Warren Buffett Quotes in Marathi: जेव्हा जेव्हा इन्वेस्टींग या विषयावर चर्चा केली जाईल तेव्हा तेव्हा एक नाव अगदी आदराने घेतले जाईल ते म्हणजे वॉरेन बफेट. आता अस का? याच कारण तुम्हाला माहित असेलच.
वॉरेन बफेट यांनी वयाच्या 11 व्या वर्षी इन्वेस्टींगला सुरुवात केली. एवढ्या लहान वयातच त्यांना समजल होत की थोडे पैसै गुंतवले तरी चालतील पण Compounding च्या मदतीने मी लाँग टर्ममध्ये श्रीमंत होणार आहे आणि अगदी तसच झालं.
आज वॉरेन बफेट हे जगातील 8 वे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची टोटल Net worth आजच्या तारखेला $117 बिलियन आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण त्यांचे 5 मोलाचे विचार समजून घेणार आहोत, जे आपल्याला आपल्या इन्वेस्टींगच्या प्रवासात लाँग टर्मसाठी टिकून राहण्यास मदत करतील. चला तर सुरुवात करूया.
जॉइन टेलीग्राम चॅनल @marathifinance
1) स्टॉक मार्केट डिझाईनच यासाठीच केलय की ते ॲक्टिवकडून Patient राहणाऱ्याकडे पैसे घेऊन जाईल.
स्पष्टीकरण: वॉरेन बफेट सांगतात की जे लोक स्टॉक मार्केटमध्ये सतत ॲक्टिव असतात – हा शेअर घे, तो शेअर विक – अशा लोकांकडून जे लोक नेहमी संयमी असतात आणि स्टॉक मार्केटमध्ये लॉन्ग टर्ममध्ये टिकून राहतात त्यांच्याकडे पैसे ट्रान्सफर होतात. याच कारण अस की सतत ॲक्टिव असणारे लोकं शेअर्सची कधी पुरेपूर वाढ होवून देतच नाहीत. म्हणून जे संयमी असतात ते खूप सारे पैसे कमवतात. त्यामुळे तुम्ही संयम बाळगा कारण तुम्ही श्रीमंत होणार एवढ नक्की.
2) माझा आवडता होल्डिंग पीरियड हा आयुष्यभर आहे.
स्पष्टीकरण: बफेट यांच्या या कोटचा अर्थ असा आहे की ते कोणताही शेअर आयुष्यभरासाठी घेत असल्याच्या Mindset ने विकत घेतात. त्यामुळे ते शेअर नीट निवडतात आणि लॉन्ग टर्मसाठी विश्र्वास ठेवतात. ते शेअर निवडताना अजिबात घाई करत नाहीत. आणि तुम्हाला सुद्धा हेच करायच आहे कमी शेअर निवडा पण चांगले शेअर निवडा.
3) मी स्टॉक मार्केटमध्ये झटपट पैसे बनविण्याचा विचार कधी केलाच नाही. मी याच धारणेने स्टॉक खरेदी करतो की हे लोकं आता पुढील १० वर्ष काय स्टॉक मार्केट पुन्हा उघडत नाहीत.
स्पष्टीकरण: बफेट यांच्या मते, झटपट पैसे कमावण्याचा विचार कधीच करू नये. त्याऐवजी लॉन्ग टर्मचा दृष्टिकोन ठेवून शेअर खरेदी करावा. बाजारातील उतार-चढावांवर जास्त लक्ष न देता, लॉन्ग टर्म वाढीसाठी स्टॉक निवडणे महत्त्वाचे आहे.
ही पोस्ट वाचा तुमच्या वीकेंडचा वापर आर्थिक स्वातंत्र्यासाठी कसा कराल?
4) जर तुम्ही 10 वर्षांसाठी स्टॉक घेण्यास तयार नसाल तर 10 मिनिटांसाठी तो स्टॉक घेण्याचा विचारही करू नका.
स्पष्टीकरण: वॉरेन बफेट यांनी सांगितलं आहे की तुम्हाला जो स्टॉक घ्यायचा आहे तो तुम्ही १० वर्षांसाठी घेऊ शकत नसाल तर तो स्टॉक फक्त १० मिनिटांसाठी घेण्याचा विचारही करू नका. हे लॉन्ग टर्म गुंतवणुकीच्या महत्त्वावर जोर देते आणि तात्पुरत्या प्रॉफिटवर केंद्रित होण्यापेक्षा लॉन्ग टर्ममध्ये होणारी वाढ आणि स्थिरतेवर भर देते.
5) आज कोणीतरी झाडाच्या सावलीत बसले आहे कारण कोणीतरी खूप पूर्वी झाड लावले होते.
स्पष्टीकरण: बफेट यांची ही शिकवण आहे की भविष्यातील लाभांसाठी आज योग्य गुंतवणूक करा. कालांतराने त्याचे फायदे दिसून येतील. सातत्याने केलेल्या गुंतवणुकीमुळे भविष्यात मोठे फायदे मिळू शकतात. संयम आणि लॉन्ग टर्म विचारसरणीच्या मदतीने तुम्ही तुमचे आर्थिक उद्दिष्ट साध्य करू शकता.
ही पोस्ट वाचा मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे?
निष्कर्ष:
वॉरेन बफेट यांच्या या विचारांमधून एक महत्त्वाचा धडा घेता येतो की संयम, लॉन्ग टर्म विचारसरणी आणि योग्य गुंतवणूक हे श्रीमंतीकडे नेणारे मार्ग आहेत. त्यांच्या या विचारांनुसार आपणही आपल्या गुंतवणुकीमध्ये संयम बाळगून, लॉन्ग टर्म दृष्टिकोन ठेवून, आणि योग्य निर्णय घेऊन आर्थिक यश मिळवू शकतो. गुंतवणुकीत यश मिळविण्यासाठी तात्पुरता फायदा न पाहता लॉन्ग टर्ममध्ये होणारे फायदे कसे मिळवता येतील याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.
Frequently Asked Questions
प्रश्न 1: वॉरेन बफेट यांच्या मते संयमाचे महत्त्व काय आहे?
उत्तर: वॉरेन बफेट यांच्या मते, स्टॉक मार्केटमध्ये संयम ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक सतत ॲक्टिव असतात, ते लॉन्ग टर्ममध्ये टिकून राहणाऱ्यांच्या तुलनेत कमी पैसे कमवतात. संयम ठेवून शेअर्सची किमत वाढ होऊ दिल्यास जास्त लाभ मिळतो.
प्रश्न 2: वॉरेन बफेट कोणत्याही शेअरला आयुष्यभरासाठी का धरतात?
उत्तर: वॉरेन बफेट यांच्या मते, शेअर निवडताना त्यांना त्यात लॉन्ग टर्मसाठी विश्वास ठेवायचा असतो. त्यामुळे त्यांनी निवडलेले शेअर नीट तपासून घेतलेले असतात आणि त्यांचे होल्डिंग पीरियड आयुष्यभराचे असते.
प्रश्न 3: वॉरेन बफेट झटपट पैसे कमवण्याचा विचार का करत नाहीत?
उत्तर: बफेट यांना विश्वास आहे की स्टॉक मार्केटमध्ये झटपट पैसे कमावण्याचा विचार करणे चुकीचे आहे. त्याऐवजी, लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करणे आणि बाजारातील उतार-चढावांवर लक्ष न देता शेअर्सची निवड करणे महत्त्वाचे आहे.
प्रश्न 4: "जर तुम्ही 10 वर्षांसाठी स्टॉक घेण्यास तयार नसाल तर 10 मिनिटांसाठी तो स्टॉक घेण्याचा विचारही करू नका." या विचाराचा अर्थ काय आहे?
उत्तर: या विचाराचा अर्थ असा आहे की कोणताही स्टॉक घ्यायचा असल्यास तो १० वर्षांसाठी घेण्यास तयार असणे आवश्यक आहे. हे लॉन्ग टर्म गुंतवणुकीच्या महत्त्वावर जोर देते आणि तात्पुरत्या प्रॉफिटवर केंद्रित होण्यापेक्षा लॉन्ग टर्ममध्ये होणारी वाढ आणि स्थिरतेवर भर देते.
प्रश्न 5: वॉरेन बफेट यांच्या विचारांनुसार यशस्वी गुंतवणुकीसाठी कोणते मुख्य तत्व आहेत?
उत्तर: संयम, लॉन्ग टर्म विचारसरणी आणि योग्य गुंतवणूक ही यशस्वी गुंतवणुकीची मुख्य तत्वे आहेत. तात्पुरता फायदा न पाहता, लॉन्ग टर्ममध्ये होणारे फायदे कसे मिळवता येतील याचा विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे.