SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल

SEBI & Mutual Fund News: डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नॉमिनेशन सबमिट न केल्याने फ्रीज केले जाणार नाहीत, असे सेबीने सोमवारी जाहीर केले.

सेबीने एका सर्क्युलरमध्ये म्हटले आहे की, अनुपालन सुलभतेसाठी आणि गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी मार्केटमधील विविध सहभागींकडून (जसे की म्युच्युअल फंड कंपन्या, ब्रोकर, रजिस्ट्रार इत्यादी) प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance

गुंतवणूकदार डिव्हिडंड मिळवणे, व्याज घेणे किंवा एखादी तक्रार नोंदवणे किंवा कोणत्याही सेवेच्या विनंतीचा लाभ घेऊ शकतात, जरी त्यांनी नॉमिनेशन केले नसेल. तसेच सेबीने हेही सांगितले की ज्या गुंतवणूकदारांची डिव्हिडंड, एखादे व्याज किंवा रिडेम्पशनची विनंती आतापर्यंत रोखून ठेवली असेल कारण नॉमिनेशन सबमिट केले नव्हते, तर त्यांना लवकरात लवकर सगळ्या सोयी द्याव्यात.

पण एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की, जे लोक नवीन डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतील, त्यांना नॉमिनेशन ठेवणे अनिवार्य केले गेले आहे. फक्त ज्या गुंतवणूकदारांनी संयुक्त डिमॅट खाते उघडले असेल (Joint Demat Account) त्यांना नॉमिनेशन ठेवणे गरजेचे नाही.

सेबीने म्हटले आहे की डिपॉझिटरीज आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांनी (AMCs) हे नवीन झालेले बदल लवकरात लवकर गुंतवणूकदारांना मेल किंवा एसएमएसद्वारे पोहचवावेत.

ही पोस्ट वाचा   👉 एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?

Frequently Asked Questions

सेबीने कोणती घोषणा केली आहे?

सेबीने जाहीर केले आहे की, डिमॅट खाती आणि म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ नॉमिनेशन सबमिट न केल्याने फ्रीज केले जाणार नाहीत.

गुंतवणूकदार नॉमिनेशन न करता कोणकोणत्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात?

गुंतवणूकदार डिव्हिडंड मिळवणे, व्याज घेणे, एखादी तक्रार नोंदवणे किंवा कोणत्याही सेवेच्या विनंतीचा लाभ घेऊ शकतात.

आधी रोखून ठेवलेल्या डिव्हिडंड, व्याज किंवा रिडेम्पशनच्या विनंत्या कधी मंजूर होतील?

ज्या गुंतवणूकदारांची डिव्हिडंड, व्याज किंवा रिडेम्पशनची विनंती नॉमिनेशन सबमिट केले नव्हते म्हणून रोखून ठेवली गेली होती, त्यांना लवकरात लवकर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील.

नवीन डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनेशन अनिवार्य आहे का?

होय, नवीन डिमॅट खाते किंवा म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी नॉमिनेशन ठेवणे अनिवार्य आहे.

संयुक्त डिमॅट खातेधारकांना नॉमिनेशन आवश्यक आहे का?

नाही, संयुक्त डिमॅट खातेधारकांना नॉमिनेशन ठेवणे आवश्यक नाही.

सेबीने डिपॉझिटरीज आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना काय सूचना दिल्या आहेत?

सेबीने डिपॉझिटरीज आणि ॲसेट मॅनेजमेंट कंपन्यांना (AMCs) हे नवीन बदल लवकरात लवकर गुंतवणूकदारांना मेल किंवा एसएमएसद्वारे कळवावेत, अशी सूचना दिली आहे.

2 thoughts on “SEBI च्या नव्या निर्णयामुळे Mutual Fund गुंतवणूकदारांना मोठा दिलासा! जाणून घ्या काय आहेत हे बदल”

Leave a Comment