ICICI Prudential AMC ने त्यांच्या विविध म्यूचुअल फंड स्कीममध्ये एकत्र पैसे (Lumpsum Investments) इन्वेस्ट करणे बंद केले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 14 मार्च 2024 पासून करण्यात येईल. इतर म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा अशाच प्रकारच निर्णय घेण्याची शक्यता दर्शवली जात आहे.
आता हे करायच कारण काय?
खूपच चांगला परफॉर्मेंस: Nifty Midcap 150 Index ने मागील वर्षात 55% चा रिटर्न दिला आहे तसेच Nifty Smallcap 250 Index ने मागील वर्षात 59% एवढा जबरदस्त रिटर्न दिला आहे. पण या दोन्ही इंडेक्सच्या तुलनेत Nifty 100 या इंडेक्सने फक्त 33% एवढा रिटर्न दिला.
वाढलेल Allocation: भारतीय शेअर मार्केटच्या मार्केट कॅपमध्ये Mid आणि small cap stocks ची हिस्सेदारी टोटल 36.4% एवढी झाली आहे. जी मागील 15 वर्ष फक्त 25.4% एवढी होती. चांगले रिटर्न मिळतात म्हणून खूप सारे लोक Mid आणि small cap mutual funds मध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ओतत आहेत.
ICICI Prudential AMC ने यावर काय उपाय केले आहेत?
नियमितपणे पैसे इन्वेस्ट करण्यासाठी कंपनी SIP माध्यमातून पैसे इन्वेस्ट करायला सांगत आहे. ICICI Mutual Fund कंपनीने जुन्या SIP (systematic investment plan) आणि STP (systematic transfer plan) चालू राहणार अस सांगितल आहे.
पण नवीन SIP (systematic investment plan) आणि STP (systematic transfer plan) चालू करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी आता 2 लाखची लिमिट कंपनीने सेट केली आहे. नवीन SIP केल्यावर Step Up SIP करणे पूर्णपणे बंद केल आहे.
SEBI आणि AMFI चे नवीन नियम?
SEBI (Securities and Exchange Board of India) ला काळजी आहे वाटत आहे कारण शेअर मार्केटमध्ये Mid आणि Small Cap Stocks च वॅल्यूएशन वाढत आहे. ज्या प्रकारे अशा म्यूचुअल फंडमध्ये पैसा येत आहे, SEBI ने यावर Action घेत या पैशाचे प्रवाह कमी करण्यास सांगितले आहेत. आता फक्त ICICI Mutual Fund ने हे बदल करायला सुरुवात केली आहे पण लवकरच इतर म्यूचुअल फंड कंपन्यासुद्धा अशाच प्रकारचे नियम लागू करतील.
AMFI (Association of Mutual Funds in India) ने सगळ्या म्यूचुअल फंड कंपन्याना 15 मार्च 2024 पासून ते एखाद्या म्यूचुअल फंडमधून Mid आणि Small cap Stocks विकायला एकूण किती दिवस लागणार याची माहिती जाहीर करायला सांगितल आहे. एखादी म्यूचुअल फंड कंपनी कोणते स्टॉक घेते आणि विकते याची काही माहिती त्या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करणाऱ्या लोकांना अजिबात नसते.
अशा प्रकारचे नियम लागू करून SEBI आणि AMFI मार्केटमध्ये स्थिरता राहील याची खात्री करत आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉Krystal Integrated IPO: अप्लाय करण्याआधी ही माहिती नक्की वाचा (marathifinance.net)