How to Build Wealth with Low SALARY in Marathi: सॅलरी जितकी मिळेल तितकी कमी वाटते. आणि अशी परिस्थिति जवळजवळ आपल्या सगळ्यांची असते. जे बिझनेस करतात त्यांची गोष्ट वेगळी असेल. पण आता सॅलरी कमी असली तरी वेल्थ तर बनवायची आहेच ना.
म्हणून कमी सॅलरीमधून लॉन्ग टर्म वेल्थ नक्की कशी बनवायची त्यावर काही प्रॅक्टिकल टिप्स आपण आज या ब्लॉग पोस्टमध्ये शिकणार आहोत.
चला तर सुरुवात करूया.
1) वेल्थ बनविण्यावर विश्वास ठेवा.
तुमची सॅलरी कितीही असुदेत.
तुम्ही स्वताचा माइंडसेट असा बनविला पाहिजे की जे पैसे माझ्या हातात आहे त्याचा योग्य वापर करून मी वेल्थ नक्की बनवेन. प्रत्येकाची सॅलरी खूप वेगळी असेल पण त्यानुसार प्रत्येकाचे खर्च देखील वेगळे असतात.
लॉन्ग टर्म वेल्थ बनविण्यासाठी स्वतावर विश्वास त्यासोबत Financial Discipline तुम्हाला शिकाव लागेल.
2) 50-30-20 फॉलो करा
फायनॅन्सचा हा एक खूप प्रसिद्ध रूल आहे आणि कामाचा पण आहे. या रूलनुसार तुमची जी काही सॅलरी आहे तिला 3 भागांमध्ये वाटा. ते 3 भाग पुढीलप्रमाणे असतील.
50% – तुमच्या गरजा (घर खर्च, रेंट, बिल इ.)
30% – तुमचे शौक (शॉपिंग, ट्रॅवल, GF ला गिफ्ट इ)
20% – सेविंग आणि इन्वेस्टमेंट (SIP, स्टॉक, इन्शुरेंस)
आता सॅलरीमधून 20% पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला सेव आणि इन्वेस्ट करता येत असेल तर नक्की करा.
3) इक्विटि आणि Debt मध्ये योग्य वाटप
जी 20% रक्कम तुम्ही सेव करणार आहात ती तुम्हाला इक्विटि आणि Debt मध्ये इन्वेस्ट करायची आहे. आता इक्विटिमध्ये किती आणि Debt मध्ये किती हा प्रश्न येतो. पण ते तुमच्या रिस्क क्षमतेवर अवलंबून आहे तरी एक सिम्पल आयडिया देतो.
असे पैसे जे तुम्हाला लगेच लागणार आहेत ते तुम्ही कमी Risky अशा Debt Assets मध्ये इन्वेस्ट करा. जस की एमर्जन्सि फंड हा नेहमी अशा ठिकाणी ठेवावा जिथून पटकन लगेच काढता येईल. आणि यासाठी FD हा ऑप्शन बेस्ट आहे.
आता उरलेले पैसे तुम्हाला इक्विटि म्हणजे शेअर मार्केटमध्ये इन्वेस्ट करायचे आहेत. आता तुम्ही हे पैसे म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट करू शकता किंवा डायरेक्ट स्टॉक्समध्ये इन्वेस्ट करू शकता. प्रत्येकाने स्वताचे Financial Goals आणि रिस्क क्षमता बघून पैसे इन्वेस्ट केले पाहिजेत.
4) कमी सॅलरीवर राहून चालायच नाही
तुमची सॅलरी आता कमी असेल पण ती कशी वाढवता येईल याचा विचार तुम्ही केला पाहिजे.
तुम्ही जिथे काम करता तिथे तुम्हाला जर मनासारखी सॅलरी वाढ मिळत नसेल तर तुम्ही जॉब सोडा अस मी अजिबात सांगणार नाही कारण ते खूपच Risky होत. पण तुम्ही तुमच्या फ्री टाइममध्ये एक्स्ट्रा इन्कम कशी बनवता येईल याचा विचार करा.
समजा तुमची सॅलरी 20,000 आहे आणि साइड इन्कममधून तुम्ही महिन्याला 2000 रुपये कमविता तर विचार करा तुम्ही तुमच्या सॅलरीच्या 10% रक्कम बनवत आहात. तुम्हाला जॉबवर सॅलरी वाढ मिळत नाही तर काय झाल तुम्ही स्वतालाच 10% सॅलरी वाढवून प्रमोशन देत आहात अस समजा.
5) लॉन्ग टर्म नुसत बोलून होणार नाही
आता लॉन्ग टर्म म्हणजे नक्की किती हे तुम्ही स्पष्ट करा. मी माझ उदाहरण दिल तर 7 पेक्षा कमी वर्ष म्हणजे लॉन्ग टर्म मी समजतच नाही. आणि खर बोलू तर आपल्याला पुढची 20 वर्ष ही लॉन्ग टर्म वेल्थसाठी द्यावी लागणार आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमचा विश्वास, Financial Discipline डगमगल नाही पाहिजे.
It’s not timing the market, but time in the market that matters.
Timing – योग्य टाइमची वाट बघत बसू नका. पैसे आहेत तर नियमितपणे इन्वेस्ट करा.
Time in the market – मार्केट वर असो की खाली तुम्हाला लॉन्ग टर्ममध्ये त्यामध्ये टिकून राहायच आहे.
तुम्ही कोणत्या तारखेला SIP करता किंवा कधी स्टॉक विकत घेता याचा लॉन्ग टर्ममध्ये फारसा फरक पडत नाही. आता इन्वेस्ट करतो, नंतर इन्वेस्ट करतो, अजून मार्केट खाली येऊदेत अस करत बसलात तर झाला सत्यानाश. म्हणून बेस्ट टाइमिंगची वाट बघू नका, बस इन्वेस्ट करा.
Keep Investing, Wealth is Coming!
2 thoughts on “कमी सॅलरीमधून वेल्थ कशी बनवायची? | How to Build Wealth with Low SALARY in Marathi”