Mutual Fund SIP in Marathi: काय तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे की जर एखाद्या वेळी, काही कारणाने तुमच्या म्यूचुअल फंड SIP चे पैसे भरायला नाही जमले तर काय होईल? काय तुम्हाला कोणती पेनल्टी भरावी लागेल? आणि म्हणून आजच्या पोस्टमध्ये आपण यावर डीटेल चर्चा करणार आहोत. चला तर सुरवात करूया.
म्यूचुअल फंड SIP मध्ये एखाद्या महिन्यात पैसे न भरण्याचे मुख्य दोन करणे आहेत. पहिल कारण म्हणजे
1) पैशाची तंगी आहे, म्हणून इन्वेस्ट करायला नाही जमले तर काय होईल?
अस अनेक वेळा होत की एखाद्या महिन्यात खर्च खूप होतो किंवा एखादी एमर्जन्सि येते आणि त्यासाठी पैसे लागतात. परिणामी तुम्हाला म्यूचुअल फंड SIP मध्ये पैसे भरता येत नाही. अशा वेळी तुम्हाला SIP मध्ये पैसे भरता नाही आले तर तुम्ही SIP Skip करू शकता.
SIP Skip करायचा ऑप्शन तुम्हाला Groww App मध्ये बघायला मिळेल. बाकीचे Apps जस की Zerodha Coin, AngelOne इ. मध्ये अशी सुविधा आहे की नाही ते तुम्ही चेक करा. जर तुम्ही यापैकी एखादा App वापरत असाल.
SIP Skip केल्याबर चालू महिन्याचे पैसे बँक अकाऊंटमधून कट होणार नाही. आणि याचे कसले एक्स्ट्रा चार्जस पण तुम्हाला भरावे लागत नाही. पुढच्या महिन्यात आपोआप जी तुमची SIP रक्कम आहे ती ठराविक तारखेला कट होणार.
पण जर तुम्हाला या महिन्याचे पैसे (जे तुम्ही Skip केले होते) आणि चालू महिन्याचे पैसे असे एकत्र करून भरायचे असतील तर तुम्ही SIP ची रक्कम Edit करू शकता. समजा महिन्याला 1000 रुपये इन्वेस्ट करता पण या महिन्यात नाही जमले आणि पुढच्या महिन्यात तुम्हाला एकत्र 2000 रुपये इन्वेस्ट करायचे आहेत. अस करताना ज्या वेळी तुम्ही SIP Skip केलीत तेव्हाच त्याची रक्कम Edit करून ठेवा. म्हणजे पुढच्या महिन्यात 1000 च्या एवजी 2000 रुपये आपोआप इन्वेस्ट होतील.
आणि एवढ करायच नसेल तर सरल 1000 रुपये आपोआप कट होऊदेत आणि मागच्या महिन्याचे Skip केलेले 1000 रुपये तुम्ही स्वता Manually भरू शकता. (माझ्या मते हे करणे जास्त सोयीच आहे)
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
2) बँक अकाऊंटमध्ये पैसे नाहीत म्हणून SIP चुकली तर काय होणार?
समजा ज्या तारखेला तुमची SIP रक्कम कट होते त्याच दिवशी तुमच्या बँक अकाऊंटमध्ये पुरेसे पैसे नसतील आणि SIP चुकली तर तुम्हाला पेनॉल्टी भरावी लागते.
आता एक गोष्ट लक्षात घ्या की ही पेनॉल्टी Groww किंवा Zerodha वाले लावत नाहीत तर ज्या बँकमधून तुम्ही SIP साठी Autopay किंवा ECS Mandate (Electronic Clearing Service) फॉर्म दिला आहे ती बँक पैसे घेते. आणि हे पैसे सगळ्या बँकासाठी वेगळे असू शकतात.
तुम्ही जेव्हा ECS फॉर्म भरून देता की महिन्याचा ठराविक तारखेला एक ठराविक रक्कम माझ्या बँक अकाऊंटमधून कट व्हावी आणि म्यूचुअल फंडमध्ये इन्वेस्ट व्हावी तर या कामासाठी बँक हे charges घेते लक्षात घ्या.
पोस्ट हेल्पफुल वाटली असेल तर शेअर करा आणि काही शंका असतील तर कमेन्टमध्ये विचारू शकता.
Keep Learning & Keep Investing
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंडवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi (marathifinance.net)
1 thought on “Mutual Fund SIP: या महिन्याची म्यूचुअल फंड SIP चुकली, आता काय होणार?”