How to Make Money by Spending Money: पैसे सेव करायला कोणाला आवडत नाहीत? कारण तुम्ही जितके जास्त पैसे सेव करणार तेवढे जास्त पैसे तुमच्याकडे असतील इन्वेस्ट करण्यासाठी. पण प्रश्न असा आहे की आपल्या दररोजच्या लाइफमध्ये आपण नक्की कुठे पैसे सेव केले पाहिजे? आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया.
तुम्ही एकल असेल की, “Time is Money” आणि हे अगदी खर आहे. नवल रविकांत यांनी एका पॉडकास्टमध्ये सांगितल आहे की स्वताचा एक Hourly Rate फिक्स करा. आता हे Hourly Rate म्हणजे काय? Hourly Rate म्हणजे तुम्ही तासाभरात किती पैसे कमवता किंवा कमवू शकता यांच अंदाजे मोजमाप.
आता याने फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही एखाद काम करता ज्यामध्ये तुमचा खूप वेळ जातो, किंवा अशा ठिकाणी पैसे आणि टाइम देता ज्यातून तुम्हाला खूप कमी फायदा मिळतो. तर अशा वेळी ती कामे स्वता करण्यापेक्षा दुसऱ्याला करायला द्या.
मी पण या गोष्टीचा नीट विचार केला आणि माझ्या लाइफमध्ये मला कुठे कुठे माझा टाइम वाचवता येईल याचा विचार केला. आणि मी काही छोटे मोठे बदल केले जे मी तुम्हाला सांगतो.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: तुम्ही पैसे कमविणे की तुमच्या पैशाने तुमच्यासाठी पैसे कमविणे? काय चांगल आहे?
ऑफिससाठी बस नाही तर मेट्रोने जाणे
बसने जाताना 10 रुपये आणि येताना 10 रुपये असे दिवसाचे टोटल 20 रुपये लागायचे. त्यासोबत जवळजवळ 40-45 मिनिटे प्रवास होता. कारण ट्रॅफिक वेगेरे लागल की झाल कल्याण. मग मी ठरवल की मेट्रोने जावून बघू. मेट्रोने जाताना 20 रुपये आणि येताना 20 रुपये असे दिवसाचे टोटल 40 रुपये होतात पण माझ्याकडे मेट्रो कार्ड आहे म्हणून दिवसाचे फक्त 38 रुपये होतात. पण चांगली गोष्ट अशी आहे की हा प्रवास फक्त 20 मिनिटात होतो. तेही कसली गर्दी नाही ट्रॅफिक नाही.
तर मेट्रोवर पैसे खर्च करून मला फायदा झाला आहे का? खर तर होय. कारण या 20 मिनिटात मी दररोज माझ्या Kindle वर पुस्तक वाचतो. आणि त्या नॉलेजमुळे मी नवीन गोष्टी शिकतो ज्याचा वापर करून मी फ्युचरमध्ये एक्स्ट्रा पैसे कमवू शकतो. भलेही या गोष्टीला वेळ लागेल पण मला विश्वास आहे की याचा फायदा मला नक्कीच होईल.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Think and Grow Rich in Marathi: बँक अकाऊंटमध्ये पैसे येतील पण त्या आधी हे करा!
ऑफिसचे कपडे बाहेरून इस्त्री करून घेतो.
हे जेव्हा मी आईला बोललो, मला बोलते वेड लागलय तुला. घरी इस्त्री असताना बाहेर पैसे का घालवायचे. पण एक साध गणित करून पाहिल की अस करून मला किती खर्च येईल आणि किती टाइम वाचेल ज्याचा वापर मी इतर महत्वाच्या कामासाठी करू शकतो.
जवळचा इस्त्री वाला एका शर्टचे 8 रुपये घेतो. मी बँकमध्ये काम करतो त्यामुएल दूसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. तसेच बाकीच्या 2 शनिवारी कॅज्यूअल घालायच असत तर ते 2 शनिवार सोडले. अशा प्रकारे 4 आठवडे पकडले आणि त्याचे प्रत्येकी 5 दिवस तर टोटल 20 दिवस होतात. (आपण 2 दिवस एक्स्ट्रा घेऊ असे टोटल 22 दिवस).
8 रुपये * 22 दिवस = 176 रुपये (आता पॅन्टची इस्त्री करायला काही मेहनत नसते तर मी कधी कधी घरी करतो आणि कधी कधी इस्त्री वाल्याकडे देतो.) तर आपण टोटल महिन्याचा खर्च 200 रुपये घेऊ. आता हे 200 रुपये खर्च करून मला काय फायदा झाला?
पहिला फायदा असा की, जी ब्लॉग पोस्ट तुम्ही वाचत आहात ते मी सकाळी 7.15 ते 7.45 या दरम्यान लिहीत आहे. जितकी होईल तितकी. आणि मी ड्राफ्टमध्ये करून ठेवणार. संध्याकाळी घरी आलो की समोर काय लिहायच आणि पोस्ट करायच हे तयार असत. आणि सहसा सकाळी लिहिताना डोक्यात विचार पटापट येतात. दूसरा फायदा असा की माझ्या रुटीनमध्ये मी 15-20 मिनिटे एक्स्ट्रा Add करून सकाळी थोडा व्यायाम करतो. कारण संध्याकाळी घरी येऊन कधी मूड असतो तर कधी नाही.
म्हणून मी सकाळी इस्त्री करायचा वेळ फ्री (10 -15 मिनिटे) तसेच थोड लवकर उठून माझी 2 महत्वाची कामे निपटवून टाकतो. ज्यांचा फायदा मला लगेच नाही तर काही वेळाने नक्कीच मिळेल. ब्लॉग लिहून चांगले पैसे कमविता येतात. फक्त एवढंच की जरा वेळ लागतो. आणि व्यायाम करून फिट राहता येत. लॉन्ग टर्ममध्ये त्याचा फायदा खूप आहे.
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉How to Become Rich: श्रीमंत कसे व्हावे? (प्रत्यक्षात श्रीमंत होण्याचा प्रयत्न न करता)
पैसे कुठे खर्च करणे आणि कुठे नाही हा सगळा Mindset चा खेळ आहे.
तुम्ही नक्की पैसे कुठे सेव केले पाहिजेत आणि कुठे नाही याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. जर एखाद्या बूकवर तुम्ही आता 300 रुपये खर्च करणार आहात पण तुम्हाला त्यातून ज्या आयडिया मिळतील, जे नॉलेज मिळेल त्याचा वापर करून तुम्ही खूप काही करू शकता. तसेच एखाद्या कोर्सवर पैसे इन्वेस्ट करून तुम्ही जर इम्पॉर्टंट स्किल शिकणार असाल आणि त्यातून जर एक चांगली इन्कम बनविणार असाल तर इन्वेस्टमेंट फायद्याची असेल.
तुम्ही तुमच्या दररोजच्या लाइफमध्ये कुठे खर्च करत आहात ते बघा. जर छोटे मोठे खर्च करून जर तुम्हाला तुमचा टाइम परत मिळत असेल तर तिथे पैसे नक्की इन्वेस्ट करा. पण जो टाइम तुम्हाला एक्स्ट्रा मिळेल त्यामध्ये तुम्ही एक्स्ट्रा इन्कम कशी करता येईल किंवा काहीतरी नवीन गोष्ट शिकता येईल का ते बघा.
जस आपण सुरुवातीला बोललो कीं Time is Money. त्यामुळे आता तुमच्याकडे टाइम आहे तर त्याचा वापर पैसे कमविण्यासाठी करा. काही वर्षानंतर जेव्हा तुमच्याकडे पुरेसे पैसे असतील तेव्हा तुमचा टाइम तुम्ही हवा तसा वापरू शकता.
Keep Learning & Keep Investing!
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)