5 Money Lies: – लाइफमध्ये प्रत्येक जण पैशाच्या मागे धावत असतो. पैसा हा लाइफचा Main पॉइंट बनला आहे, आणि का नाही बनणार, पुरेसा पैसा असेल तर लाइफचे खूप सारे प्रॉब्लेम्स सहज सुटतात.
पण हे सगळ होत असताना काही गोष्टी लोक आपल्याला संगत असतात आणि आपण सगळेच कळत नकळत मान्य करत असतो. आणि त्या म्हणजे एवढे मार्क्स हवेत तरच चांगली नोकरी मिळेल, मग चांगला पगार मिळेल तरच मोठ लोन काढून घर घेत येईल. आणि मग ते लोन फेडण्यासाठी लाइफटाइम मेहनत करत राहणे.
अशाच काही अजून गोष्टींवर आपण आज चर्चा करणार आहोत. चला तर सुरुवात करूया.
Money Lie 1: रिटायरमेंट म्हणजे वय वर्ष 60
आपण सगळे हेच एकत आलोय की रिटायरमेंट म्हणजे वय वर्ष 60. पण रिटायरमेंट हे काही वय नाही तर एक ठराविक नंबर आहे. हा नंबर प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. जर आपण रिटायरमेंट जी सोपी व्याख्या पाहिली तर अशी असेल, जेव्हा तुमच्याकडे असलेले विविध Assets जसे स्टॉक्स, म्यूचुअल फंड, PPF इ. मधून येणाऱ्या इन्कममधून तुमचे घर चालत आहे. तुम्हाला इन्कम कामविण्यासाठी जॉब करायची गरज नाहीये. त्यामुळे 60 पर्यन्त वाट बघण्यापेक्षा तुम्ही तुमची रिटायरमेंट तुमच्या हिशोबाने घेऊ शकता.
Money Lie 2: इनवेस्टिंग खूप Risky आहे
आपल्या संगळ्याना चांगलच माहीत आहे की इनवेस्टिंग Risky आहे पण इनवेस्टिंगकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे त्याहून जास्त Risky आहे. जेव्हा तुम्ही पैसे इनवेस्ट करत नाही मग स्टॉक असो की म्यूचुअल फंड की इतर कोणतंही Asset तेव्हा तुम्ही चांगली वेल्थ बनव्याची संधी गमावता. आणि पैसे घरी ठेवून किंवा बँक अकाऊंटमध्ये ठेवून काही होणार नाही फक्त महागाई त्या पैशाला नकळत कमी करणार. त्यामुळे Strategic इनवेस्टमेंट करणे गरजेच आहे. तुमचे Financial Goals, तुमची रिस्क क्षमता, तुमच इनवेस्टिंग टाइम ओळखा आणि त्यानुसार Investing करा.
Money Lie 3: हार्ड वर्क करुनच तुम्ही श्रीमंत व्हाल
हार्ड वर्क तर आपण सगळेच करतो. तुमचा जॉब हे देखील एक हार्ड वर्कच आहे भलेही ते खुर्चीत बसून असेल. पण इथे आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागणार आहे. आपण किती काम करणार यांची एक लिमिट आहे. कितीही झाल तरी 24 तास काम करणे कोणालाच शक्य नाही. पण तुम्ही कमविलेला पैसा मात्र तुमच्यासाठी हार्ड वर्क करूच शकतो तेही 24 तास. आणि पैसा कसली कम्पलेन पण करत नाही. गरज आहे फक्त तो पैसा योग्य ठिकाणी इनवेस्ट करण्याची. त्यामुळे जॉब करून पैसे कमवा, तिथे हार्ड वर्क करा पण ते पैसे योग्य Assets मध्ये इनवेस्ट करून स्मार्ट वर्क करा. अस करूनच तुम्ही श्रीमंत होणार आहात.
Money Lie 4: स्टॉक मार्केट म्हणजे जुगार
अजून पण लोक स्टॉक मार्केटला जुगार किंवा सट्टाबाजार समजतात. माहीत आहे की स्टॉक मार्केटमध्ये मोठ मोठे एससी Scams झाले आहेत. पण गेले ते दिवस. आजकाल सेबीसारखा मार्केट रेग्युलेटर आहे जे मार्केटच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेऊन असतात. जस जुगार, सट्टाबाजार करताना लोकांना झटपट पैसा हवा असतो पण स्टॉक मार्केट संयम आणि Commitment यांना नेहमीच रिवॉर्ड देत आलाय. जितका जास्त वेळ तुम्ही स्टॉक मार्केटला देणार तेवढा जास्त प्रॉफिट मार्केट तुम्हाला देणार. छोट्या मोठ्या चढ उतरांनी एका लॉन्ग टर्म इन्वेस्टरला कधीच फरक पडत नाही.
Money Lie 5: सगळे श्रीमंत लोक, श्रीमंत म्हणून जन्माला येतात
वेल्थ बनविणे हे एक कठीण काम आहे यात काहीच शंका नाही. पण ते अगदी अशक्य आहे अस अजिबात नाही. कोणी श्रीमंत व्यक्ति दिसला की हा विचार येतोच आई बापाचा पैसा असेल. हा काही वेळा अस होत की आई बापाची खूप प्रॉपर्टी आहे आणि पोराला मिळाली आणि तो श्रीमंत झाला. पण एक स्टडीनुसार जगामध्ये 88% मिलिनियर हे सेल्फ मेड (Self-Made) आहेत. तुम्ही स्वता नोटिस करा जेव्हा तुम्ही एखादी सक्सेस स्टोरी एकता की या व्यक्तीने सुरुवात कुठून केली आहे. तुम्हाला उत्तर सापडेल. त्यामुळे जर ते लोक करू शकतात तर तुम्ही करू शकता.
आपल्या आजूबाजूला पैशाविषयी जे गैरसमज पसरवले गेले आहेत त्यातून सगळयात आधी मोकळ व्हायची गरज आहे. रिटायरमेंट हे काही वय नाही तर एक नंबर आहे जो तुम्हाला गाठायचा आहे. इनवेस्टिंगला जुगार समजू नका, श्रीमंत होण्याची यापेक्षा मोठी संधि नाही. हार्ड वर्क करा पण त्यासोबत स्मार्ट वर्कची जोड हवी. कोणी सहज श्रीमंत होत नाही. तुम्ही किती मेहनत घेत यावर सगळ अवलंबून आहे. त्यामुळे हे गैरसमज दुर झाले असतील एका नवीन Mindset ने तुमच्या आर्थिक प्रवासाची सुरुवात करा. त्या 88% सेल्फ मेड मिलिनियरमध्ये काय माहीत आम्ही तुमच नाव बघू.
HAPPY INVESTING
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👇
View this post on Instagram
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
2 thoughts on “5 Money Lies: पैशाबद्दलचे 5 गैरसमज (जे आपण सहज मान्य करत आलोय)”