Personal Finance in Marathi: आजकाल सोशल मीडियावर तुम्ही पाहत असाल की अनेकजण नवीन आयफोन घेत आहेत, महागड्या गाड्या घेत आहेत आणि बाहेर देशात फिरत आहेत. हे सगळं बघून कधी कधी “Aspirants” वेब सिरीजमधला डायलॉग आठवतो, ‘बहुत पीछे रह गया ना मे यार’.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
पण जेव्हा आपण लॉजिकली विचार करतो, काही गोष्टी स्पष्ट होतात:
आपल्याला सोशल मीडियावर लोकांचे बाहेर देशातील व्हेकेशन्स दिसतात, पण त्या व्हेकेशन्ससाठी घेतलेलं कर्ज दिसत नाही. मी असं म्हणत नाही की सगळेच लोक कर्ज काढून बाहेर देशात फिरतात, पण अशा लोकांचा आकडा मोठा आहे.
आपल्याला सोशल मीडियावर महागड्या गाड्या दिसतात, पण ती गाडी घेण्यासाठी बँकेकडून किती रुपये कर्ज घेतलं आहे, हे आपल्याला दिसत नाही. पुन्हा, सगळेच लोक कर्ज घेतात असं नाही, पण गाड्या कर्ज काढून घेणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. हा आकडा छोटा नाही, 80% एवढा आहे.
आणि अशा अनेक गोष्टी आहेत, जसं की आयफोन, महागडे कपडे इत्यादी. लोक क्रेडिट कार्ड इत्यादीचा वापर करून खरेदी करतात. याचा अर्थ असा की जे आपण सोशल मीडियावर बघत आहोत ते सगळं खरं नाहीये, फक्त दिखावा असतो.
आता या सगळ्यातून आपण काय शिकलं पाहिजे? | Personal Finance Tips
1) सोशल मीडियावर दिसणारं सगळं खरं नाही – सोशल मीडियावर जे काही बघत आहात, ते सगळं खरं आहे असा समज ठेवणे थांबवा. अनेक वेळा बँकेकडून घेतलेलं कर्ज लोकांना श्रीमंत दाखवतं, पण वास्तव वेगळं असतं.
2) कर्जाच्या जाळ्यात अडकू नका – इतरांना इम्प्रेस करण्याच्या नादात कर्जामध्ये अडकू नका. तुमच्या जीवनशैलीला तुमच्या आर्थिक स्थितीनुसार ठेवा.
3) तुमची स्वतःची जीवनशैली जगा – तुला चांगलं वाटेल असं जीवन जगा. इतरांच्या मते जगण्याऐवजी तुमच्या गरजा आणि इच्छा लक्षात ठेवा.
4) आर्थिक सुजाणपणा – तुमच्या आर्थिक निर्णयांमध्ये समजूतदारपणा ठेवा. कर्जाच्या माध्यमातून खर्च करण्याऐवजी तुमच्या इन्कमवर आधारित खर्च करा.
5) Priorities ओळखा – तुमच्या आयुष्यातील खऱ्या Priorities ओळखा आणि त्यानुसार खर्च करा. महागड्या वस्तूंच्या मागे न लागता तुमच्या सुख-शांतीला महत्त्व द्या.
या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपलं जीवन अधिक समाधानकारक आणि आनंदी बनवा. तुमची स्वतःची जीवनशैली जगा आणि अनावश्यक कर्जाच्या जाळ्यात अडकू नका.
ही पोस्ट वाचा 👉 काय आहे यशाचा खरा अर्थ? फक्त पैसा नक्कीच नाही
Frequently Asked Questions
1. सोशल मीडियावर लोकांच्या दाखवण्यावर विश्वास ठेवावा का?
सामान्यतः सोशल मीडियावर लोक जे दाखवतात ते सगळं खरं नसतं. अनेक लोक क्रेडिट कार्ड्स, कर्ज इत्यादीच्या माध्यमातून महागड्या वस्तू खरेदी करून दाखवत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर दिसणाऱ्या जीवनशैलीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नये.
2. लोक बाहेर देशात फिरण्यासाठी कर्ज का घेतात?
काही लोक बाहेर देशात फिरण्यासाठी कर्ज घेतात कारण त्यांना तात्पुरते आर्थिक साधनांची गरज असते. काहीजणांसाठी तो एकच मार्ग असतो ज्यामुळे ते त्यांच्या स्वप्नातील ठिकाणी जाऊ शकतात. पण अशा प्रकारच्या खर्चामुळे भविष्यात आर्थिक ताण येऊ शकतो.
3. कर्जावर महागड्या गाड्या खरेदी करणं योग्य आहे का?
महागड्या गाड्या खरेदी करण्यासाठी कर्ज घेणं सगळ्यांसाठी योग्य नाही. कर्जामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो आणि भविष्यात आर्थिक ताण येऊ शकतो. आर्थिक स्थिरता आणि विचारपूर्वक निर्णय घेणं महत्त्वाचं आहे.
4. इतरांना इम्प्रेस करण्याच्या नादात कर्ज घेणं का टाळावं?
इतरांना इम्प्रेस करण्याच्या नादात कर्ज घेणं टाळावं कारण यामुळे तुमचं स्वतःचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. कर्ज परतफेडीची जबाबदारी मोठी असते आणि भविष्यात त्याचा आर्थिक ताण येऊ शकतो. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीनुसार जीवनशैली ठेवा.
5. सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर काय परिणाम होतो?
सोशल मीडियावर दिसणाऱ्या गोष्टींचा आपल्यावर मानसिक आणि आर्थिक परिणाम होऊ शकतो. या गोष्टींनी इम्प्रेस होऊन अनावश्यक खर्च करण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सामाजिक दबावापासून सावध राहून आपलं आर्थिक व्यवस्थापन करणं गरजेचं आहे.