IDFC First Bank & LIC: आयडीएफसी फर्स्ट बँक, एलआयसी कार्ड्स, मास्टर कार्ड या कंपनीच्या मदतीने एक युनिक को- ब्रँडेड क्रेडिट कार्ड लॉन्च करणार आहेत. या कार्डचे दोन प्रकार कस्टमरसाठी उपलब्ध असणार, एक म्हणजे एलआयसी क्लासिक आणि दुसर म्हणजे एलआयसी सिलेक्ट.
या पार्टनरशिपच्या माध्यमातून 27 करोड एलआयसी पॉलिसी होल्डरच्या आर्थिक गराजांना पुरे करण्याचा कंपनीचा हेतू आहे.
एलआयसी पॉलिसीचा इन्शुरन्स प्रीमियम भरताना या कार्डचा वापर केल्यास त्यावर अनेक रिवॉर्ड पॉईंट्स मिळतील तसेच या क्रेडिट कार्डसोबत पाच लाखाचे पर्सनल एक्सीडेंट इन्शुरन्स मिळणार आहे. या क्रेडिट कार्डच्या मदतीने एअरपोर्ट आणि रेल्वे स्टेशन lounges चा फायदा घेता येईल.
आयडीएफसी बँकचे मॅनेजिंग डायरेक्टर वैद्यनाथन यांनी सांगितले की एलआयसी पॉलिसी होल्डरना या कार्डच्या माध्यमातून एक्स्ट्रा बेनिफिट देता येतील. LIC Cards चे चेअरमन सिद्धार्थ मोहन यांनी या पार्टनरशिप वर जोर देताना सांगितले की, आम्ही आमच्या कस्टमरसाठी top-notch सर्विस देणार आहोत.
फायनॅन्स नॉलेज आणि न्यूजसाठी मराठी फायनॅन्स कम्यूनिटी जॉइन करा👉 (@marathifinance)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
Punjab National Bank: 1 लाख करोड मार्केट कॅपचा आकडा पार करणारी तिसरी सरकारी बँक