Saraswat Bank Home Loan: सारस्वत बँक होम लोन रेट, प्रोसेस आणि इतर माहिती

Saraswat Bank Home Loan: सारस्वत बँक ही भारताची सगळ्यात मोठी कॉ ऑपरेटिव्ह बँक आहे. सारस्वत बँक वास्तू सिध्दी होम लोन (Saraswat Bank’s Vastu Siddhi Home Loan) या स्कीम अंतर्गत नवीन घर बांधणे, घर खरेदी करणे किंवा जून होम लोन चालू आहे तर ते ट्रान्स्फर करायची सुविधा उपलब्ध करुन देते. आजच्या पोस्टमध्ये आपण सारस्वत बँक होम लोनबद्दल डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत.

जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
सारस्वत बँकेच्या होम लोनची प्रमुख वैशिष्ट्ये

पात्रता: जर तुम्ही कुठे नोकरी करत आहात किंवा तुमचा स्वतचा बिझनेस आहे तर तुम्ही होम लोनसाठी अप्लाय करू शकता. जे लोक नोकरी करतात त्यांना नोकरीवर कन्फर्म होवून कमीत कमी दोन वर्ष झालेली असावीत.

लोनची रक्कम: ₹140 लाखापर्यन्त तुम्ही लोन मिळू शकते.

मार्जिन : Agreement Cost, स्टॅम्प ड्यूटि आणि रजिस्ट्रेशन या तिन्हीच्या कमीत कमी 10% मार्जिन तुमच्याकडून घेतल जाईल. ( एक उदाहरण देतो. समजा तुम्ही 25 लाखाच लोन घ्यायला गेलात तर 10% रक्कम तुमच्याकडून घेतली जाईल म्हणजे 2,50,000 रुपये, यालाच म्हणतात मार्जिन)

रेपेमेंटचा कालावधी: अगदी 20 वर्षापर्यन्त तुम्हाला लोन रेपेमेंटचा कालावधी मिळतो. (पण त्यासोबत Moratorium Period मिळतो. Moratorium Period म्हणजे जेव्हा तुम्हाला होम लोन ईएमआय न भरायची सूट मिळते. पण हे एकदम कठीण परिस्थिति आली की दिल जाते जस की कोरोनामध्ये झाल)

इंट्रेस्ट रेट: सध्याचे होम लोन इंट्रेस्ट रेट 8.80% दर वर्षी असे चालू आहेत. पण तुम्ही कुठे घर घेता, रक्कम किती आहे तसेच तुमचा सीबील स्कोर काय आहे यावरून इंट्रेस्ट रेटमध्ये फरक पडू शकतो.

प्रोसेसिंग फी: सारस्वत बॅंक लोन रककमेच्या 0% ते 0.50% एवढी प्रोसेसिंग फी घेते.

सेक्युर्टी: तुम्ही जे घर घेणार ते तुम्हाला गहाण (Mortgage) ठेवाव लागेल त्यासोबत एका व्यक्तीची ग्यारंटी पण द्यावी लागते.

बँकचे शेअरहोल्डर बनणे: सारस्वत बँकमधून लोन घेताना तुम्हाला त्या बँकेचे शेअरहोल्डर बनाव लागत. ही रक्कम लोन रककमेच्या 2,50% असते किंवा जास्तीत जास्त 25,000 एवढी असते.

ही पोस्ट वाचा: 👉 होम लोन घेताना टर्म इन्शुरेंसची गरज लागेल (कस? ते जाणून घ्या)
सारस्वत बँक होम लोन एक्स्ट्रा बेनिफिट

Top-Up Loans: सारस्वत बँक टॉप अप होम लोनची सुविधा पुरवते. टॉप अप होम लोन म्हणजे आधीपासूनच होम लोन चालू आहे त्यावर अजून एक होम लोन घेणे. टॉप अप होम लोनची रक्कम जास्तीत जास्त 10 लाख एवढी आहे ज्याचा इंट्रेस्ट रेट 8.50% p.a. एवढा असेल.

Pre-Sanction Credit Card: जर तुम्ही सारस्वत बँकमधून होम लोन घेताय तर तुम्हाला आधीपासूनच Saction असलेले क्रेडिट कार्ड मिळू शकते. ज्याची जास्तीत जास्त लिमिट 5 लाख एवढी असते.

सारस्वत बँकेच्या होम लोनसाथी आवश्यक कागदपत्रे
  1. बँकमध्ये जावून तुम्हाला होम लोनसाठी लागणारा फॉर्म घ्याव्या लागेल
  2. लेटेस्ट फोटो, फोटो आयडेंटिटी प्रूफ, अर्जदार आणि हमीदार यांचे राहिवासी पुरावा
  3. नोकरी करता तर: मागील 3 महिन्यांसाठी सॅलरी स्लिप आणि मागील 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट किंवा दोन वर्षांचा ITR किंवा फॉर्म 16
  4. बिझनेस करता तर: मागील 3 वर्षांचा प्रॉफिट – लॉस स्टेटमेंट आणि बॅलेन्सशीट, मागील तीन वर्षांच्या ITR फाइल, 3 महिन्यांचे बँक स्टेटमेंट.
  5. आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे (जे बँक तुम्हाला सांगेल)
Loan AmountProcessing FeeTakeover Fee
Up to Rs.35NilNil
Above Rs.35 Up to Rs.500.30% of loan amount + GSTRs. 5000 + GSTNil
Above Rs.50 Up to Rs.700.40% of loan amount + GSTRs. 10000 + GSTNil
Above Rs.70 Up to Rs.1400.50% of loan amount + GSTRs. 15000 + GSTNil
सतत विचारले जाणारे प्रश्न | FAQs

सारस्वत बँक होम लोन घेण्यासाठी पात्रता काय आहे?

जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल किंवा स्वतःचा व्यवसाय असेल, तर तुम्ही होम लोनसाठी अर्ज करू शकता. नोकरी करणाऱ्यांनी किमान दोन वर्षे नोकरीवर कन्फर्म असणे आवश्यक आहे.

होम लोन मार्जिन म्हणजे काय?

Agreement Cost, स्टॅम्प ड्यूटी आणि रजिस्ट्रेशन यांच्या एकूण रकमेपैकी किमान 10% मार्जिन तुमच्याकडून घेतले जाईल. उदाहरणार्थ, ₹25 लाखाचे लोन घेतल्यास ₹2,50,000 मार्जिन म्हणून द्यावे लागेल.

सारस्वत बँकेमधून होम लोन घेताना बँकेचे शेअरहोल्डर बनावे लागते का?

हो, सारस्वत बँकमधून लोन घेताना तुम्हाला बँकेचे शेअरहोल्डर बनावे लागते. ही रक्कम लोन रकमेच्या 2.50% किंवा जास्तीत जास्त ₹25,000 एवढी असते.

टॉप अप होम लोन म्हणजे काय?

टॉप अप होम लोन म्हणजे चालू होम लोनवर अजून एक होम लोन घेणे. टॉप अप होम लोनची जास्तीत जास्त रक्कम ₹10 लाख आहे ज्यावर 8.50% p.a. व्याजदर आहे.

सारस्वत बँक होम लोनसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

अर्ज, लेटेस्ट फोटो, फोटो आयडेंटिटी प्रूफ, अर्जदार आणि हमीदार यांचे रहिवासी पुरावा, नोकरी करणाऱ्यांसाठी मागील 3 महिन्यांचे सॅलरी स्लिप्स आणि बँक स्टेटमेंट किंवा दोन वर्षांचा ITR किंवा फॉर्म 16, व्यवसाय करणाऱ्यांसाठी मागील 3 वर्षांचे प्रॉफिट-लॉस स्टेटमेंट आणि बॅलेन्सशीट, ITR फाइल आणि बँक स्टेटमेंट.

अधिक माहितीसाठी तुम्ही सारस्वत बँकेच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Best Home Loan Scheme in India - Saraswat Co-operative Bank (saraswatbank.com)

Leave a Comment