Liquid Fund in Marathi: लिकविड फंड हा एक म्यूचुअल फंडचाच प्रकार आहे. पण म्यूचुअल फंड म्हटल की आपल्या डोक्यात फक्त इक्विटि म्यूचुअल फंडचा विचार येतो. (असे फंड्ज जे शेअरमध्ये इनवेस्ट करतात.) पण लिकविड फंड या बाबतीत थोडे वेगळे आहेत. (थोडे काय जरा जास्तच)
पण त्याआधी हे लिकविड नाव का ठेवलय? ते समजून घ्या.
Liquid म्हणजे जर अचानक पैसे लागले की पटकन काढता येतील. फॉर एक्झॅम्पल…
तुम्ही सोनाराकडे गोल्ड विकायला जा, तो लगेच तुम्हाला त्याबदली पैसे देईल. याच कारण गोल्ड हे अस Asset आहे ज्याची Liquidity जास्त असते.
लिकविड फंडच पण अगदी असच आहे, पैसे लागले की लगेच काढता येतात. पण लिकविड फंडमध्ये इनवेस्ट केलेले पैसे हे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये इनवेस्ट केले जात नाहीत.
तर ते पैसे Debt Instruments मध्ये इनवेस्ट जातात जस की,
– Treasury Bills
– Commercial Papers
– Negotiable Certificates of Deposits इत्यादि.
अजून बरेच Instruments असतात पण मुद्दा हा आहे यांची मॅच्युरिटी ही 91 दिवसांची असते.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance)
मग लिकविड फंडमध्ये 91 दिवसांसाठीच पैसे इनवेस्ट करता येतात का?
नाही! कारण तुम्ही पैसे 91 दिवसांपेक्षा जास्त टाइमसाठी ठेऊ शकता. तुमचा फंड मॅनेजर नवनवीन Instruments तुमच्यासाठी खरेदी आणि विक्री करत असतो.
लिकविड फंडमध्ये रिटर्न किती मिळतो?
अगदी FD एवढा = 5 ते 7%, त्यामुळे लिकविड फंडना FD सोबत नेहमीच कम्पेर केल जात.
लिकविड फंडमध्ये इनवेस्ट केल पाहिजे?
जर एक्स्ट्रा पैसे बँक अकाऊंटमध्ये पडून असतात आणि त्यावर Saving अकाऊंटपेक्षा जास्त रिटर्न हवंय तरच इनवेस्ट करा.
मग त्या पेक्षा FD काय वाईट असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
कारण FD मध्ये पैसे लॉक होतात जितक्या टाइमसाठी तुम्ही FD करणार. आणि त्याआधी पैसे काढलेत तर पेनॉल्टी लागते. पण लिकविड फंडच अस नाहीये. तुम्ही 7 दिवसानंतर कधीही पैसे काढू शकता. त्याआधी काढलेत तरच पेनॉल्टी असते.
Liquid Fund आणि Fixed Deposit ची तुलना आपण खालील पॉईंट्सच्या आधारे करू शकतो
1 – रिस्क किती असते?
FD – FD खूप कमी रिस्क असलेल Asset आहे कारण मोठमोठ्या बँक्स किंवा NBFCs त्यांना इश्यू करतात.
Liquid Fund- लिकविड फंडमधील पैसे हे Debt Instruments मध्ये इनवेस्ट केले जातात ज्यांच्या किंमती वर खाली होत असतात त्यामुळे लिकविड फंडमध्ये FD पेक्षा जास्त रिस्क असते.
2 – रिटर्न किती मिळणार?
FD – FD मध्ये रिटर्न हा FD करतो तेव्हाच माहीत असतो आणि तो फिक्स्ड असतो. तुम्ही जितक्या टाइमसाठी FD करणार त्यानुसार तुम्हाला रिटर्न मिळणार. (5-7%)
Liquid Fund- लिकविड फंडमध्ये FD सारखा Guaranteed रिटर्न्स मिळत नाही. पण हा FD पेक्षा जास्त रिटर्न नक्कीच मिळू शकतो जर तुम्ही फंड चांगला निवडला असेल.
3- अचानक पैसे काढले तर काय होईल?
FD – आपण जेव्हा FD करतो तेव्हाच मॅच्युरिटीची तारीख ठरवली जाते. आणि त्याआधी पैसे काढले तर पेनॉल्टी लावली जाते.
Liquid Fund – लिकविड फंडमध्ये 7 दिवसानंतर तुम्ही कधीही पैसे काढू शकता त्यावर कसलीच पेनॉल्टी लावली जात नाही.
4 – किती वर्षासाठी पैसे इनवेस्ट करता येतात?
FD – FD मध्ये तुम्ही 7 दिवसांपासून ते अगदी 10 वर्ष एवढ्या टाइमसाठी इनवेस्ट करू शकता.
Liquid Fund – लिकविड फंडमधील पैसे शॉर्ट टर्म Instruments मध्ये इनवेस्ट केले जातात ज्यांची मॅच्युरिटी 91 दिवसांसाठी असते. पण याचा अर्थ अस नाही की लिकविड फंडमध्ये पैसे फक्त 91 दिवसांसाठी इनवेस्ट करता येतात. तुम्ही या पेक्षा जास्त टाइमसाठी पैसे इनवेस्ट करू शकता कारण तुमचा फंड मॅनेजर नवनवीन Instruments तुमच्यासाठी खरेदी आणि विक्री करत असतो.
म्यूचुअल फंडसाठी बेस्ट App 👉 Groww
5- टॅक्स किती लागतो?
FD – तुम्ही जय ट्रक्स स्लॅबमध्ये येता त्यानुसार तुम्हाला FD वर टॅक्स लागतो सोबत 10% एवढा TDS देखील घेतला जातो. (जर तुमची इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये सध्या येत नसेल तर टेंशन घेऊ नका)
Liquid Fund – जर तुम्ही 3 वर्षा पेक्षा जास्त टाइम साठी पैसे लिकविड फंड ठेवत असाल तर तुम्हाला long-term capital gains टॅक्स लागतो तेही 20% च्या हिशोबाने. आणि 3 वर्षाच्या आधी पैसे काढलेत तर ज्या टॅक्स स्लॅबमध्ये तुम्ही येता त्यानुसार तुम्हाला टॅक्स लागतो.
6- एक्स्ट्रा पैसे इनवेस्ट करता येतात का?
FD – तुम्हाला माहीत असेलच एकदा FD केली की ती फिक्स्ड होते त्यामध्ये अजून पैसे इनवेस्ट करता येत नाही.
Liquid Fund – या बाबतीत लिकविड फंड बेस्ट आहेत कारण हवे तेव्हा तुम्ही एक्स्ट्रा पैसे इनवेस्ट करू शकता.
Conclusion हेच आहे की…
लिकविड फंड असो की FD, यांचा वापर सहसा शॉर्ट टर्ममध्ये पैसे सेव करण्यासाठी केला जातो. आता यापैकी तुमच्यासाठी कोणता ऑप्शन बेस्ट आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि मग त्यानुसार तुमच्या शॉर्ट टर्म सेविंगसाठी तो ऑप्शन निवडायचा आहे.
Happy Investing!
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉 म्यूचुअल फंडवर लोन काढता येत का? | Loans Against Mutual Funds in Marathi (marathifinance.net)
1 thought on “लिकविड फंड काय आहे? लिकविड फंड की FD? काय बेस्ट आहे? | Liquid Fund in Marathi”