Sukanya Samriddhi Yojana: नुकतंच सरकारने सुकन्या समृद्धी योजनाचे नवीन इंटरेस्ट रेट जाहीर केले आहेत. आधी या योजनेवर 8% चा रिटर्न प्रती वर्ष मिळत होता पण आता हा रिटर्न 20 basis points ने वाढून 8.20% झाला आहे. सरकारने ही योजना खास करून मुलींसाठी चालू केली आहे. आपण आजच्या पोस्टमध्ये या योजनेबद्दल डीटेलमध्ये समजून घेऊ. पण त्या आधी काय आहे ही सुकन्या समृद्धी योजना?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही मुलींच्या भविष्यासाठी बचत करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेचा एक पार्ट म्हणून सरकारने 2015 मध्ये सुरू केलेली योजना आहे. ही एक फिक्स इन्कम इन्वेस्टमेंट आहे ज्याद्वारे तुम्ही नियमित पैसे जमा करू शकता आणि त्यावर इंटरेस्ट मिळवू शकता.
तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा वापर करून इन्कम टॅक्स टॅक्सच्या सेक्शन 80C च्या अंतर्गत आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपर्यंतच्या टॅक्स deduction चा दावा देखील करू शकता. (जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर)
Key Features of Sukanya Samriddhi Yojana (SSY) | |
---|---|
Interest Rate | 8.20% दर वर्षी |
Minimum Investment | Rs. 250 वर्षाला |
Maximum Investment | Rs. 1.5 लाख वर्षाला |
Maturity Period | जेव्हा मुलगी 21 वर्षाची होते किंवा 18 वर्षानंतर लग्नाच्या वेळी |
Eligibility to age limit | मुलीच वय 10 वर्ष किंवा त्या खाली असायला हव |
Sukanya Samriddhi Yojana Account चे काही महत्वाचे Features
- Interest rate: सरकार दर तीन महिन्यांनी सुकन्या समृद्धी योजनाचे रेट फिक्स करते. नवीन वर्ष 2024 सुरू व्हायच्या आधी सरकारने या योजनेचा नवीन रेट 8.20% फिक्स केला आहे. हा इंट्रेस्ट मॅच्युरिटीच्या वेळी मिळते.
- Deposit Ammount : तुम्ही वर्षाला कमीत कमी 250 रुपये या स्कीममध्ये इन्वेस्ट करू शकता. आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 लाख रुपये इन्वेस्ट करू शकता. या स्कीममध्ये तुम्ही तुम्हाला हव्या तितक्या वेळ पैसे भरू शकता. पण जर तुम्ही मिनिमम रक्कम भरायला फेल झालात तर तुमच अकाऊंट बंद होईल आणि ते चालू करण्यासाठी तुम्हाला 100 रुपये भरावे लागतील.
- Lock-in period: सुकन्या समृद्धी योजनासाठी 21 वर्षाचा लॉक इन पीरियड असतो. उदाहरणार्थ: या योजना सुरू करताना मुलीच वय 3 वर्ष असेल तर मॅच्युरिटीची तारीख मुलीच वय 24 वर्ष होईल तेव्हा असेल.
- Transfer of accounts: जर तुमचा राहण्याचा पत्ता बदलला तर तुम्ही तुमच सुकन्या समृद्धी अकाऊंट कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा बँक ब्रांचमध्ये ट्रान्सफर करू शकता. त्यासाठी फक्त नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. इतर काही कारणांसाठी अकाऊंट ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला 100 रुपये फी भरावी लागेल.
-
The number of accounts: एका मुलीच्या नावावर फक्त एकच अकाऊंट ओपेन करता येत. आणि एखाद्या घरी जास्तीत जास्त दोन अकाऊंट ओपन करू शकता. पण तुम्ही दोन पेक्षा जास्त अकाऊंट ओपन करू शकता जर घरी एकाच वेळी तीन मुली जन्माला आल्या असतील किंवा आधी एक मुलगी झाली आणि मग दोन जुळ्या मुली झाल्या.
Sukanya Samriddhi Yojana Account साठी Eligibility Criteria
जर अकाऊंट मुलीच्या नावाने ओपन करत असाल तर
- सुकन्या समृद्धी अकाऊंट हे एक मुलगी ओपन करू शकते
- मुलीच वय जास्तीत 10 वर्ष असल पाहिजे पण सरकारने त्यानंतर एक वर्षाचा एक्स्ट्रा पीरियड दिला आहे (Grace Period) दिला आहे.
- मुलीच वयाचा दाखला तुम्हाला सबमिट करावा लागेल. (Age Proof)
जर तुम्ही अकाऊंट मुलीच्या वतीने ओपन करत असाल तर
- जर तुम्ही मुलीचे पालक किंवा तिचे कायदेशीर पालक असाल तरच तुम्ही तुमच्या मुलीच्या वतीने हे अकाऊंट ओपन करू शकता.
- प्रत्येक पालक किंवा कायदेशीर पालक जास्तीत जास्त दोन अकाऊंट ओपन करू शकतात.
Sukanya Samriddhi Yojana Account चे फायदे
- ही एक सरकारी योजना आहे जी पक्का रिटर्न देते. नुकतच सरकारने सुकन्या समृद्धी योजनासाठी नवीन रेट जाहीर केले आहेत. सध्याचा रेट 8.20% वार्षिक रिटर्न देते, जे इतर सर्व सरकारी योजनांपेक्षा जास्त आहे.
- तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेचा वापर करून इन्कम टॅक्स टॅक्सच्या सेक्शन 80C च्या अंतर्गत आर्थिक वर्षात ₹1.5 लाखांपर्यंतच्या टॅक्स deduction चा दावा देखील करू शकता. (जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर)
- तुमच्याकडे घरी मुलगी असल्यास, तुम्ही निश्चितपणे हा इन्वेस्टमेंट ऑप्शन निवडू शकता, कारण तुम्ही तुमच्या इन्वेस्टमेंटवर फिक्स रिटर्न मिळवू शकता. हमॅच्युरिटीची रक्कम मुलीच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी वापरली जाऊ शकते.
- तुम्ही कमीत कमी रु. 250 पासून सुकन्या समृद्धी अकाऊंट ओपन करू शकता. तसेच, तुमचे खाते Active ठेवण्यासाठी तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. हा संगळ्याना परवडणारा पर्याय आहे.
Sukanya Samriddhi Yojana Account मधून पैसे कसे काढाल?
1. Maturity Withdrawal: 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पैसे काढू शकता आणि त्यावर काही टॅक्स द्यावा लागत नाही. यासाठी तुम्हाला Withdrawal चा फॉर्म, आयडी प्रूफ, रहिवासी दाखला इ. डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.
2. Partial Withdrawals (up to 50%): मुलीच्या शिक्षणसाठी किंवा लग्नासाठी पैसे काढता येतात. जर शिक्षणासाठी हवे असतील तर मुलीच वय 18 वर्ष पूर्ण हव आणि 10 पर्यंत शिक्षण झालेल हव.
3. Premature Account Closure: योजना पूर्ण व्हायच्या आधीच पैसे काढायचे असतील तर काही कंडिशन आहेत त्या खालीलप्रमाणे
- मुलगी 18 वर्ष झाली आणि लग्न करत आहे तर तुम्ही एक महिन्याआधी किंवा लग्न झाल्यानंतर 3 महिन्यांनी पैसे काढायला अप्लाय करू शकता. पैसे काढल्यावर 50% रककमेवर कसलाही टॅक्स लागणार नाही.
- मुलीच निधन झाल्यास पैसे काढताना मृत्यू दाखला सबमिट करावा लागेल आणि सगळे पैसे पालकाला मिळणार.
- मुलीच राहण्याचा ठिकाणं बदलत आहे आणि तेव्हा अकाऊंट बंद करत असाल तर गरेजच डॉक्युमेंट सबमिट करा जस की रहिवासी दाखला इ.
- सुकन्या समृद्धी अकाऊंटला 5 वर्ष झाली आहेत पण आता पुढे पैसे भरणे कठीण झालं आहे कारण पालकाची इन्कम नाहीये, मुलीच आजारपण इ.
4. Interest on Premature Closure: या पेक्षा काही इतर कारणांसाठी सुकन्या समृद्धी अकाऊंटला बंद करत असाल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस खात्यावर जो इंट्रेस्ट मिळतो तोच रिटर्न या योजनेवर मिळेल.
सुकन्या समृद्धी अकाऊंट कस ओपन कराल? (How to open a Sukanya Samriddhi Account)
आता तुम्हाला सुकन्या समृद्धी अकाऊंटबद्दल सगळी माहिती मिळाली आहे तर ते कस ओपन करायच हे समजून घ्या.
Step 1: जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा बँक ब्रांचमध्ये जा
Step 2: अकाऊंट ओपनिंग फॉर्म भरा आणि सोबत KYC डॉक्युमेंट्स द्या
Step 3: पहिली रक्कम 250 रुपये जमा करा (चेक, कॅश किंवा डिमांड ड्राफ्ट)
Step 4: तुमच अकाऊंट ओपन झाल की तुम्हाला पासबुक दिल जाईल.
Conclusion
जर तुम्ही तुमच्या मुलीसाठी एक चांगला इन्वेस्टमेंट ऑप्शन बघत आहात तर सुकन्या समृद्धी योजना तुमच्यासाठी एक योग्य आणि उत्तम ऑप्शन आहे. सरकारी योजना असल्याने रिटर्न पक्के मिळतील आणि तेही अगदी चांगल्या दराने. लॉन्ग टर्मसाठी कमी रिस्क सोबत मुलीच्या शिक्षणाचा तसेच लग्नाच्या खर्चाची प्लॅनिंग करताना सुकन्या समृद्धी योजना तुमची नक्कीच हेल्प करू शकते.
शेअर करा टॅग करा 🚀
बस एक छोटी हेल्प करा, ही पोस्ट तुमच्या इन्वेस्टर मित्रांसोबत शेअर करा पोस्टला प्लीज शेअर करा. तुमच्या Insta स्टोरीवर ठेवून @marathifinance ला टॅग करा. आम्ही पेजवर स्टोरी नक्कीच शेअर करू. Thank You in Advance! 🙏
1 thought on “Sukanya Samriddhi Yojana: काय आहे सुकन्या समृद्धी योजना (मुलींसाठी 8.20% इंटरेस्ट रेट)”