Retirement Planning in Marathi: तुमच्या हातात एक स्मार्टफोन आहे, तुम्ही चांगले कपडे देखील घालत असाल आणि तुम्ही घरचे सगळे खर्च पूर्ण करण्यासाठी सक्षम आहात. अधून मधून तुम्ही मित्रांसोबत बाहेर फिरायला देखील जाता.
हे सगळं करणं ठीक आहे जर तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी पुरेशी सेविंग करत आहात.
पण तुमचे खर्च नेहमीच तुमच्या इन्कम एवढे असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या की “एक दिवशी इन्कम पूर्णपणे बंद होईल पण खर्च काय बंद होणार नाही”.
पण हे सगळ कधी होईल? हे होईल जेव्हा तुम्ही ६० वयाचे व्हाल. 60 नंतर हाता पायात ताकत नसते. पण 60 नंतर खर्च जरी कमी वाटत असले तरी खर्च तर होणारच आहेत. आणि 60 नंतर तुम्ही अजून २५ ते ३0 वर्ष जगणार आहात. (यापेक्षा जास्त जगा हीच ईश्वर चरणी प्रार्थना)
पण तुम्ही 60 वयापर्यंत पुरेशी सेविंग किंवा वेल्थ बनवली नाही तर त्या पुढच आयुष्य खूप कठीण असेल. कल्पना करा की 60 नंतर तुमच्याकडे फक्त पाच वर्षांचा खर्च भागेल एवढे पैसे बँक अकाउंट असतील.
ही किती भयानक परिस्थिती असेल!
मी ऑफिसला जाताना चाय प्यायला जोगेश्वरी मेट्रो स्टेशनच्या खाली थांबतो. त्या चायव्याला काकांच्या बाजूला एक छोटाश्या स्टॉलवर सिगरेट आणि इतर गोष्टी विकताना एक खूप वयस्कर काका (खर तर आजोबा म्हणावं लागेल) असतात.
त्यांना बघून नेहमी हाच प्रश्न येतो की अजून पण काम करावं लागतं आहे, अस का? मग मनात विचार येतो “काय मी फ्युचरसाठी पूरेशी सेवींग करत आहे?” मी तुम्हाला सगळ्यांना आग्रह करेन की तुम्ही सुद्धा हा प्रश्न स्वतःला विचारा तोही आताच.
जॉइन मराठी फायनॅन्स कम्यूनिटी👉 (@marathifinance)
म्हातारपणी पुरेशी Wealth नसेल तर?
कल्पना करा की तुम्हाला महिन्याला एक ठराविक रक्कम लागते पण 60 नंतर कमाई तर बंद झाली आहे आणि जो पैसा हातात आहे त्यातून पुढचं आयुष्य जगायचं असेल तर काटकसर तर करावी लागेल.
आता पर्यंत तुम्ही चांगल जेवण करत होतात पण अचानक स्वस्त जेवण घेऊन तुम्हाला पैसे सेव करावे लागत आहेत. जेव्हा पण तुम्ही कधी बाहेर फिरायला जाणार तेव्हा तुम्हाला स्वस्त ट्रॅव्हलिंगचा ऑप्शन कुठे मिळेल हे बघावं लागणार आहे. मित्र कधी बाहेर फिरायला जायचा, बाहेर भेटायचा प्लॅन करत आहेत पण तुम्हाला ते शक्य नाही.
आणि अशा प्रकारच्या अनेक परिस्थिती तुमच्या समोर असतील.
आता हे सगळं विचार करताना आता खूप ड्रामा वाटेल. आता हे सगळ कोण विचार करत. नंतर बघू काय होईल ते. पण एक गोष्ट लक्षात घ्या फ्युचरची काय असेल हे आपल्या कोणालाच माहीत नाही. फ्युचरची आपण फक्त कल्पना करू शकतो.
मी अस बोलत नाहीये की आता मौज मजा करणे अगदी बंद करा आणि सगळे पैसे सेव करा. मला फक्त हे सांगायचं आहे की पुरेशी सेविंग न केल्यास फ्युचरमध्ये परीणाम काय असतील याचा विचार तुम्ही केला पाहिजे.
आता यावर उपाय काय?
तुम्हाला अजपासूनच Financial Planning मधील एक महत्वाचा भाग म्हणजे Retirement Planning करावी लागेल! आता Financial Planning म्हणजे नक्की काय? तुम्ही जी काही इन्कम करत आहात त्यापैकी किती रक्कम तुम्ही तुमच्या फ्युचरसाठी किंवा रिटायरमेंटसाठी बाजूला काढत आहात याचा विचार करणे.
कमीत कमी 10% रक्कम तुम्ही फक्त आणि फक्त फ्युचर प्लॅनिंग किंवा Retirement Planning साठी दिली पाहिजे. एक साध उदाहरण घेऊ. जर तुमची सॅलरी 20,000 असेल तर त्याची 10% रक्कम तुम्ही फ्युचरसाठी इन्वेस्ट करायची आहे. फक्त 10% ने एवढ काय होईल असा तुम्हाला वाटत आहे. गणित करून बघू.
20,000 रुपायच 10% म्हणजे 2,000 रुपये. 2000 ची एक सिम्पल SIP एका इंडेक्स फंडमध्ये करून बघू. कॅलक्युलेशनसाठी आपण 25 हे सुरुवातीच वय घेऊ. (आता कोणी या पेक्षा छोटे असतील तर कोणी मोठे पण आपण 25 एक Average वय पकडू)
वय वर्ष 25 ते 60 म्हणजेच 35 वर्ष तुम्हाला ही सिम्पल SIP करायची आहे. आता काही जण बोलतील की 60 वर्ष खूप जास्त झाले. हे बघा आपण इथे एक कॅलक्युलेशन करत आहोत. मला खात्री आपल्यापैकी काही जण याआधीच रिटायर होतील.
2000 रुपये 35 वर्ष तेही कमीत कमी 12% च्या इंटरेस्ट रेटने इन्वेस्ट केलेत तर तुम्हाला 1,29,90, 538 रुपये मिळतील. आता इथे काही पॉईंट्स तुम्ही लक्षात घेतले पाहिजेत आपण रिटर्न फक्त 12% घेतला आहे जो जास्त सुद्धा मिळेल याची पूर्ण शक्यता आहे. काहीना वाटेल पण रिटर्न कमी पण होवू शकतो.
सेंसेक्स आणि निफ्टि म्हणजे भारताच्या शेअर मार्केट Average 12-13% रिटर्न दिला आहे. ज्या प्रकारे भारताची ग्रोथ गेल्या 10 वर्षात झाली आहे. त्याहून जास्त ग्रोथ येणाऱ्या 10-20 वर्षात आपल्या संगळ्यांना बघायला मिळेल.
तो हर्षद मेहताचा डायलॉग आहे ना “Invest in India इंडिया का भाव बढ़ने वाला है” आणि हे अगदी खर आहे. जेव्हा ही पोस्ट मी लिहितोय तेव्हा सेंसेक्सने 73,000 चा आकडा पार केला आहे आणि निफ्टि50 22,000 च्या वर आहे. आता विचार करा पुढील 20 वर्षात काय होईल?
नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही आज पैसे सेव करायला सुरुवात कराल पण त्याचा लगेच फायदा तुम्हाला मिळणार नाही. वेल्थ बनण्यासाठी तुम्हाला काही वर्षाचा संयम बाळगावा लागेल. त्यासोबत फ्युचरसाठी सेविंग करत असताना आजचे खर्च अगदी बंद करणे योग्य नाही. आणि म्हणून
फ्युचर प्लॅनिंग करताना आजला विसरू नका!
तुम्हाला आजची एन्जॉयमेंट आणि फ्युचर प्लॅनिंग या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन चालायचं आहे. अस नको व्हायला की फ्युचर प्लॅनिंग करता करता आज जगायच विसरून जाल. फक्त एवढ लक्षात ठेवा की नको ते खर्च कसे टाळता येतील. फ्युचरसाठी सेव करताना खालील गोष्टींकडे नीट लक्ष द्या.
- शॉपिंग करताना एखाद्या गोष्टींची खरंच गरज आहे का हे विचारा. जर नसेल तर तिथे पैसे सेव करा.
- सतत बाहेरच फूड खाताय? म्हणजे हेल्थ पण गेली आणि वेल्थ पण. बाहेर खान कमी करता येत का ते बघा.
- सतत नवीन फोन किंवा इतर गॅजेट्स घेताना विचार करा.
- गरज असेल तेवढे कपडे घ्या (आज बघा की असे किती कपडे आहात जे तुम्ही या एक वर्षात वापरलेच नाहीत)
- जिथे कुठे तुम्हाला पैसे सेव करता येतील तिथे नक्की सेव करा.
फ्युचरसाठी पुरेशी सेविंग न करणे म्हणजे तुम्ही स्वतःला सांगताय की म्हातारपणी मी इतर व्यक्तींवर माझ्या दैनंदिन खर्चासाठी अवलंबून राहणार आहे.
मी माझ्या आत्ताच्या लाईफस्टाईल पेक्षा खूप काटकसर करावी लागणारी लाईफस्टाईल म्हातारपणी जगायला तयार आहे. मी म्हातारपणी दररोज एक कठीण आणि टेंशनने भरलेली लाइफ जगायला तयार आहे.
तुम्ही जर म्हातारपणी हे सगळ्या गोष्टींसाठी तयार असाल तर आता पैशाची सेविंग करू नका. पण तुम्ही आत्ता पासून सेविंग करायचा प्लॅन करत असाल तर खालील टिप्स तुमची नक्की हेल्प करतील.
बजेट बनवा:- तुमचा पैसा कुठून येतोय,किती येतोय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुठे खर्च होतोय त्याचा हिशोब ठेवा.
सेविंग गोल सेट करा:- तुमचे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म Financial Goals काय आहेत याचा नीट विचार करा आणि त्यानूसार सेविंग करा.
नको ते खर्च कमी करा:- सतत नवीन कपडे, मोबाईल फोन, बाहेरच फूड इ. गोष्टी कमी करा. (कधीतरी ठीक आहे पण सारख नको)
सगळ्यात आधी स्वतःला पैसे द्या:- जेव्हा तुमची सॅलरी होईल तेव्हा सगळ्यात आधी त्यातील काही रक्कम ही सेविंग आणि इन्वेस्टिंगसाठी बाजूला ठेवा.
एक गोष्ट लक्षात घ्या की फ्युचरसाठी सेविंग आणि इन्वेस्टिंग करणे यासाठी परफेक्ट टाइमिंग आजच आहे. आज पासून केलेली छोटीशी सेविंग फ्युचरमध्ये तुम्हाला एक आनंदी आणि टेन्शन फ्री लाइफ देऊ शकते त्यामुळे आजच सुरुवात करा.
Keep Saving, Keep Investing!