गुंतवणूकदारांचे रक्षण: SEBI ने म्युच्युअल फंडचा Risk Adjusted Return (RAR) उघड करणे केले अनिवार्य, जाणून घ्या महत्वाचे बदल

गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत करण्यासाठी आणि विक्रीच्या गैरप्रकारांना मर्यादित करण्यासाठी, मार्केट रेग्युलेटर Securities and Exchange Board (SEBI) ने विविध म्युच्युअल कंपन्याना त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीम पोर्टफोलिओमधून मिळणाऱ्या Risk Adjusted Return (RAR) ला अनिवार्यपणे उघड करण्याची मागणी केली आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉@marathifinance

Risk Adjusted Return (RAR) म्हणजे काय?

म्युच्युअल फंडच्या कार्यक्षमतेचे (Performance) एक समग्र मापन म्हणजे Risk Adjusted Return (RAR), ज्यामध्ये स्कीमने घेतलेल्या रिस्कच्या प्रत्येक युनिटसाठी मिळवलेल्या रिटर्नचे प्रमाण दर्शविले जाते. थोडक्यात काय तर प्रत्येक म्यूचुअल फंडमध्ये एखाद्या म्यूचुअल फंड यूनिटवर रिटर्न कमविण्यासाठी म्यूचुअल फंड कंपनीकडून किती रिस्क घेतली जाते याला Risk Adjusted Return (RAR) असे म्हणतात. चालू नियम असा आहे की म्यूचुअल फंड कंपन्याना Risk Adjusted Return (RAR) उघडकीस करण्याची गरज नाही.

रिटर्न असतो गुंतवणूकदारांचा आकर्षण बिंदू

गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड स्कीममध्ये गुंतवणूक करण्यास आकर्षित करणारा प्रमुख घटक म्हणजे रिटर्न असतो. एखादा नवीन म्यूचुअल फंड लॉंच करताना रिटर्न किती मिळणार हे प्रत्येक कंपनी हायलाइट करते.

सेबीने सार्वजनिक टिप्पणी मागवली

एखादा म्यूचुअल फंड गुंतवणूकीसाठी चांगला आहे की नाही हे समजून घेण्यासाठी म्यूचुअल फंड स्कीमच्या परफॉर्मेंसमध्ये होणारे चढ उतार पाहिले जातात. सेबीने अस सांगितल आहे की म्यूचुअल फंडच्या परफॉर्मेंसोबत त्या म्यूचुअल फंडचा Risk Adjusted Return (RAR) उघडकीस आणणे योग्य आहे. शुक्रवारी जारी केलेल्या सल्लागार पत्रकात सेबीने या प्रस्तावांवर जुलै 19 पर्यंत सार्वजनिक टिप्पणी मागवली आहे.

Information Ratio काय आहे?

Information Ratio (IR) हा कोणत्याही म्यूचुअल फंड स्कीम पोर्टफोलिओच्या Risk Adjusted Return (RAR) मोजण्यासाठी एक स्थापित आर्थिक गुणोत्तर आहे. हा Information Ratio (IR) म्यूचुअल फंड कंपन्याचे स्किल्स आणि बेंचमार्कच्या तुलनेत एक्स्ट्रा रिटर्न निर्माण करण्याच्या क्षमतेचे मोजमाप करतो आणि परफॉर्मेंसची सातत्यता ओळखण्याचा प्रयत्न करतो.

या नियमाचा तुम्हाला काय फायदा होणार?

जेव्हा एखाद्या म्यूचुअल फंडचा Risk Adjusted Return तुम्हाला माहीत असेल तेव्हा तो फंड तुमच्यासाठी चांगला आहे की नाही, याचा निर्णय तुम्ही घेऊ शकाल. कारण रिस्कला Adjust केल्यानंतर तुम्हाला हा रिटर्न सांगितला जाईल.

ही पोस्ट वाचा : Quant Mutual Fund वर सेबीची चौकशी, फ्रंट रनिंग केल्याचे आरोप, काय आहे फ्रंट रनिंग?

FAQs

Risk Adjusted Return (RAR) म्हणजे काय?

Risk Adjusted Return (RAR) म्हणजे म्युच्युअल फंडाच्या कार्यक्षमतेचे एक समग्र मापन, ज्यामध्ये स्कीमने घेतलेल्या रिस्कच्या प्रत्येक युनिटसाठी मिळवलेल्या रिटर्नचे प्रमाण दर्शविले जाते. म्हणजेच, म्युच्युअल फंड कंपनीकडून एका म्युच्युअल फंड युनिटवर रिटर्न कमविण्यासाठी किती रिस्क घेतली जाते याला Risk Adjusted Return म्हणतात.

SEBI ने Risk Adjusted Return (RAR) उघड करण्याची मागणी का केली आहे?

SEBI ने म्युच्युअल फंड कंपन्यांना Risk Adjusted Return (RAR) उघड करण्याची मागणी केली आहे जेणेकरून गुंतवणूकदारांना योग्य गुंतवणूक निर्णय घेण्यास मदत होईल आणि विक्रीच्या गैरप्रकारांना मर्यादा येईल.

Information Ratio (IR) म्हणजे काय?

Information Ratio (IR) हा कोणत्याही म्युच्युअल फंड स्कीम पोर्टफोलिओच्या Risk Adjusted Return (RAR) मोजण्यासाठी एक स्थापित आर्थिक गुणोत्तर आहे. हा म्युच्युअल फंड कंपन्याचे स्किल्स आणि बेंचमार्कच्या तुलनेत एक्स्ट्रा रिटर्न निर्माण करण्याच्या क्षमतेचे मोजमाप करतो.

गुंतवणूकदारांना Risk Adjusted Return (RAR) माहित असल्यास काय फायदा होतो?

जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडचा Risk Adjusted Return गुंतवणूकदारांना माहीत असेल तेव्हा तो फंड त्यांच्या गुंतवणुकीसाठी चांगला आहे की नाही, याचा निर्णय घेणे सोपे होते. कारण रिस्कला Adjust केल्यानंतर मिळणारा रिटर्न दर्शविला जातो.

1 thought on “गुंतवणूकदारांचे रक्षण: SEBI ने म्युच्युअल फंडचा Risk Adjusted Return (RAR) उघड करणे केले अनिवार्य, जाणून घ्या महत्वाचे बदल”

Leave a Comment