Nifty Next 50 Index Fund काय आहे? तुम्ही इन्वेस्ट केल पाहिजे का?

Nifty Next 50 Index Fund in Marathi: मी नुकतंच एक नवीन फंड माझ्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये Add केला आहे आणि तो फंड आहे Navi Nifty Next 50 Index Fund. आता हा फंड नक्की काय आहे आणि मी का घेतला आहे हे आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत.

पण त्यासोबत तुम्ही असा एखादा फंड तुमच्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये Add केला पाहिजे का? यावर आपण डीटेलमध्ये चर्चा करणार आहोत. पण त्याआधी

Nifty Next 50 Index काय आहे? 

तुम्हाला Nifty 50 या इंडेक्सबद्दल माहिती असेलच. निफ्टि 50 या इंडेक्समध्ये भारतीय शेअर मार्केटमधील टॉप 50 कंपन्याचा समावेश होतो. म्हणजे भारताची नंबर 1 कंपनी ते अगदी भारताची 50 वी मोठी कंपनी.

पण या पुढे असणाऱ्या कंपन्या म्हणजे भारताची 51 वी कंपनी ते अगदी 100 वी मोठी कंपनी यांचा समावेश Nifty Next 50 या इंडेक्समध्ये केला जातो. निफ्टि 50 या इंडेक्सशी तुलना केल्यास Nifty Next 50 इंडेक्स जरा जास्त Risky असतात. Volatilty जास्त असते. 1196 मध्ये सुरुवात झाल्यापासून Nifty Next 50 या इंडेक्सने 17.2% चा रिटर्न दिला आहे.

आणि या इंडेक्सला जो फंड कॉपी करतो त्याला Nifty Next 50 Index Fund अस म्हणतात.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Sensex & Nifty: – सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे?

मी Nifty Next 50 Index Fund मध्ये पैसे का इन्वेस्ट करत आहे? 

जस जस मी म्यूचुअल फंड आणि फायनॅन्सबद्दल शिकतोय तस तस मला पैसे इन्वेस्ट करायला इंडेक्स फंड एक बेस्ट ऑप्शन वाटत आहेत. कारण लॉन्ग टर्ममध्ये जर पाहिल तर खूप सारे Active म्यूचुअल फंडस (ज्याना फंड मॅनेजर खूप सारी रिसर्च करून चालवत असतात) ते इंडेक्सपेक्षा जास्त रिटर्न देत नाहीत.

आणि आपण पैसे इन्वेस्ट करतोय ते 2-3 वर्षासाठी न करता लॉन्ग टर्मसाठी करत असतो. आता माझ लॉन्ग टर्म आहे 15-20 वर्ष. आता एवढ्या टाइमसाठी मी एखाद्या फंड मॅनेजरवर विश्वास तर नाही ठेवू शकत आहे.

Nifty next 50 index fund in Marathi

सध्या म्यूचुअल फंड पोर्टफोलियोमध्ये फक्त चार फंडस आहेत ज्यापैकी 2 Active म्यूचुअल फंड्स आहेत आणि 2 इंडेक्स फंड. आणि आता मी Navi Nifty Next 50 हा फंड Add केला आहे. (फंड फक्त माहितीसाठी दाखवले आहेत, आर्थिक सल्ला समजू नये. आणि यामध्ये इन्वेस्ट केल तरी प्रॉब्लेम नाही कारण फंडस तर चांगलेच आहेत. फक्त तुमचे Financial Goals आणि रिटर्न किती हवाय ते स्पष्ट असुदेत)

पण या फंडमध्ये मी SIP करणार नाहीये, का ते सांगतो. 

मला चाय पिण्याच वेड आहे. दिवसातून 2-3 कप तर होतात. तसेच आता ऑफिसमध्ये कधी नाष्टा होतो त्यामध्ये वडापाव, बर्गर, सँडविच होवून जात. पण बाहेरच खाण सहसा टाळायचा प्रयत्न करतो पण कधी कधी राहवत नाही. आणि मग नंतर अस वाटत अरे उगाच खर्च केला.

मग यावर उपाय म्हणून मी अस ठरवल आहे जेव्हा जेव्हा मी बाहेर काही खाणार तेव्हा तेव्हा तेवढे पैसे मी एका सिम्पल इंडेक्स फंडमध्ये इन्वेस्ट करेन. त्यासाठी मी Navi Nifty Next 50 हा इंडेक्स फंड यासाठी निवडला कारण

  • expense ratio अगदी कमी आहे 0.12% आहे
  • या फंडमध्ये अगदी 10 रुपयापासून पैसे इन्वेस्ट करता येतात
  • Exit Load काहीच नाहीये (अचानक पैसे काढले तर काही फी नाही)
  •  मी जेवढे पसी खर्च करेन फक्त तेवढे पैसे यामध्ये इन्वेस्ट करेन (मी SIP करत नाहीये)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi

आता अस करून मला काय फायदा होईल? 

पहिल तर मी किती बाहेर खर्च करतो हे मला समजेल कारण तेवढे पैसे मी या इंडेक्स फंडमध्ये इन्वेस्ट करेन. आणि जर मला ते समजल तर मी बाहेर खाण जरा कमी करू शकेन.

दुसर म्हणजे जरी बाहेर खाल्ल जे आपण सगळेच करतो तरी एवढ गिल्टि वाटणार नाही की पैसे बरबाद केले कारण तेवढे पैसे या फंडमध्ये त्याच दिवशी इन्वेस्ट केले जातील. आणि नुसत बाहेरच खाण नाही तर शॉपिंग वेगेरे केले जाणारे खर्च पण मी यामध्ये Add करेन.

अस केल्याने मला बाहेरच खाण आणि शॉपिंगवर नक्की किती पैसे जात आहे हे देखील ट्रॅक करता येईल. हा फक्त एक एक्सपरिमेंट आहे. यामध्ये मोठा रिटर्न वेगेरे कमवायचा माझा प्लान नाहीये.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
आता काहीना प्रश्न पडेल की जे चालू फंडस आहेत त्यामध्ये इन्वेस्ट का नाही करत? 

जे फंड सध्या माझ्याकडे आहेत त्या काहीमध्ये कमीत कमी रक्कम 500 किंवा 1000 इन्वेस्ट करता येते. जरी मी 4 दिवस थांबून, खर्च एकत्र करून मग पैसे इन्वेस्ट करायचे ठरवले तर मी नक्की विसरणार आणि टाळत बसणार.

त्यामुळे ना कधी पैसे इन्वेस्ट होतील, ना मला ट्रॅक करता येईल की पैसे नक्की किती खर्च होत आहेत. आणि Navi Mutual Fund अशी एकच कंपनी आहे जिच्या सगळ्या फंडमध्ये तुम्ही अगदी 10 रुपायापासून सुरुवात करू शकता. मला हा Feature खरंच खूप आवडला आहे आणि म्हणून मी हा इंडेक्स फंड निवडला आहे.

खर्च करू पण तेवढेच पैसे इन्वेस्ट करू! (रक्कम छोटी असली तरी चालेल)

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉माझ्याकडे सेंसेक्स आणि निफ्टि 50 दोन्ही इंडेक्स फंड्स आहेत? | Sensex Vs Nifty 50 Index Fund in Marathi (marathifinance.net)

1 thought on “Nifty Next 50 Index Fund काय आहे? तुम्ही इन्वेस्ट केल पाहिजे का?”

Leave a Comment