हेल्थ इन्शुरन्सवरील GST कमी करण्याची मागणी, तुमची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी स्वस्त होणार? | Health Insurance News

Confederation of General Insurance Agents’ Associations of India ने सरकारकडे अशी मागणी केली आहे की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर जो GST (Goods & Services Tax) घेतला जातो तो 18% आहे, तो कमी करून 5% करण्यात यावा. याने फायदा असा होईल की जास्तीत जास्त लोक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतील.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

Confederation of General Insurance Agents’ Associations of India ही मुख्य संस्था आहे जी Non-Life Insurance Agents च्या कामकाजावर लक्ष ठेवते. या संस्थेच म्हणणं असं आहे की हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर भरले जाणारे प्रीमियम गेल्या 5 वर्षांत डबल झाले आहे ज्याने हेल्थ इन्शुरन्स सेक्टरची ग्रोथ होतेय. पण लोकांनी घेतलेल्या हेल्थ हेल्थ इन्शुरन्स मध्ये वाढ होत नाहीये.

नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज ज्या इश्यू केल्या जातात त्यांची संख्या खूप कमी आहे. इन्शुरन्स एजंट असोसिएशनच्या मते पॉलिसी Renew करण्याचे रेट खूप कमी आहेत आणि याचं कारण आहे सतत वाढणारे पॉलिसी प्रीमियम आणि त्याच्या जोडीला महागाई.

ही पोस्ट वाचा 👉 हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही

इन्शुरन्स एजंट असोसिएशनने भारताच्या वित्त मंत्री यांना पत्र लिहून अशी विनंती केली आहे की GST रेट कमी करण्यात यावेत. कारण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी Renew करण्याचा रेट 65% – 75% आहे. यावरून समजतं की सामान्य ग्राहक जास्त प्रीमियम भरायला तयार नाहीत किंवा त्यांना ते परवडत नाहीत.

उदाहरण घ्यायचं झालं तर एका सीनियर सिटिजनला 1 लाख रुपयाचा कवर घ्यायचा असेल तर त्यावर त्याला 12,000 – 15,000 रुपये प्रीमियम भरावा लागतो. आता विचार करा 5 लाखाचं इन्शुरन्स घेण्यासाठी किती खर्च येईल. हेल्थ इन्शुरन्स ही प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे. पण हा हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी स्वस्त होतील.

ही पोस्ट वाचा 👉 Health Insurance क्लेमची समस्या? IRDAI चे नवे नियम तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार!

FAQ (सतत विचारले जाणारे प्रश्न)

Confederation of General Insurance Agents’ Associations of India कोणती संस्था आहे?

Confederation of General Insurance Agents’ Associations of India ही एक मुख्य संस्था आहे जी Non Life Insurance Agents च्या कामकाजावर लक्ष ठेवते.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवरील GST सध्या किती आहे आणि तो कमी करून किती करण्याची मागणी आहे?

सध्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीवर GST 18% आहे, आणि तो कमी करून 5% करण्याची मागणी करण्यात आली आहे.

GST कमी केल्यास काय फायदा होईल?

GST कमी केल्यास हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम कमी होतील आणि जास्तीत जास्त लोक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेऊ शकतील.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम गेल्या 5 वर्षांत का वाढले आहेत?

गेल्या 5 वर्षांत हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम डबल झाले आहेत. याचं कारण महागाई आणि इन्शुरन्स कंपन्यांच्या वाढत्या खर्चाचा आहे.

नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीजची संख्या का कमी आहे?

महागाई आणि वाढत्या प्रीमियममुळे लोक नवीन हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज घेण्यास कमी प्रमाणात तयार आहेत.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी renew करण्याचे रेट कमी का आहेत?

सतत वाढणारे पॉलिसी प्रीमियम आणि महागाईमुळे ग्राहकांना पॉलिसी renew करणे परवडत नाही.

हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीचा हक्क का आहे?

हेल्थ इन्शुरन्स प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे कारण ते वैद्यकीय खर्चाच्या अचानक येणाऱ्या आर्थिक ताणापासून संरक्षण देतो. पण हा हक्क तेव्हाच मिळेल जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी स्वस्त होतील.

GST कमी केल्यास सामान्य ग्राहकांना कसा फायदा होईल?

GST कमी केल्यास हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचे प्रीमियम कमी होतील, ज्यामुळे सामान्य ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्स घेणे आणि renew करणे परवडेल.

Leave a Comment