Medi Assist Healthcare IPO Day 2: रिटेल इन्वेस्टर पैसा ओतत आहेत!

Medi Assist Healthcare IPO Day 2: मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओचा आज  Bidding साठी मार्केटमध्ये दूसरा दिवस होता. जस आज सकाळी मार्केट ओपन झाल तस काही तासात या आयपीओचा रिटेल पोर्शन पूर्णपणे बूक झाला.

सगळ्या कॅटेगरीमध्ये एकत्रित पाहिलं तर पहिल्या दिवशी हा आयपीओ 54% सबस्क्राईब झाला होता आणि आज  1.20 टाइम्स सबस्क्राईब  झाला आहे.

रीटेल इन्वेस्टर कॅटेगरीमध्ये या आयपीओला पहिल्या दिवशी सारखाच दुसऱ्या दिवशी पण जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या कॅटेगरीमध्ये मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ 1.70  टाइम्स सबस्क्राईब झाला आहे.

NII (Non-Institutional Investors) या कॅटेगरीमध्ये हा आयपीओ पहिल्या दिवशी 45% सबस्क्राईब झाला होता आणि आज या कॅटेगरीमध्ये आयपीओ 1.61 टाइम्स सबस्क्राईब झाला आहे. NII म्हणजे भरतीय नागरिक,NRI (बाहेर देशात राहणारा भारतीय व्यक्ती), HUF – Hindu Undivided Family चा कर्ता, एखादी ट्रस्ट, सोसायटी इ.

QIB (Qualified Institutional Buyers) नी या आयपीओला पहिल्या दिवशी काही प्रतिसाद दिला न्हवता पण आज या कॅटेगरीमध्ये  आयपीओ 1% सबस्क्राईब झाला आहे. अस दिसत आहे या आयपीओसाठी QIB एवढे Interested नाहीयेत. QIB कॅटेगरीमध्ये यामध्ये मोठ मोठ्या म्यूचुअल फंड कंपन्या, पेन्शन फंड, इन्शुरेंस कंपन्या, बँका इत्यादिचां समावेश होतो.

जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)

Medi Assist Healthcare IPO Details 

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओची प्राइज Rs 397-418 रुपये प्रति शेअर  फिक्स  करण्यात आली आहे. हा आयपीओ 15 जानेवारी 2024 रोजी मार्केटमध्ये एंट्री घेणार आहे आणि 17 जानेवारी 2023  रोजी बंद होणार आहे.

इन्वेस्टर मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओसाठी अप्लाय करताना एका लॉटमध्ये टोटल 35 शेअर्स  घेऊ शकतात ज्याची टोटल किंमत ₹14,630 रुपये एवढी असेल.

मेडी असिस्ट हेल्थकेअर आयपीओ हा पूर्णपणे ऑफर फॉर सेल (offer for sale) असेल. ऑफर फॉर सेल म्हणजे कंपनीचे प्रोमोटर त्यांची हिस्सेदारी पब्लिकला विकत आहेत. या ऑफर फॉर सेलमध्ये टोटल 2.8 करोड एवढे शेअर्स मार्केटमध्ये पब्लिकला विकले जातील.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 Medi Assist Healthcare IPO: आज आयपीओ चालू होणार (अप्लाय करण्याआधी हे वाचा) 

Leave a Comment

श्रीमंत व्यक्तींच्या 5 सवयी (ज्या तुम्ही विकसित केल्या पाहिजेत) Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा डिटेल माहिती: HDFC Ergo Optima Secure Health Insurance Policy तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य कस मिळेल? | 3 Steps of Financial Freedom in Marathi