Money Management Tips: पैसे योग्यरित्या मॅनेज करण्याचे 7 सोपे मार्ग!

Money Management Tips: आपल्या सगळ्यांना हेच वाटत की पैसे मॅनेज करायचे आहेत म्हटल्यावर काही मोठी स्ट्रॅटेजी बनवावी लागेल, मोठा प्लॅन बनवावा लागेल. पण खरं बोलू तर तस अजिबात नाहीये. काही सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे योग्यरित्या मॅनेज करू शकता. आता त्या टिप्स नक्की कोणत्या? हेच आपण आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर सुरुवात करुया:

जॉइन टेलीग्राम चॅनल   @marathifinance

1) बजेटिंग महत्वाची आहे:

महिन्याला किती खर्च करायचा हे तुमच्या माईंडमध्ये स्पष्ट असले पाहिजे. तुमचे खर्च नक्की किती होतात तसेच तुमची इन्कम कुठून येते याची पूर्ण माहिती तुम्हाला असली पाहिजे. बजेट बनविण्याचा फायदा असा आहे की नको ते खर्च होत नाही आणि जर होत असतील तर तुम्ही त्यांना कमी करू शकता. त्यामुळे एक बजेट बनवा आणि त्याला फॉलो करा.

2) अंथरूण पाहून पाय पसरावेत:

तुम्ही ही म्हण शाळेमध्ये नक्की ऐकली असेल. पण तिचा खरा अर्थ आता समजवतो. आपल्याला शक्य होईल तेवढेच खर्च करावेत. तुमची जेवढी इन्कम आहे त्यापेक्षा कमी तूमचे खर्च असलेच पाहिजेत. जर इन्कम कमी आणि खर्च जास्त होतोय तर मात्र गडबड आहे. त्यामुळे नको ते खर्च कमी करा आणि पैसे Save करा.

3) सगळ्यात आधी Savings:

आपण सगळ्यात मोठी आर्थिक चूक करतो ती म्हणजे आधी सगळे खर्च मग उरतील ते Save करतो. कधी पैसे उरतात तर कधी नाही. पण असं करून नाही चालणार. सगळ्यात आधी पैसे Save झाले पाहिजे. यासाठी तुम्ही एक वेगळं बँक अकाऊंट ओपन करू शकता जे फक्त आणि फक्त Savings साठी असेल. (मी तर असच केलंय. आणि हे अकाउंट Google Pay किंवा कुठेच लिंक नाहीये, जशी सॅलरी आली की पहिले पैसे या अकाउंटला जातात)

ही पोस्ट वाचा  तुमच्या वीकेंडचा वापर आर्थिक स्वातंत्र्यासाठी कसा कराल?

4) Investing ला सुरुवात:

तुम्ही पैसे Save तर कराल पण तेवढे पुरेस नाहीये. त्यातील काही भाग तुम्ही Invest केला पाहिजे. मग ते स्टॉक्स असो की Mutual Funds किंवा इतर पर्याय. पैसे Invest कराल तेव्हाच महागाईला हरवून भविष्यात मोठ्या प्रमाणात वाढतील. सुरुवातीला फारसा फरक दिसत नाही, असं वाटत की पैसे वाढतच नाहीये पण ५ वर्षांनंतर खरी Compounding व्हायला सुरू होते. त्यामुळे Investing ला आजच सुरुवात करा.

5) Credit Card: एक दुधारी तलवार

क्रेडिट कार्ड वाईट प्रॉडक्ट नाहीये पण तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर सगळं अवलंबून आहे. क्रेडिट कार्ड वापरून तुम्हाला ३०-३५ दिवसांसाठी बँकेचे पैसे फ्रीमध्ये वापरायला मिळतात. याचा वापर तुम्ही तुमची बिल्स योग्य वेळी भरायला करू शकता किंवा नको त्या वस्तू घेण्यासाठी करू शकता. कारण जर हफ्ते चुकले, वेळेवर पेमेंट केलं नाही तर २०-२५% एवढा व्याज बँका वसूल करतात. म्हणून क्रेडिट कार्ड एक दुधारी तलवार आहे. याचा वापर नीट करा.

6) शिस्त असेल तर शक्य आहे:

बजेट बनविणे सोप आहे पण ते फॉलो करणे कठीण. Saving करेन हे बोलणं सोप आहे पण करणे तेवढंच कठिण. अगदी तसच Investing बोलणं सोप आहे पण करणे तेही लाँग टर्मसाठी तेवढंच कठीण. म्हणून तुम्ही फायनान्सच्या बाबतीत शिस्तबद्ध राहिले पाहिजे. हे सगळ करत असताना नक्कीच खर्च करावा वाटेल पण तुमच्या लाँग टर्ममधील आर्थिक ध्येय आठवा आणि टिकून रहा.

7) आर्थिक सवयी विकसित करा:

जस होण्यासाठी आपल्याला व्यायाम करावा लागतो, पौष्टिक आहार घ्यावा लागतो. अगदी तसच, पैशाच्या बाबतीत फिट राहायचं आहे तर तुमच्या इन्कमच्या कमीत कमी 10% रक्कम Save करा. पैसे Invest करा. नको ते खर्च टाळा. आता या सवयी एकाच दिवसात विकसित होणार अस नाही. यासाठी वेळ द्यावा लागेल. या सवयीना तुमच्या लाईफचा एक भाग बनवावा लागेल.

निष्कर्ष

या 7 Money Management Tips ना फॉलो करून तुम्ही पैशासोबत तुमचं असलेलं नातं सुधारू शकता. नेहमी लक्षात ठेवा की आर्थिक स्वातंत्र्य हा एक प्रवास आहे, फक्त एखादं ठिकाण नाही जिथे पोचलात की काम झालं. त्यामुळे संयमी बना, सातत्यपूर्ण Investing करा, आणि आर्थिक शिस्त पाळा. आर्थिक व्यवस्थापनाच्या या सवयी तुम्हाला दीर्घकाळात अधिक स्थिर आणि सुरक्षित भविष्य मिळवून देतील.

ही पोस्ट वाचा  मी नोकरी करतोय पण आर्थिक स्वातंत्र्यासाठी अजून काय केल पाहिजे? 

Frequently Asked Questions

1) बजेटिंग म्हणजे काय?

उत्तर: बजेटिंग म्हणजे आपल्या उत्पन्न आणि खर्चाचे योग्य नियोजन करणे. यामध्ये महिन्याला किती पैसे मिळतात आणि किती खर्च होतात याचा तपशीलवार आढावा घेतला जातो. बजेटिंगमुळे अनावश्यक खर्च टाळता येतात आणि पैसे कसे व्यवस्थापित करायचे याची स्पष्टता मिळते.

2) बजेट कसे तयार करावे?

उत्तर: बजेट तयार करण्यासाठी प्रथम तुमचे उत्पन्न आणि खर्च यांची यादी तयार करा. आवश्यक खर्च (घरभाडे, विजबिल, किराणा इत्यादी) आणि अनावश्यक खर्च (सिनेमा, बाहेरचं खाणं इत्यादी) यांची वर्गवारी करा. प्रत्येक महिन्याचे बजेट तयार करून त्याला फॉलो करा.

3) "अंथरूण पाहून पाय पसरावेत" म्हणजे काय?

उत्तर: “अंथरूण पाहून पाय पसरावेत” म्हणजे आपल्या आर्थिक स्थितीनुसार खर्च करणे. आपल्या उत्पन्नाच्या पेक्षा जास्त खर्च करणे टाळा. उत्पन्नाच्या मर्यादेत राहून खर्च केल्यास आर्थिक स्थिरता राखता येते.

4) Savings कसे करावे?

उत्तर: सगळ्यात आधी तुमच्या उत्पन्नातील काही भाग (उदा. 20%) वेगळ्या Savings अकाउंटमध्ये ठेवा. तुमची सॅलरी आली की पहिल्यांदा हे पैसे बचत खात्यात टाका. यामुळे खर्च झाल्यानंतर पैसे उरण्याची चिंता नाही राहणार.

5) गुंतवणूक का आवश्यक आहे?

उत्तर: फक्त पैसे Save करून पुरेसं नाही, महागाईमुळे पैशाची किंमत कमी होते. पैसे गुंतवल्यामुळे त्यांची वाढ होते आणि भविष्यात आर्थिक स्थिरता मिळते. गुंतवणूक केल्याने Compounding चा फायदा मिळतो आणि दीर्घकाळात मोठा नफा मिळू शकतो.

6) क्रेडिट कार्डचा योग्य वापर कसा करावा?

उत्तर: क्रेडिट कार्डचा वापर काळजीपूर्वक करा. बिल वेळेवर भरा आणि उगाचच खर्च टाळा. क्रेडिट कार्ड वापरून ३०-३५ दिवसांसाठी फ्रीमध्ये पैसे वापरता येतात, पण हफ्ते चुकल्यास मोठ्या व्याजाचा भार येतो. त्यामुळे आवश्यक खर्चांसाठीच क्रेडिट कार्डचा वापर करा.

7) आर्थिक शिस्त कशी पाळावी?

उत्तर: आर्थिक शिस्त म्हणजे बजेट फॉलो करणे, नियमित Savings करणे आणि गुंतवणूक करणे. दीर्घकालीन आर्थिक ध्येय आठवून खर्च नियंत्रित करणे. आर्थिक शिस्त पाळण्यासाठी नियमितपणे आपल्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या.

8) आर्थिक सवयी कशा विकसित कराव्यात?

उत्तर: आर्थिक सवयी विकसित करण्यासाठी नियमित Savings करा, नको ते खर्च टाळा आणि गुंतवणूक करा. या सवयी एकाच दिवसात येणार नाहीत, त्यासाठी सातत्य ठेवा आणि आर्थिक नियोजनावर भर द्या.

9) आर्थिक साक्षरता कशी वाढवावी?

उत्तर: नियमितपणे आर्थिक नियोजन, गुंतवणूक, कर्ज व्यवस्थापन या बाबतीत वाचन करा आणि शिकत राहा. ऑनलाइन कोर्सेस, ब्लॉग्ज, पुस्तकं यांचा उपयोग करून आर्थिक ज्ञान वाढवा. आर्थिक साक्षरता वाढवल्याने तुम्ही तुमचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकाल.

Leave a Comment