SAVE & INVEST MONEY: भविष्यासाठी सेविंग आणि इन्वेस्टींग का करावी? (7 महत्वाची कारणे)

SAVE MONEY & INVEST MONEY: काय तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी Save आणि Invest करत आहात का? हो की नाही? तुम्ही जर Save आणि Invest करत असाल तर तुम्हाला वाटेल काय वेड्यासारखा प्रश्न आहे. कारण प्रत्येक जण फ्युचरसाठी पैसे वाचवत असतो.

पण तुम्ही जर पैसे Save आणि Invest करायला सुरुवात केली नसेल तर या पोस्टमध्ये आपण अशा 7 कारणांबद्दल चर्चा करणार आहोत जेणेकरून आपण Save आणि Invest का केल पाहिजे हे स्पष्ट होईल.

कारण नंबर 1: वाईट काळात पैसा मदतीला येतो. 

आपल्या संगळ्यांना माहीत आहे की लाइफचा काही भरोसा नसतो. कधी कोणाचा जॉब जावू शकतो तर कधी फॅमिलीमधील कोणाला अचानक हॉस्पिटलमध्ये दाखील कराव लागत आणि अशी बरीच कारणे.

तुमच्याकडे पुरेशी Savings असतील तर तुम्ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळू शकाल आणि पैशांसाठी इतरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. लाइफमध्ये नेहमीच असे टप्पे येतात जेव्हा गोष्टी खराब होतात आणि जर तुमच्याकडे Savings नसतील तर तुम्हाला खूप त्रास होवू शकतो. त्यामुळे वाईट काळात पैसा नेहमीच मदतीला येतो.

कारण नंबर 2: एक दिवशी आपली इन्कम बंद होणार. 

कधीकधी मला हे पाहून आश्चर्य वाटते की बरेच लोक हा सोपा मुद्दा विसरतात, की एक दिवस ते कमाई करणे थांबवतील आणि यालाच रिटायरमेंट म्हणतात.

20s, ३०s आणि ४०s वयोगटातील अनेकजण आयुष्यभर त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये सॅलरी येत राहील अगदी असच वागत असतात. पैसे वाचवण्यासाठी ते पुरेसे प्रयत्न करत नाहीत. पैसे  Save आणि Invest करण्याचे त्यांचे प्लॅन्स टाळत राहतात आणि एक दिवस त्यांच्या लक्षात येते की ते आता आम्ही डेंजर झोनमध्ये आहोत.

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जॉबमधून पैसे कमवायला सुरू केल्यानंतर होणारे खर्च कधीच थांबत नाहीत, पण तुमची इन्कम मात्र वयाच्या ५५-६० व्या वर्षापर्यंतच येईल! त्यानंतर बंद!

कारण नंबर 3: पुरेसा पैसा असेल तर डोक्याला शांती मिळते. 

जेव्हा तुमच्याकडे पुरेसे पैसे असतात तेव्हा तुम्हाला  नेहमीच सुरक्षिततेची आणि मनःशांतीची भावना जाणवते. जेव्हा एखादी वाईट बातमी येते तेव्हा आपल्याला किती टेंशन येत. जरा अशा परिस्थितीची कल्पना करा जिथे

  • तुम्हाला जॉबवरुन काढले जाते.
  • फॅमिलीतील कोणाला तरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची  कल्पना.
  • तुमच्या मुलांच्या शाळेची फी पुन्हा वाढली. (आता लग्न झाल नसेल काही जनांच. मी पण त्या पैकी एक. पण तरीही विचार केला पाहिजे)

लाइफमधील या सर्व छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला कळत नकळत त्रास देतात आणि आपल्याला मानसिक शांती मिळत नाही कारण आपल्याला माहित असते की आपल्याकडे Savings नाहीयेत किंवा पैसे कमी आहेत. जर तुमच्या नोकरीला काही झालं तर तुम्ही गोष्टी कशा मॅनेज कराल? त्यामुळे आजपासून अगदी आतापासूच तुमच्या फ्युचरसाठी Save आणि Invest करायला सुरुवात करा.

कारण नंबर 4: आर्थिक स्वातंत्र्य कोणाला नाही आवडणार. 

आपल्या प्रत्येकाला लाइफमध्ये एका अशा लेवलला पोचायच आहे जिथे इन्कमसाठी आपल्याला फक्त सॅलरीवर अवलंबून नाही राहायच. आपल्याला एवढी वेल्थ बनवायची आहे जिथे आपले बेसिक खर्च आरामात त्यातून पूर्ण होतील. जेव्हा जॉब लागतो तेव्हा आपण पूर्णपणे इन्कमसाठी सॅलरीवर अवलंबून असतो पण जशी वर्ष पूर्ण होणार तुमच्या वयाप्रमाणे तुम्ही Save आणि Invest करायला सुरुवात केलीच पाहिजे.

जर तुमचे महिन्याचे खर्च समजा 25,000 असतील तर तुमच्याकडे कमीत 1 वर्ष भागेल एवढी Savings तर नक्की असली पाहिजे.  (25,000 * 12 महीने = 300000)  एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आता पैसे गुंतवणे म्हणजे स्वत: ला अधिक रिटायरमेंटचे दिवस भेट देण्याची कृती आहे. 

ही पोस्ट वाचा :- Financial Freedom in Marathi: काय तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य हवय? मग हे 3 नियम फॉलो करा 

कारण नंबर 5: तुम्ही  कर्जाच्या जाळ्यात अडकणार नाही. 

जे लोक कर्जाच्या जाळ्यात आहेत त्यांनी सुरुवात अगदी छोट्या कर्ज घेऊन केलेली असते जस की पर्सनल लोन किंवा एखाद क्रेडिट कार्ड लोन.  त्यांची चूक हीच होते की, आधी हे सगळे खर्च खूप छोटे वाटतात आणि नीट मॅनेज करता येतात. पण जेव्हा एखाद्या व्यक्तिला कर्ज घेऊन लाइफस्टाइलसाठी जस की कपडे, वस्तु इ, घेण्याची सवय लागते तेव्हा हे कर्जाच जाळ मोठ व्हायला सुरुवात होते.

म्हणून पुरेशी Saving आणि मग Investing करणे ही अत्यंत महत्वाचा आर्थिक निर्णय आहे जेणेकरून अशा कर्जाच्या जाळ्यात तुम्ही कधी फसणार नाही. आणि शक्य झाल तर मौजमजेसाठी कर्ज घेणे टाळा.

कारण नंबर 6: लाइफमध्ये तुम्ही ग्रोथ करत आहात याची जाणीव. 

आपल्या आर्थिक जीवनात “ग्रोथ” ही भावना खूप महत्वाची आहे. करिअरच्या सुरुवातीला तुमच्याकडे झिरो बँक बॅलन्स असू शकतो. पण ८-१० वर्षे काम केल्यानंतर तुमच्याकडे दाखवण्यासारखं फार कमी असेल – तर ते तुम्हाला आतून चिरडून टाकतं. जर तुम्ही वेळेत Savings आणि Investing सुरू केली नाही तर कालांतराने तुम्हाला अपयश वाटू शकते कारण तुम्हाला तुमच्या संपत्तीत कोणतीही वाढ दिसणार नाही. आणि अजकाल तुमच्या संयम असेल तर कालांतराने वेल्थ निर्माण करणे फारसे अवघड नाही. छोटी रक्कम ही लॉन्ग टर्ममध्ये मोठी रक्कम बनू शकते.

एक उदाहरण घेऊ, समजा आपण 1,000 रुपयाची एक स्टेप अप SIP केली पूढील 30 वर्षांसाठी तर किती पैसे होतील?

marathi finance

 

SIP ची रक्कम – 1000 रुपये

किती वर्ष इनवेस्ट करणार  – 35 वर्षे

दर वर्षी रककमेत 10% ची वाढ

अपेक्षित रिटर्न – 12% (जास्त सुद्धा मिळू शकतो पण कॅलक्युलेशनसाठी आपण कमीच घेतला आहे)

35 वर्षानंतर किती रक्कम होणार – 1,66,91,284 रुपये (म्हणजेच दीड करोडपेक्षा जास्त रक्कम)

अजून 5 वर्ष वाढवलीत तर म्हणजेच 40 वर्षासाठी किती मिळणार – 3,29,15,064 ( तीन करोंड पेक्षा जास्त, 5 वर्षात एवढा फरक यासाठी कारण शेवटच्या वर्षात पैशावर Compounding मोठ्या प्रमाणात होते) जर तुम्ही अजून सुरुवात केली नसेल तर सुरुवात करा.

ही पोस्ट वाचा :- SIP काय आहे? फायदे आणि तोटे | SIP in Marathi

कारण नंबर 7: खर्च करताना अपराधी वाटणार नाही (No Guilty Feeling)

आपण अशी बरीच कुटुंबे बघतो जी पुरेशी सुट्टी घेत नाहीत किंवा स्वतःवर पुरेसा खर्च करत नाहीत. ते पैसे वाया घालवण्यावर विश्वास ठेवत नाहीत. पण त्यामागचं खर  कारण म्हणजे त्यांच्याकडे संपत्तीच नसते. (संगळेच असे नसतात पण अस लाइफ जगणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे)

यामुळे काय होत माहिती आहे, प्रत्येक वेळी पैसे खर्च केल्याबद्दल त्यांना अनेकदा अपराधी वाटते.  अरे उगाच खर्च केला, माझे पैसे बरबाद झाले किंवा आपण काहीतरी चुकीचे करत आहोत, असे त्यांना वाटते. फ्युचरची चिंता करता करता ते आज जगण विसरून जातात.

त्याचा परिणाम केवळ त्यांना एकट्याला नाही तर त्यांच्या लाइफ पार्टनरला, मुलांना, पालकांना आणि आजूबाजूच्या प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात होतो. चांगले आर्थिक जीवन म्हणजे केवळ पैसे वाचवणे नव्हे, तर समजूतदारपणे पैसे खर्च करणे हे आहे.

Conclusion 

तर आजच तुमच्या Savings आणि Investing ला सुरुवात करा आणि भविष्यात जेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींवर पैसे खर्च करावे लागतील, तेव्हा तुम्ही कुठल्याही अपराधी भावनेशिवाय मोकळ्या मनाने ते करू शकता.

पोस्ट आवडली असेल तर नक्की शेअर करा. काही Feedback असेल तर कमेन्टमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या पोस्टमध्ये!

गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)

Leave a Comment