Parag Parikh Flexi Cap Fund: तुम्ही या वर्षी SIP साठी एखादा फलेक्सि कॅप फंड बघत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी आहे.
पण त्याआधी हे फलेक्सि कॅप फंड काय आहे?
Flexi म्हणजे Flexible. फलेक्सि कॅप फंड म्हणजे असा फंड जिथे फंड मॅनेजर मार्केटमधील सगळ्या कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करतो.
Flexi Cap Fund मध्ये फंड मॅनेजरला टोटल 65% एवढी रक्कम इक्विटि म्हणजेच विविध कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये इनवेस्ट करण्याची सूट असते. याचा अर्थ असा की या 65% पैकी ठराविक रक्कम तो त्याच्या पद्धतीने शेअर मार्केटच्या परिस्थितीनुसार थोडे पैसे Small कॅप स्टॉकमध्ये, तर थोडे पैसे मिड कॅप स्टॉक आणि लार्ज कॅप स्टॉक मध्ये इनवेस्ट करू शकतो.
Flexi Cap Fund चा सगळ्यात मोठा फायदा हाच आहे की एक फंड आणि मार्केटमधील सगळ्या प्रकारच्या कंपन्यांमध्ये पैसे इन्वेस्ट करता येतात.
Parag Parikh Flexi Cap Fund
AUM: फलेक्सि कॅप कॅटेगरीमधील Parag Parikh Flexi Cap Fund हा भारताचा सगळ्यात मोठा फंड आहे ज्याची AUM (Asset Under Management) 48,293 करोड एवढी आहे.
Expense Ratio: Parag Parikh Flexi Cap Fund चा Expense रेशियो म्हणजे तुम्हाला द्यावी लागणारी फी 0.6% आहे जी एका Active फंडच्या हिशोबाने कमी आहे.
Minimum SIP: तुम्ही 1000 रुपायापासून या फंडमध्ये SIP चालू करू शकता.
Fund Return: या फंडचा 1 वर्षाचा रिटर्न 38.44% आहे, 3 वर्षाचा रिटर्न 23.65% आहे, 5 वर्षाचा रिटर्न 24.24% आहे तसेच जेव्हापासून हा फंड सुरू झाला आहे तेव्हापासून या फंडने त्याच्या बेंचमार्क इंडेक्स पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे. (19.90%)
या फंडच वैशिष्ट हे आहे की मार्केट खाली जाऊदेत की वर, या फंडने Consistent रिटर्न दिला आहे. अस नाही की मार्केट डाऊन झाल की एकदम फंडचा रिटर्न कमी झाला आहे. आणि हीच या फंडची चांगली गोष्ट आहे.
काही जण असतील त्यांना या फंडमध्ये SIP करायची नसेल किंवा इतर फंड हवे असतील तर तुम्ही पुढील काही फंड चेक करू शकता. फक्त रिटर्न बघून नाही तर Expense ratio, तो फंड Consistent रिटर्न देतोय की नाही ते आधी बघा.
Downside Protection तो फंड देत आहे की नाही हे चेक कारण जेव्हा मार्केट पडत तेव्हा त्या फंडची खरी परीक्षा असते की तो रिटर्न चांगले देईल की नाही. जर तुम्ही फक्त रिटर्न बघून फंड निवडला तर Quant Flexi Cap Fund नंबर 1 असेल पण तो फंड खूपच Risky आहे. जर तुम्ही रिस्क घेऊ शकता तरच त्यासोबत जा नाहीतर Stable रिटर्न आणि रिटर्नमध्ये कमी Volatility असलेला फंड निवडा.
- PGIM India Flexi Cap Fund
- Quant Flexi Cap Fund
-
Edelweiss Flexi Cap Fund
आणि हो ज्यांनी आधी एखाद्या फंडमध्ये SIP केली असेल म्हणजे 2022 किंवा त्या आधी आणि तुमचा फंड जर तुम्हाला हवे तसे रिटर्न देत असेल तर त्याला बदलायची गरज नाही. तुमच्या Financial Goal साठी तो फंड चांगला असेल आणि म्हणून तुम्ही निवडला असेल तर त्यासोबत कंटिन्यू करा.
फक्त फंड चांगला निवडून पुरेस नाही त्यामध्ये लॉन्ग टर्मसाठी टिकून राहणे गरेचच आहे.
Happy SIPing…
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Parag Parikh Flexi Cap Fund: 48,000 करोडपेक्षा जास्त AUM असलेला फंड (काय आता रिटर्न कमी होणार?)
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance