MUTUAL FUND SIP: अनेक गुंतवणूकदार मागील वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडमध्ये पैसे इन्वेस्ट करतात आणि त्यांच्या Mutual Fund SIP मध्ये बदल करतात. पण, व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने (WhiteOak Capital Mutual Fund) केलेल्या स्टडीमधून असे दिसून आले आहे की मागील वर्षाच्या कामगिरीवर सतत तुमच्या म्यूचुअल फंडमध्ये बदल केल्याने दीर्घकालीन गुंतवणूक पोर्टफोलिओची कामगिरी उत्कृष्ट होत नाही. थोडक्यात रिटर्न चांगले मिळत नाहीत.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance
सातत्यपूर्ण गुंतवणूक का करावी?
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडाने गेल्या 19 वर्षांतील म्युच्युअल फंडाच्या रिटर्नचा अभ्यास केला आणि असे आढळून आले की 2005 पासून मिड किंवा स्मॉल-कॅप इंडेक्स फंडात राहिलेल्या गुंतवणूकदारांनी वार्षिक Mutual Fund SIP बदलणाऱ्यांपेक्षा जास्त रिटर्न मिळवला आहे.
याचा अर्थ असा की जो गुंतवणूकदार दर वर्षी मला बेस्ट फंड हवाय म्हणून Mutual Fund SIP चा म्यूचुअल फंड बदलत असतो, तेही जास्त रिटर्न मिळेल या अपेक्षेने, खर तर त्याला फायदा नाही तर नुकसान होत.
SIP नेहमी लॉन्ग टर्मसाठी का करावी?
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडची स्टडी असे दर्शवते की ज्या गुंतवणूकदाराने एप्रिल 2005 मध्ये मिड-कॅप फंडामध्ये SIP सुरू केली आणि एप्रिल 2024 पर्यंत त्याच फंडमध्ये गुंतवणूक केली असेल त्याने 18.1% वार्षिक रिटर्न मिळविला असेल. म्हणजे फंड अजिबात बदलला नाही.
याउलट जो गुंतवणूकदार 2005 ते 2024 या प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मागील वर्षाच्या सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या फंडाकडे वळला असेल तर त्याला 15.5% वार्षिक रिटर्न मिळाला आहे. म्हणजे दर वर्षी जो बेस्ट फंड आहे त्यामध्ये SIP केली. एकीकडे फंड न बदलता 18.1% एवढा रिटर्न मिळाला तर एकीकडे बेस्ट फंड घेऊन पण 15.5% रिटर्न मिळाला.
यासोबतच या स्टडीमध्येमध्ये हे सांगितल गेल की जर तुम्ही मिड-कॅप इंडेक्ससाठी 10 वर्षांचा Mutual Fund SIP रिटर्न पाहिला, तर वार्षिक रिटर्न 16.6% आहे. दुसरीकडे, स्विचिंग गेम खेळणाऱ्या गुंतवणूकदारांनी 14.5% रिटर्न मिळाला आहे.
ही पोस्ट वाचा 👉 एसआयपीमध्ये ₹500 – ₹1000 पर्यंत गुंतवणूक करून किती फायदा होऊ शकतो?
महत्वाचा मुद्दा असा आहे की
व्हाईटओक कॅपिटल म्युच्युअल फंडच्या या स्टडीने हे कन्फर्म केल आहे की जो फंड तुम्ही निवडला आहे त्यामध्ये SIP करत रहा. सतत SIP साठी या वर्षी हा फंड मग पुढच्या वर्षी दूसरा फंड, अशा भानगडीत पडू नका. नेहमी लक्षात ठेवा की Consistency is the key!