31 मार्चला आर्थिक वर्ष संपत आणि 1 एप्रिलला एक नवीन आर्थिक वर्ष सुरू झाल की बँकमध्ये एक नोटिस लागते ती म्हणजे 15H आणि 15G फॉर्म भरा. किंवा तुमच्या बँकेकडून तुम्हाला मेसेज तरी नक्की आला असेल.
आता हे 15H आणि 15G फॉर्म नक्की काय आहे? कोणी भरला पाहिजे आणि का? ते आपण आजच्या पोस्टमद्धे समजून घेणार आहोत.
15H आणि 15G फॉर्म काय आहे?
बँकमध्ये तुम्ही जेव्हा FD किंवा RD करता, तुम्ही केली नसेल तर तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीने नक्कीच केली असेल. तर त्या FD आणि RD वर बँक तुम्हाला व्याज देत असते.
आता हा व्याज टॅक्स फ्री नसतो. त्यावर टॅक्स लावला जातो. पण तुम्हाला जर हा टॅक्स म्हणजेच TDS (Tax Deducted at Source) वाचवायचा असेल तर तुम्ही बँकेला 15H किंवा 15G फॉर्म भरून द्यायचा असतो.
15H की 15G यापैकी नक्की कोणता फॉर्म भरायचा?
FORM 15G
- जर तुमच वय 60 वर्षाच्या खाली असेल आणि तुम्ही भारतीय रहिवासी, HUF, ट्रस्ट इ. कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्ही 15G फॉर्म भरला पाहिजे. (लक्षात घ्या कंपनी किंवा फॉर्म 15G किंवा 15H फॉर्म भरू शकत नाही.
- जर तुमच्या FD आणि RD वरील वर्षभराचा व्याज हा 40,000 रुपयाच्या वर असेल तर तुम्ही 15G फॉर्म भरा. आणि जास्तीत जास्ती लिमिट 2,50,000 ची असते. याहून जास्त व्याज असेल तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागेल.
FORM 15H
- जर तुमच वय 60 वर्षापेक्षा जास्त असेल म्हणजे तुम्ही सीनियर सिटिजन असाल तर तुम्ही 15H फॉर्म भरला पाहिजे. (तुम्ही जर ही पोस्ट वाचत आहात तर तुम्ही तरुण असाल पण तुमच्या घरी कोणी सीनियर सिटिजन असेल तर त्यांना हा फॉर्म भरायला नक्की सांगा)
- जर तुमच्या FD आणि RD वरील वर्षभराचा व्याज हा 50,000 रुपयाच्या वर असेल तर तुम्ही 15H फॉर्म भरा. आणि जास्तीत जास्ती लिमिट 2,50,000 ची असते. याहून जास्त व्याज असेल तर मात्र तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करावा लागेल.
एक गोष्ट लक्षात घ्या, जर एखादा व्यती राहतो बाहेर देशात पण FD आणि RD भारतामध्ये केले आहेत तर तो या फॉर्मचा फायदा घेऊ शकत नाही.
15H आणि 15G फॉर्म आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला का भरायचा?
अनेक लोक खास करून सीनियर सिटिजन, यांची जास्त इन्वेस्टमेंट ही FD किंवा RD मध्ये असते. आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर त्यांचे दैनंदिन खर्च पुरे होत असतात. आता यात पण जर टॅक्स कापला गेला तर त्यांना खूप मोठ नुकसान होत. कारण या वयात त्यांची दुसरी कोणती इन्कम नसते.
15H किंवा 15G फॉर्म नाही भरला आणि व्याज कापला गेला तर काय करायच?
जर तुम्ही 15H किंवा 15G फॉर्म भरायला विसरलात आणि तुमचा व्याज कापला गेला. आता तो तुम्हाला परत हवाय तर तुम्हाला ITR (Income Tax Return) भरावा लागेल. तुम्ही टॅक्स भरायच्या लिमिटमध्ये असाल की नसाल पण हा व्याज परत रिफंड म्हणून घेण्यासाठी ITR भरावा लागेल. ITR भरणे अजून एक एक्स्ट्रा काम होवून जात. त्यापेक्षा आठवणीने 15H किंवा 15G फॉर्म भरा.
आज 1 एप्रिल 2024 आहे. (जेव्हा मी ही पोस्ट लिहितोय) आज आर्थिक वर्षाचा पहिला दिवस आहे. 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 अस नवीन आर्थिक वर्ष चालू झाल आहे. आणि या वर्षाचा TDS कापला जावू नये तर लवकरच तुम्ही बँकमध्ये जावून 15H किंवा 15G फॉर्म सबमिट करा.
तुमच्या FD किंवा RD नसतील तर तुमच्या आई बाबा, आजी आजोबा, यांना घरी विचारा. आणि हा फॉर्म सबमिट करा. लक्षात घ्या की हा फॉर्म वर्षामध्ये एकदाच भरायचा असतो.
पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!
इतर पोस्ट वाचा 👉Mutual Fund RE-KYC: 31 मार्चच्या आधी हे करा, नाहीतर बंद होतील म्यूचुअल फंड व्यवहार