या ५ बँका देत आहेत सगळयात स्वस्त होम लोन (जाणून घ्या इंटरेस्ट रेट) | 5 Banks Offering Lowest HOME LOAN Interest rate | Marathi Finance

HOME LOAN: काय तुम्ही या वर्षी तुमचं हक्काचं घर घ्यायची तयारी करत आहात? पण ते करण्याआधी कोणत्या बँका होम लोनवर सगळ्यात कमी इंटरेस्ट रेट लावत आहेत हे जाणून घेणे खूप गरजेचं आहे. कारण जितका कमी इंटरेस्ट रेट तेवढी तुमची पैशाची बचत जास्त होते. या पुढील ५ बँका सगळ्यात कमी इंटरेस्ट रेटवर होम लोन देत आहेत:

कोटक महिंद्रा बँक होम लोन रेट्स | Kotak Mahindra Bank Home Loan Rates

जर तुम्ही जॉब करत असाल तर कोटक महिंद्रा बँकेमध्ये तुम्हाला ८.७०% या रेटने होम लोन मिळू शकते. जर तुम्ही स्वतःचा बिझिनेस करत असाल तर कोटक महिंद्रा बँकेमध्ये तुम्हाला ८.७५% या रेटने होम लोन मिळू शकते.

एचडीएफसी बँक होम लोन रेट्स | HDFC Bank Home Loan Rates

HDFC बँकमध्ये तुम्हाला होम लोन 8.75% ते 9.65% या दरम्यान उपलब्ध होते. तुमचं सिबिल स्कोअरवरुन तुमच्या इंटरेस्ट रेटमध्ये फरक पडू शकतो.

आयसीआयसीआय बँक होम लोन रेट्स | ICICI Bank Home Loan Rates

जर तुमचं सिबील स्कोअर चांगला असेल (सहसा ७०० च्या वर) तर ICICI बँक तुम्हाला ९% ते ९.१०% असे इंटरेस्ट रेट ऑफर करते. ICICI बँकेचं स्टँडर्ड रेट ९.२५% ते १०.०५% एवढे आहेत. तुझी किती रक्कमेच लोन घेणार यावरून पण तुमचं इंटरेस्ट रेट ठरत असतो.

ही पोस्ट वाचा 👉  सीबील स्कोर काय आहे? का गरजेच आहे?

स्टेट बँक ऑफ इंडिया होम लोन रेट्स | State Bank of India Home Loan Rates

स्टेट बँक ऑफ इंडिया तुम्हाला ९.१५% ते ९.६५% या दरम्यान इंटरेस्ट रेट उपलब्ध करून देते. जितकं जास्त सिबील स्कोअर तितकं कमी इंटरेस्ट रेट तुम्हाला मिळू शकेल.

बँक ऑफ बडोदा होम लोन रेट्स | Bank of Baroda Home Loan Rates

जर तुम्ही जॉब करत असाल तर कोटक बँक ऑफ बडोदामध्ये तुम्हाला ९.१५ ते १०.५०% या रेटने होम लोन मिळू शकते. जर तुम्ही स्वतःचा बिझिनेस करत असाल तर बँक ऑफ बडोदा तुम्हाला ९.२५% ते १०.६०% या रेटने होम लोन मिळू शकते.

बँकेचे नावकर्मचारी इंटरेस्ट रेटबिझनेस इंटरेस्ट रेट
कोटक महिंद्रा बँक8.70%8.75%
एचडीएफसी बँक8.75% ते 9.65%8.75% ते 9.65%
आयसीआयसीआय बँक9% ते 9.10%9% ते 9.10%
स्टेट बँक ऑफ इंडिया9.15% ते 9.65%9.15% ते 9.65%
बँक ऑफ बडोदा9.15% ते 10.50%9.25% ते 10.60%

निष्कर्ष

होम लोन निवडताना फक्त इंटरेस्ट रेट विचारात घेणे पुरेसे नाही. इतर घटकांचाही विचार करणे महत्वाचे आहे, जसे की प्रक्रिया शुल्क (Professing Fee), EMI चे ऑप्शन्स आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या बँकेची कस्टमर सर्व्हिस.

तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार सर्वोत्तम होम लोन निवडण्यासाठी विविध बँकांची तुलना करा आणि तुमच्यासाठी कोणती बँक योग्य आहे हे ठरवा. तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर वास्तवात उतरवण्यासाठी शुभेच्छा!

जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance

Leave a Comment