Mutual Fund Exit Load in Marathi: म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना तुम्ही ‘एक्झिट लोड’ (Exit Load) हा शब्द ऐकला असेलच.
अनेकदा एखाद्या फंडमध्ये पैसे गुंतवल्यानंतर लगेचच रिडीम करताना ‘एक्झिट लोड’ तपासा, असा सल्ला प्रत्येकजण देतो. हा ‘एक्झिट लोड’ (Exit Load) नक्की काय आहे आणि याने काय फरक पडतो? हे आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये समजून घेणार आहोत.
Mutual Fund Exit Load नक्की काय आहे?
एक्झिट लोड (Exit Load) म्हणजे म्युच्युअल फंडचे युनिट्स लवकर विकल्यानंतर म्युच्युअल फंड कंपन्यांकडून गुंतवणूकदारांवर आकारले जाणारे शुल्क किंवा फी.
म्यूचुअल फंडचे युनिट्स हे एक प्रकारचे म्युच्युअल फंडाचे तुकडे किंवा आपल्याकडे असलेले छोटे भाग असतात. एक्झिट लोडचा हेतू हाच असतो की लोकांना पुन्हा विचार करण्यास भाग पाडणे आहे की त्यांनी त्यांची गुंतवणूक फार लवकर विकू नये. त्यांना लॉन्ग टर्मसाठी गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्याचा हा एक मार्ग आहे.
जेव्हा तुम्ही तुमचे म्युच्युअल युनिट्स विकू इच्छिता तेव्हा म्युच्युअल फंड तुमच्याकडून छोटी रक्कम घेतो. हे शुल्क आपण विकत असलेल्या युनिट्सच्या मूल्याची टक्केवारी असते.
उदाहरणार्थ, जर तुम्ही 10,000 रुपयांचे म्युच्युअल फंड युनिट्स विकत असाल आणि एक्झिट लोड 1% असेल तर म्युच्युअल फंड 100 रुपये फी आकारेल. म्हणजेच तुम्हाला 9,900 रुपये परत मिळतील.
परंतु लक्षात घ्या, सर्व म्युच्युअल फंड्स ही फी घेत नाहीत. तसेच एक्झिट लोड किती टाइमसाठी लागू असतो हे प्रत्येक म्युच्युअल फंडासाठी भिन्न असू शकते.
म्युच्युअल फंडाच्या ऑफर डॉक्युमेंट (Offer Document) आणि स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट (SID – Scheme Information Document) मध्ये हे शुल्क आणि ते कसे काम करते याबद्दल सर्व माहिती आपल्याला मिळू शकते, जे प्रत्येक म्युच्युअल फंड कंपनी आपल्याला देते किंवा त्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध असते.
जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)
Exit Load कस कॅलक्युलेट कराव?
म्युच्युअल फंडातील एक्झिट लोड मोजण्यासाठी सर्वप्रथम म्युच्युअल फंडामधून पैसे काढताना तुम्हाला किती पैसे भरावे लागतील याची माहिती असणे आवश्यक आहे.
ही माहिती म्युच्युअल फंडाच्या ऑफर डॉक्युमेंट (Offer Document) किंवा स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये (SID – Scheme Information Document) मिळू शकते. सामान्यत: अनेक प्रकारच्या म्युच्युअल फंड स्कीम वर्षभराच्या आधीच गुंतवणूकदार फंडातून बाहेर पडल्यावर एक्झिट लोड आकारतात.
एक उदाहरण घेऊया.
समजा तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडात पैसे इनवेस्ट केले आहेत जे खरेदीच्या तारखेपासून 365 दिवसांच्या आत रिडेम्प्शनवर म्हणजेच पैसे काढल्यावर 1% एक्झिट लोड आकारतात. आता तुम्हाला खरेदीच्या तारखेनंतर सहा महिन्यांनी 1,000 युनिट्स रिडीम करायचे आहेत. तुमच्या म्यूचुअल फंडची चालू NAV 100 रुपये आहे तर एक्झिट लोडच कॅलक्युलेशन खालीलप्रमाणे असेल.
Exit load = 1% ✕ number of units ✕ NAV
एक्झिट लोड = 1% × 1000 (एकूण युनिट्स) × 100 (NAV) = 1000 रुपये
तुमच्या बँक खात्यात जमा केल्या जाणाऱ्या पैशांमधून 1000 रुपये एक्झिट लोड म्हणून कापले जातील.
1000 (टोटल युनिट्स) × 100 (NAV) – 1,000 रुपये (एक्झिट लोड) = 99,000 रुपये.
म्हणजेच म्युच्युअल फंडातून पैसे काढल्यानंतर तुमच्या बँक खात्यात फक्त 99,000 रुपये येतील आणि एक्झिट लोडनुसार 1,000 रुपये कापले जातील.
आता हे एक्झिट लोड म्हणजेच 1,000 रुपये तुम्हाला कदाचित कमी वाटत असतील पण हे एक उदाहरण आहे. जर तुमच्याकडे जास्त प्रमाणात म्यूचुअल फंडचे युनिट्स असतील ज्यांची मार्केट वॅल्यू जास्त होत असेल तर त्यावर एक्झिट लोड लागल्यास मोठ नुकसान होवू शकते.
म्हणून एक्झिट लोड जितका कमी तितका तुमचा फायदा जास्त.
विविध प्रकारच्या म्युच्युअल फंडांवर Exit Load
वेगवेगळ्या प्रकारच्या म्युच्युअल फंडांचे एक्झिट लोड वेगवेगळे असतात.
1) डेब्ट फंड्स: – डेब्ट फंड्स Bonds आणि सरकारी सिक्युरिटीज सारख्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवतात. ते सहसा इतर फंडांच्या तुलनेत खूप कमी एक्झिट लोड लावतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही एखाद्या डेब्ट फंडातून 90 दिवसांच्या आत पैसे काढले तर तुम्हाला 0.5% एवढ एक्झिट लोड भरावे लागेल.
2) इक्विटी फंड्स :- इक्विटी म्हणजे अधिक जोखीम, हे आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे. इक्विटी फंड हे लॉन्ग टर्ममध्ये पैसे गुंतवण्यासाठी डिझाइन केलेले असतात. त्यामुळे इक्विटी फंडातून लवकर पैसे काढल्यास तुमच्याकडून जास्त शुल्क किंवा एक्झिट लोड घेतला जातो. मात्र, काही इक्विटी फंडांना एक्झिट लोड नसतो जसे की इंडेक्स फंड्स.
3) हाइब्रिड फंड्स और आर्बिट्रेज फंड्स :- हे फंड वेगवेगळ्या प्रकारच्या इनवेस्टमेंट्समध्ये पैसे गुंतवतात. यातील काही फंड अगदी कमी कालावधीसाठीच असतात आणि गरज असताना लगेच त्यांच्यामधून पैसे काढताना कोणतेही शुल्क आकारले जात नाही, असे काही जणांना वाटते. पण प्रत्यक्षात १५ ते ३० दिवसांत पैसे काढल्यास तुमच्याकडून एक्झिट लोड आकारला जातो. त्यामुळे किमान महिनाभर तरी आपले पैसे या फंडात ठेवा आणि मग हव तर काढा.
या ब्लॉग पोस्टमधून आपण काय शिकलो?
जेव्हा एखाद्या म्युच्युअल फंडामध्ये आपण पैसे गुंतवतो तेव्हा पैसे काढताना त्यावर किती फी भरावी लागेल याची माहिती प्रत्येक गुंतवणूकदाराला असणे अत्यंत गरजेचे आहे.
यामुळे सर्व फी वजा केल्यानंतर तुमच्या हातात किती पैसे येतील हे समजण्यास मदत होते. आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक म्युच्युअल फंडाचा एक्झिट लोड नेहमीच वेगळा असतो. साधारणपणे एक्झिट लोडची सर्व माहिती म्युच्युअल फंडाच्या ऑफर डॉक्युमेंट किंवा स्कीम इन्फॉर्मेशन डॉक्युमेंटमध्ये दिली जाते.
त्यामुळे कोणाताही फंड पैसे इनवेस्ट करण्यासाठी निवडताना त्याचा एक्झिट लोड किती आहे हे नक्की बघा.
Exit load