रवींद्र भारती, ज्यांना फायनान्शियल इन्फ्लुएंसर म्हणून ओळखले जाते. रवींद्र भारती स्टॉक मार्केट ट्रेडिंगशी संबंधित प्रशिक्षण देण्याचा बिझनेस करतात.
SEBI (Securities and Exchange Board of India) ने ₹12 कोटी एवढे पैसे भरण्यास सांगितले आहेत जे त्यांनी बेकायदेशीरपणे कमविले आहेत.
कोण आहेत रवींद्र भारती आणि काय करतात?
रवींद्र भारती (Ravindra Bharti) एक फायनान्स प्रशिक्षक, यूट्यूबर आहेत. २०१६ मध्ये त्यांनी Ravindra Bharti Education Institute Pvt Ltd (RBEIPL) या कंपनीची सुरुवात केली.
त्यांची कंपनी स्टॉक मार्केट संबंधित ट्रेनिंग आणि कोर्सेस पुरवत होते. रवींद्र भारती ३ फेब्रुवारी २०१६ ते ३ ऑक्टोबर ३०२३ पर्यंत या कंपनीचे डायरेक्टर होते.
रवींद्र भारती यांचे दोन यूट्यूब चॅनल आहेत ज्यामध्ये मराठी चॅनलवर १०.८ लाख सबस्क्राईबर्स आहेत तसेच हिंदी चॅनलवर ८.२२ लाख सबस्क्राईबर्स आहेत.
सेबी ऑर्डरमध्ये काय सांगितल आहे?
SEBI ने रवींद्र भारती तसेच त्यांनी पत्नी शुभांगी भारती आणि सध्या कंपनीचे डायरेक्टर राहुल गोसावी आणि धनश्री गोसावी यांच्या विरुद्ध SEBI ने ऑर्डर काढली आहे.
या ऑर्डरनुसार वरील चार व्यक्तींनी आर्थिक सल्ले देण्याची सर्व्हिस बंद करावी. आणि एक आर्थिक सल्लागार म्हणून बंद करावे.
या ऑर्डरनंतर या चार व्यक्तींना शेअर मार्केटमध्ये ट्रेड किंवा बिझनेस करण्यास मनाई केली आहे.
रवींद्र भारती यांची कंपनी SEBI सोबत रजिस्टर नाही. पण तरीही त्यांनी आर्थिक सल्ला देण्याच्या सर्व्हिसच्या नावाखाली मोठा पैसा जमा केला आहे.
SEBI ने जवळजवळ १३ कोटी रुपये एका Escrow Account मध्ये जमा करण्यास सांगितले आहेत जे अकाउंट एका सरकारी बँकमध्ये ओपन करण्यात आले आहे.
SEBI च्या परवानगी शिवाय या बँक अकाउंटमधील पैसे काढता येणार नाही.
इन्वेस्टरच नुकसान सेबी होवू देणार नाही.
इन्व्हेस्टरना 1000% एवढा गॅरेंटीड रिटर्न देण्याच्या नावाखाली त्यांच्या विश्वासासोबत खेळणे चुकीच आहे. २५% ते १०००% रिटर्न एकून अनेक इन्वेस्टटर्स लालचमध्ये येऊन भारती शेअर मार्केटमधून आर्थिक सल्ला घेत होते.
ज्या इणवेस्टरनी भारती शेअर मार्केटमधून आर्थिक सल्ला घेतला होता त्यांना एक करार (Agreement) साइन कराव लागत असे. ज्याममध्ये अशा टर्म्स आणि कंडिशन्स असत की समजा इन्वेस्टमेंटवरील रिटर्न हा जास्त असल्यास त्यामध्ये भारती शेअर मार्केटची प्रॉफिट भागीदारी होती.
SEBI ने सांगितल की सध्या भरतीय शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चुकीच्या पद्धतीने सामान्य इणवेस्टरचा पैसा शेअर मार्केटमध्ये लावला जातो हे थांबवण्यासाठी SEBI वेळोवेळी असे निर्णय घेत असते.
इतर पोस्ट वाचा 👉खर्चाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोण | TIME Vs MONEY
जॉइन टेलीग्राम चॅनल👉 (@marathifinance)