आजच्या फास्ट आणि सतत बदलणाऱ्या जगात आर्थिक स्वावलंबन (Financial Independence) मिळवणे आणि संपत्ती निर्माण करणे ही अनेकांची आकांक्षा बनली आहे. पण, एक बेसिक प्रॉब्लेम जो व्यक्तींना त्यांच्या आर्थिक उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यापासून अडवत असतो, तो म्हणजे मालमत्ता (Assets) आणि दायित्वांच्या (Labilities) मूलभूत संकल्पना समजून न घेणे.
“The rich acquire assets. The poor and middle class acquire liabilities that they think are assets.”
Robert Kiyosaki
रिच डॅड पुअर डॅड या बेस्टसेलिंग पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी सांगतात की, श्रीमंत लोक Assets जमा करतात. पण मिडल क्लास आणि गरीब लोक Liabilities ना जमा करतात जे त्यांना वाटत की Assets आहेत. या ब्लॉग पोस्टमध्ये, आपण Assets आणि Liabilities मधील महत्त्वपूर्ण फरक समजून घेऊ आणि आपल्या संपत्तीच्या मार्गात अडथळा आणू शकणाऱ्या Liabilities टाळून प्रभावीपणे मालमत्ता (Assets) बनविण्यासाठी 8 आवश्यक स्टेप्स सादर करू.
स्टेप नंबर 1: – Assets and Liabilities ची कन्सेप्ट समजा.
Assets म्हणजे अशा काही गोष्टी ज्या तुमच्या खिशात पैसे आणून देतात. Assets ही अशी संसाधने आहेत ज्यात इन्कम निर्माण करण्याची किंवा कालांतराने त्यांच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची क्षमता आहे. Assets मध्ये आपण घेऊ शकतो रीयल इस्टेट, स्टॉक्स, म्यूचुअल फंड्स किंवा एखादा छोटा मोठा बिझनेस ज्यातून इन्कम येत आहे.
दुसरीकडे, Liabilities ही आर्थिक दायित्वे किंवा कर्जे आहेत ज्यासाठी आपल्याला नियमित पैसे देणे आवश्यक आहे. Liabilities अशा काही गोष्टी ज्या तुमच्या खिशातून पैसे काढतात. Liabilities मध्ये आपण घेऊ शकतो कार लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड पेमेंट किंवा एखाद कर्ज ज्यातून आपली इन्कम कमी होते.
या दोघांमधला फरक समजणे हा आर्थिक साक्षरतेचा पाया आहे.
स्टेप नंबर 2: – इन्कम आणून देतील अशा Assets ना ओळखा.
संपत्ती(Wealth) निर्मितीची गुरुकिल्ली म्हणजे इन्कम देणाऱ्या Assets मिळविण्यावर लक्ष केंद्रित करणे. डिविडेंड देणारे काही चांगले स्टॉक्स, चांगला रिटर्न देणारे म्यूचुअल फंड्स, शक्य असेल तर एखादी रीयल इस्टेटमधील इनवेस्टमेंट. अशा Assets मधून रोख रक्कम निर्माण येते. त्यामुळे असे Assets तुम्हाला कसे एकत्रित करता येतील यावर फोकस करा.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही इन्कम देणाऱ्या Assets मध्ये पैसे इनवेस्ट करता तेव्हा तुम्ही तुमच्या आर्थिक भविष्यात इनवेस्ट करत असता. जर तुम्हाला तुमच आर्थिक भविष्य मजबूत हवंय तर आता जास्तीत जास्त पैसे चांगल्या Assets मध्ये इनवेस्ट करा.
स्टेप नंबर 3: – किंमत वाढेल अशा संधी शोधा (Price Appreciation)
वेळोवेळी वाढीची क्षमता असलेल्या Assets मध्ये इनवेस्ट करणे महत्वाचे आहे. हे असे Assets आहेत ज्यांची किंमत वाढते ज्यामुळे आपण आपली संपत्ती (Wealth0 वाढवू शकता.
एक साध उदाहरण घेऊ. समजा तुम्ही आज एखादा चांगला स्टॉक घेतलात ज्याची किंमत 500 रुपये आहे. आणि काही वर्षानंतर या स्टॉकची किंमत 700 रुपये झाली यालाच बोलतात Price Appreciation.
The way to make money is to buy when blood is running in the streets.
George Soros
अब्जाधीश इन्वेस्टर आणि दानशूर जॉर्ज सोरोस सांगतात की, जेव्हा मार्केटमध्ये रक्त म्हणजेच मार्केट पूर्ण डाऊन होत. सगळ्या स्टॉकच्या किंमती अगदी लाल लाल होतात तीच संधी असते स्टॉक खरेदी करायची. ( ते खऱ्या रक्तबदल बोलत नाहीयेत) पण स्टॉक निवडताना स्वत रिसर्च करा, बिझनेस नीट समजून घ्या मगच तो स्टॉक खरेदी करा.
स्टेप नंबर 4: – Liabilities कमी करा.
आपल्याला चांगलच माहीत आहे की काही Labilities घेणे अगदी गरजेच असत जस की घरासाठी घेतलेल होम लोन किंवा बिझनेस विस्तारासाठी घेतलेल लोन घेणे आवश्यक असते. पण अनावश्यक कर्ज घेणे आपण नेहमीच टाळल पाहिजे. तुम्ही नक्की कुठे कुठे खर्च करता हे पहिल लक्षात घ्या. उगाच होणारा खर्च टाळण्याचा प्रयत्न करा जस की क्रेडिट कार्डचे कर्ज कमी करा किंवा शॉपिंग.
स्टेप नंबर 5: – Passive Income बनवा.
आजच्या टाइममध्ये एका इन्कमवर जगणे अगदी कठीण झाल आहे. एखादी दुसरी इन्कम कशी बनवता येईल याचा विचार आपल्या प्रत्येकाला करावा लागेल. (आर्थिक स्वातंत्र्यासाठी पॅसिव इन्कम काय आहे आणि ती कशी बनवायची? हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ही पोस्ट वाचू शकता.)
Passive Income म्हणजे अशी इन्कम जी तुम्ही तुमचा टाइम देऊन कमवत नाही. सुरुवातीला तुम्हाला थोडा टाइम द्यावा लागेल पण त्यानंतर यातून आपोआप कमाई करता आली पाहिजे तरच ती Passive Income झाली.
छोटी का होईना पण Passive income बनवा आणि आपल्याकडे यासाठी खूप मार्ग आहेत.
- ब्लॉगिंग
- यूट्यूब
- Freelancing
- इनस्टा पेजेस
- आणि असे अनेक मार्ग
स्टेप नंबर 6: – तुमच्या Asset पोर्टफोलियोला Diversify करा.
रिस्क मॅनेज करण्यासाठी विविधीकरण (Diversification) ही एक आवश्यक टेक्निक आहे. Diversification करणे म्हणजे थोडे पैसे स्टॉक्स, बाँड्स, रिअल इस्टेट आणि पर्यायी गुंतवणूक यासारख्या विविध गुंतवणूक वर्गांमध्ये वाटप करणे. पोर्टफोलिओला Diversify केल्याने एकाच Asset मध्ये पैसे इनवेस्ट करायची रिस्क कमी होते.
स्टेप नंबर 7: – सतत काहीतरी नवीन शिका.
स्टॉक मार्केत आणि Investing strategies या सतत विकसित होत असतात. काही ना काही नवीन Polycies सतत येत असतात. त्यामुळे आपल्याला सतत काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार राहील पाहिजे.
“An investment in knowledge pays the best interest.”
Benjamin Graham
प्रसिद्ध गुंतवणूकदार बेंजामिन ग्रॅहम संगतात की “ज्ञानातील गुंतवणुकीवर सर्वोत्तम व्याज देते.” त्यामुळे तुमची आर्थिक साक्षरता वाढविण्यासाठी पुस्तके वाचा, चांगल्या यूट्यूब विडियोस बघा, पॉडकास्ट एका तसेच मराठी फायनान्स सारख्या ब्लॉग्स वाचा. या नॉलेजमुळे तुम्ही नक्की कोणत्या Asset मध्ये इनवेस्ट केल पाहिजे, का केल पाहिजे आणि किती वेळेसाठी केल पाहिजे इ. प्रश्न सुटतील आणि तुम्ही पैसे इनवेस्ट करताना योग्य निर्णय घेऊ शकाल.
स्टेप नंबर 8: – लॉन्ग टर्म माइंडसेट बनवा.
संपत्ती(Wealth) निर्माण करणे ही मॅरेथॉन आहे, फक्त छोटी शर्यत नाही. शॉर्टमध्ये छोटा मोठा प्रॉफिटपेक्षा तुम्ही नेहमी लॉन्ग टर्ममध्ये सातत्यपूर्ण संपत्ती बनविण्याला प्राधान्य द्या. श्रीमंत होणे ही Get rich quick स्कीम नाही हे समजा.
“The big money is not in the buying or selling, but in the waiting.”
Charlie Munger
अब्जाधीश गुंतवणूकदार चार्ली मंगर यांनी म्हटल्याप्रमाणे, मोठा पैसा खरेदी-विक्रीत नाही, तर प्रतिक्षेत आहे. सतत हे वीक ते घे या भानगडीत पडू नका याने शॉर्ट टर्ममध्ये फायदा होत असेल पण लॉन्ग टर्म Wealth नाही बनत. तुमच्या investing च्या प्रवासात संयम आणि शिस्त बाळगा. अस करून तुम्ही हळूहळू का होईना पण श्रीमंत नक्कीच व्हाल.
Asset आणि Liabilities मधील फरक समजून घेणे आर्थिक यश प्राप्त करण्यासाठी मूलभूत आहे. इन्कम आणून देणाऱ्या Assets ना प्राधान्य देऊन, Liabilities कमी करून, तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणून आणि स्वत: ला सतत शिक्षित करून आपण संपत्ती उभारणीसाठी एक भक्कम पाया बनवू शकता.
Happy Investing!
इतर काही महत्वाच्या पोस्ट नक्की वाचा:- म्यूचुअल फंड कंपनीकडे तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?