सॉफ्टबँक ब्लॉक डीलद्वारे $१३५मिलियन किमतीचे Zomato शेअर्स विकण्याची शक्यता आहे. जर या डीलची किंमत आपण रुपयात केली तर ती होते 1,125.5 करोंड रुपये एवढी. सॉफ्टबँक ही एक Venture कॅपिटल फर्म आहे जी छोट्या मोठ्या स्टार्टअप्समध्ये पैसे इनवेस्ट करते.
ही डीलमध्ये 120.50 रुपये प्रति शेअर या दराने शेअर्स विकले जातील. आदल्या दिवशी, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर Zomato चे शेअर 2.44 टक्क्यांनी वाढून 121.80 रुपयांवर बंद झाला होता. आता ही बातमी बाहेर आल्यावर उद्या या शेअरमध्ये काय होईल याकडे इन्वेस्टर लोकांच लक्ष आहे. आता या डीलमध्ये नक्की समोर कोण खरेदीदार आहे हे अजून स्पष्ट झाले नाहीये.
यापूर्वी, ऑक्टोबरमध्ये सॉफ्टबँकसोबत संलग्न असलेली कंपनी SVF Growth Singapore Pte मार्फत, सॉफ्टबँकने Zomato मधील 1.09 टक्के हिस्सेदारी 1,040.5 करोंड रुपयांच्या मोठ्या डीलमध्ये विकली होती.
सप्टेंबर-अखेरपर्यंत, Zomato ने दिलेल्या ताज्या डेटामध्ये सॉफ्टबँक झोमॅटोमध्ये 2.17 टक्के हिस्सेदारी आहे अस सांगते. अलिकडच्या काही महिन्यांत सॉफ्टबँक भारतातील नवीन स्टार्टअप्स कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी कमी करत आहे. सॉफ्टबँकने Paytm मधील त्यांचा मोठा हिस्सा विकला आहे.
एका मागोमाग एक मोठ्या कंपन्या भारताच्या नव्या स्टार्टअप्स पैसे काढत आहेत. नवीन स्टार्टअप्ससाठी एक चिंतेच कारण नक्कीच बनल आहे. आणि त्याहून जास्त टेंशन Zomato आणि Paytm सारख्या नव्या स्टार्टअप्सच्या शेअर्समध्ये इनवेस्ट करण्याऱ्या लोकांना आल आहे.
BSE वर Zomato ची चालू किंमत रुपये 122 प्रति शेअर आहे.
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
Market Capitalization: – कंपनीच बाजार भांडवल म्हणजे काय?
1 thought on “Zomato Share: – सॉफ्टबँक झोमॅटोमधील 1.1% ची हिस्सेदारी विकणार (उद्या शेअर पडणार?)”