Mutual Fund SIP: इंस्टाग्राम पेजवरील एका फॉलोवरने असा मेसेज केला की मी टोटल 7 म्युच्युअल फंडमध्ये SIPs करत आहे तर त्यापैकी कोणता घेऊ आणि कोणता काढू हे मला सांगाल का? त्यामुळे या पोस्टमध्ये आपण याच टॉपिकवर यावर चर्चा करणार आहोत. मला खात्री आहे यातून तुम्हाला पण काहीतरी नवीन शिकायला मिळेल, चला तर सुरुवात करूया.
त्याने दिलेल्या म्युच्युअल फंडची माहिती, आता या सगळया फंडस्बद्दल थोडक्यात समजून घेऊ.
१) HDFC Small Cap Fund
SIP रक्कम:- 1000
Expense Ratio: – 0.73%
५ वर्षाचा रिटर्न:- 23.33%
२) Quant Small Cap Fund Direct Growth
SIP रक्कम:- 1000
Expense Ratio: – 0.77%
५ वर्षाचा रिटर्न:- 33.78%
३) Nippon India Small Cap Fund Direct Growth
SIP रक्कम:- 300
Expense Ratio: – 0.69%
५ वर्षाचा रिटर्न:- 29.20%
४) Axis Small Cap Fund Direct Growth
SIP रक्कम:- 500
Expense Ratio: – 0.52%
५ वर्षाचा रिटर्न:- 28.14%
५) Motilal Oswal Small Cap Fund Direct Growth
SIP रक्कम:- 500
या फंडचा Expense Ratio किंवा रिटर्न अजून तरी नाही कारण हा एक NFO (New Fund Offer) जो 19 डिसेंबरला बंद होईल.
६) Nippon India Growth Fund
SIP रक्कम:- 200
Expense Ratio: – 0.84%
५ वर्षाचा रिटर्न:- 25.30%
७) Motilal Oswal Nifty Microcap 250 Index Fund Direct Growth
SIP रक्कम:- 500
Expense Ratio: – 0.35%
५ वर्षाचा रिटर्न नाही कारण हा फंड जून 2023 मध्ये लॉंच झाला आहे.
टोटल ५ स्मॉल कॅप फंडची गरज काय?
त्याच्या म्युच्युअल फंड पोर्टफोलिओमध्ये टोटल ५ म्युच्युअल फंड्स आहेत ज्याची खरंच काही गरज नाही. मला माहीत आहे आपण सगळेच जण स्मॉल कॅप फंड कॅटेगरीमधील जबरदस्त रिटर्न बघून त्यामध्ये पैसे इनवेस्ट करतो. पण एका पेक्षा जास्त स्मॉल कॅप फंड कधी घ्यावे जर तुमची इनवेस्टमेंटची रक्कम खरंच खूप मोठी असेल.
उदाहरणार्थ: एखाद्याला 10,000 रुपये इनवेस्ट करायचे आहेत तेही स्मॉल कॅप फंडमध्ये आणि त्यासाठी तो जास्त रिस्क घ्यायला तयार आहे तर त्याने 5,000 हजारच्या 2 SIP वेगवेगळ्या फंडसमध्ये केल्या तरी चालतील. पण ते करत असताना त्या दोन्ही फंडमधील स्टॉक्स Overlap तर करत नाही हे आधी चेक करा.
आता हे Overlapping काय? समजा फंड A मध्ये काही स्टॉक्स आहेत आणि तेच स्टॉक्स फंड B मध्ये सुद्धा आहेत तर याला Overlapping अस म्हणतात. दोन्ही फंडसमध्ये स्टॉक्स तेच असणार तर रिटर्न वेगळा मिळणार नाही. उगाच एक्सपेंस रेशियो भरावा लागेल. (Axis Small Cap Fund आणि Nippon India Small Cap Fund मध्ये 14% ची Overlapping आहे. म्हणजे तेच स्टॉक्स आहेत.👇
आता हा फॉलोवर टोटल 3,300 रुपये फक्त स्मॉल कॅप फंड कॅटेगरीमध्ये इनवेस्ट करत आहे ते त्याने कमी करून एका चांगल्या फंडमध्ये इनवेस्ट कराव. आता यापैकी चांगला फंड कोणता? जर मला विचारल तर मी Quant Small Cap Fund Direct Growth निवडेन किंवा Axis Small Cap Fund Direct Growth निवडेन. आणि हो स्मॉल कॅप फंडमध्ये एवढेच पैसे इनवेस्ट करावे ज्यामध्ये तुम्ही जास्त रिस्क घेऊ शकता. सगळे पैसे फक्त रिटर्न जास्त आहेत म्हणून स्मॉल कॅप फंड कॅटेगरीमध्ये इनवेस्ट करणे योग्य नाही.
मायक्रो कॅप इंडेक्समधील एक फंड
फॉलोवर 500 रुपयाची SIP Motilal Oswal Nifty Microcap 250 Index Fund Direct Growth या फंडमध्ये करत आहे. आता हा एक इंडेक्स फंड आहे तर आपल्याला समजल पण हा फंड मायक्रो कॅप इंडेक्सला कॉपी करत आहे. मायक्रो कॅप इंडेक्स म्हणजे मार्केटमधील 501 नंबरची कंपनी ते 750 वी कंपनी. आता ही इंडेक्स 2021 मध्ये लॉंच झाली होती त्यामुळे याचा जास्त डेटा उपलब्ध नाही.
आणि जर स्मॉल कॅप फंड घेऊन आधीच एवढी रिस्क घेत आहोत तर अजून रिस्क कशाला घ्यायची. आता हा फंड जून 2023 मध्ये लॉंच झाला होता आणि तेव्हापासून या फंडने 34.35% चा रिटर्न दिला आहे.
आता रिटर्न बघून वाटेल की यार फंड तर मस्त आहे पण सध्याच मार्केट बघा. दररोज नवीन उच्चांक गाठत आहे पण खरी परीक्षा मार्केट डाऊन होईल तेव्हा असेल. मी स्वता या फंडमध्ये कधी इनवेस्ट नसत केल पण रक्कम 500 आहे आणि तू रिस्क घेऊ शकतोस तर सदया होल्ड कर. गरज लागली तर पैसे काढ आणि SIP बंद कर. (अस मला वाटत)
अजून एक कॅटेगरी राहिलीय ती म्हणजे मिड कॅप फंड
त्याच्या म्यूचुअल फंड पोर्टफोलिओमध्ये Nippon India Growth Fund आहे जो एक मिड कॅप फंड आहे. कंपनीवाले नाव पण अशी ठेवतात की कन्फ्युज व्हायला होत. सरल मिड कॅप फंड सांगणार नाहीत. आता मिड कॅप कॅटेगरी म्हणजे मार्केटमधील 101 नंबरची कंपनी ते 150 वी कंपनी किंवा जीच मार्केट कॅप मार्केट कॅप ५,००० कोटी ते २०,००० कोटी या दरम्यान असते.
पण तुम्हाला एक shocking डेटा पॉइंट सांगतो 28 मिड कॅप फंड्सपैकी फक्त 3 मिड कॅप Funds चा रिटर्न Midcap इंडेक्स पेक्षा जास्त आहे. हो हो फक्त 3. त्यामुळे जर तुम्ही खूपच लकी आहात, तुम्ही निवडलेला फंड चांगला फंड निघाला किंवा तो फंड मॅनेजर स्मार्ट निघाला तर रिटर्न मिळणार नाहीतर रिटर्नला विसरा.
मी स्वता मिड कॅप कॅटेगरीमधील फंडमध्ये इनवेस्ट करत नाही. पण हा प्रत्येकाचा निर्णय आहे.
म्यूचुअल फंड पोर्टफोलिओ Diversify करा, Di-worsify नको.
Diversification म्हणजे एकाच प्रकारच्या कॅटेगरीमध्ये सगळे पैसे इन्व्हेस्ट न करता वेगवेगळ्या कॅटेगरी मधील म्युच्युअल फंड्स मध्ये पैसे करणे.
Di-worsification म्हणजे एकाच प्रकारच्या कॅटेगरी मधील अनेक फंडस घेऊन पोर्टफोलिओची अगदी वाट लावून टाकणे.
कोणताही फंड निवडण्याआधी त्याला समजून घ्या. त्यासोबत तो फंड तुम्ही का घेत आहात हे स्पष्ट करा. आपण बोलताना अगदी सहज बोलतो की मी लॉन्ग टर्मसाठी फंड घेतला आहे. पण लॉन्ग टर्म म्हणजे नक्की किती? 5 वर्ष, 10 वर्ष की 20 वर्ष ते आधी स्पष्ट करा आणि त्यानुसार फंड निवडा. एकाच फंड कॅटेगरीमध्ये पैसे इनवेस्ट करून जास्त रिटर्नच्या मागे धावू नका. एक योग्य आणि बॅलेन्स पोर्टफोलिओ बनवा जो तुमच्या Financial Goals पूर्ण करण्यात हेल्प करेल.
Happy SIPing 💰🚀
Sir muze expenses ratio ki jankari chahiye
mai is par ek post banunga