Mutual Fund Investing Mistake
Value Research ही एक म्युच्युअल फंडवर रिसर्च करणारी एक कंपनी आहे. दर महिन्याला त्यांचं एक मॅगझिन येत ते म्हणजे “Mutual Fund Insight” तर या मॅगझिनमध्ये त्यांनी एक रिपोर्ट पब्लीश केला होता. आणि आजच्या पोस्टमध्ये आपण त्यावरच चर्चा करणार आहोत.
मी बोलो होतो रिपोर्ट जुनी आहे कारण हा डेटा 2017 चा आहे. पण यामधून मिळणारा धडा आपल्याला आज पण कामी येईल. या रिपोर्टमध्ये Value Research ने जानेवारी 2007 ते डिसेंबर 2016 असा 10 वर्षांचा डेटा घेतला. हा डेटा 2007 ते 2016 या 10 वर्षात लार्ज कॅप कॅटेगिरीमधील बेस्ट फंड कोणता यांबद्दल होता.
मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय असा हट्ट सोडा
समजा तुम्हाला एक सवय आहे की जो बेस्ट म्यूचुअल फंड आहे फक्त त्यामध्येच मी पैसे इन्व्हेस्ट करणार. त्यामुळे या रिपोर्टनुसार 2007 मध्ये तुमचा बेस्ट फंड म्युच्युअल फंड असता Reliance NRI Equity Fund कारण हा फंड त्यावेळी टॉपवर होता. आणि दुसऱ्या वर्षी म्हणजे 2008 मध्ये तुमचा बेस्ट फंड असता Sundaram Select Focus Fund आणि असं करत अगदी दहा वर्ष तुम्ही दहा नवीन Funds बदलले असते कारण या 10 वर्षाच्या कालावधीत बेस्ट फंड सतत बदलत होते. त्यामुळे जर तुम्हाला फक्त बेस्ट फंड निवडायची Mutual Fund Investing Mistake तुम्ही करू नका.
एक साध गणित करून बघूया (Mutual Fund Investing Mistake)
समजा तुम्ही 2007 मध्ये 1 लाख रुपये त्यावेळच्या बेस्ट फंडमध्ये इनवेस्ट केले असते. आणि मग 2008 मध्ये हा फंड बेस्ट राहिला नाही म्हणून त्यातून पैसे काढून हे पैसे Sundaram Select Focus Fund मध्ये इनवेस्ट केले असते. अस करत अगदी 10 वर्ष तुम्ही 10 बेस्ट म्यूचुअल फंड निवडले असते तरीही त्या 1 लाखावर तुम्हाला फक्त 3.93% एवढा रिटर्न मिळाला असता. आणि या 10 वर्षात तुमचे 1 लाख रुपये Rs.1,47,704 एवढे झाले असते. सतत फंड बदलण्याच्या चुकीमुळे तुम्हाला कधी Compounding चा फायदा झालाच नसता.
आणि जर तुम्ही हे 1 लाख रुपये तुमच्या पहिल्या फंडमध्ये म्हणजे Reliance NRI Equity Fund मध्ये इनवेस्ट करून ठेवले असते तर तुम्हाला त्यावर 12.84% चा रिटर्न मिळाला असता. आणि 10 वर्षात हे 1 लाख जवळजवळ Rs.3,34,681 एवढे झाले असते.
या रिपोर्टमधून आपल्याला काय शिकायला मिळालं
2024 आल की मोठे मोठे यूट्यूबर, यूट्यूबवर विडियो बनवणार की बेस्ट म्यूचुअल फंड 2024. आणि समजा तुम्ही जो फंड 2023 मध्ये निवडला होता तो या वर्षी बेस्ट फंडच्या लिस्टमध्ये नाहीये किंवा टॉपवरुन खाली आला आहे तर तो फंड बदलायची गरज नाही. एक वर्ष परफॉर्मेंस खराब झाला म्हणून तो फंड वाईट होत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा ही Mutual Fund Investing Mistake टाळा.
मी माझा अनुभव सांगतो, ऑक्टोबर 2021 मी जॉबवर जायला सुरुवात केली. नोव्हेंबर 2021 मध्ये पहिली सॅलरी आली. पहिल्या सॅलरीमधून पप्पांना एक नवीन फोन घेतला आणि बाकीचे पैसे खर्च केले. (जे खर आहे ते आहे)
पण डिसेंबर 2021 मध्ये मी एक फंड घेतला तो म्हणजे UTI Nifty 50 Index Fund आणि त्यामध्ये एसआयपी स्टार्ट केली. आणि हा फंड माझ्या पोर्टफोलिओमध्ये अजून पण आहे. मला माहीत आहे अजून काही चांगले इंडेक्स फंड आले आहेत पण त्यासाठी मी हा फंड विकून टाकून एखाद्या दुसऱ्या फंडमध्ये नवीन एसआयपी करेन, यात काहीच लॉजिक नाही.
प्रत्येक वर्षी तुम्ही निवडलेला म्यूचुअल फंड हा बेस्ट असेल असं होणार नाही आणि ही गोष्ट तुम्ही जितक्या लवकर समजून घ्याल तितक्या लवकर तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा प्रवास सोपा होईल.
ALL THE BEST भावांनो आणि बहिणींनो!👍
सपोर्ट मराठी फायनान्स ब्लॉग 🙏
जेव्हा तुम्ही या ब्लॉगवरील एड्सवर क्लिक करता त्यामुळे या ब्लॉगला हेल्प होते आणि त्यातूनच आम्ही या ब्लॉगवर माहितीपूर्ण पोस्ट तुमच्यासाठी घेऊन येत राहू तेही लाईफटाईम फ्री. मराठी फायनान्स ब्लॉगला सपोर्ट करण्यासाठी खूप खूप आभार! Keep Learning & Keep Supporting! 💡🙏
2 thoughts on “मला फक्त बेस्ट म्यूचुअल फंड हवाय! (No 1 Mutual Fund Investing Mistake)”