयी तुमचं आयुष्य बदलतील | 6 Money Habits Can Change Your Life in Marathi इलेक्शन रिजल्टनंतर राहुल गांधी यांच्या स्टॉक पोर्टफोलियोमध्ये 6% ने झाली वाढ? जे पैसे तुमच्याकडे नाहीत ते खर्च करू नका! पैसे कमविण्याच्या 3 लेवल्स, तुम्ही कोणत्या लेवलवर आहात? | Financial Freedom in Marathi