GOOGLE WALLET: गूगलने त्यांचं डिजिटल वॉलेट ॲप्लिकेशन म्हणजे गूगल वॉलेट ॲप भारतामध्ये लाँच केलं आहे. गूगल वॉलेट वापरकर्त्यांना त्यांची खाजगी माहिती जसे की स्टोअर कार्ड, तिकीट पास, आयडी आणि बरेच काही सुरक्षितपणे एकत्र ठिकाणी ठेवण्यास मदत करते तेही डिजिटल स्वरूपात.
गूगल वॉलेट आणि गूगल पेमध्ये फरक काय आहे? | What is the difference between Google Wallet and Google Pay?
तुम्ही गूगल पे नक्कीच वापरत असाल. आता गूगल पे आणि गूगल वॉलेट यामध्ये फरक असा आहे की, गूगल पे जे एक मनी आणि फायनॅन्स मॅनेज करण्यासाठी वापरल जाणार App आहे. गूगल पेमध्ये तुम्ही एखाद्या व्यतीला पैसे पाठवू शकता किंवा एखाद्या व्यक्तीकडून पैसे Receive करू शकता. यामध्ये तुम्ही तुमच बँक अकाऊंट, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड Add करून कोणत्याही प्रकारच पेमेंट करू शकता.
याउलट गूगल वॉलेट हे डिजिटल स्वरूपात तुमचे कार्ड, पास, टिकिट इ. गोष्टी ठेवण्यासाठी बनवल गेल आहे. जस आपण एखादा पाकीट वापरतो त्यामध्ये पैसे किंवा आपले कार्डस इ. ठेवतो. हेच काम गूगल वॉलेट करेल पण सगळ डिजिटल पद्धतीने.
गूगल वॉलेट कस डाउनलोड कराल? | How to download Google Wallet?
- Google Play Store वर सर्च करा Google Wallet
- App डाउनलोड करा
- जर App चालत नसेल तर तुमच्या फोनवर Google Play Services Update करा.
गूगल वॉलेटचा एक वापर: एक प्रॅक्टिकल उदाहरण
मी दर महिन्याला गावच्या घराच लाइट बिल भरतो. आता प्रत्येक महिन्याला मला लाइट बिलचा फोटो मागवावा लागतो. पण गूगल वॉलेटचा वापर करून मी ते लाइट बिल डिजिटल स्वरूपात Save करून ठेवू शकतो. तुम्ही गूगल वॉलेटवर एखादा फोटो ज्यामध्ये QR कोड असेल, गिफ्ट कार्ड, कुपन, वॉऊचर इ Add करू शकता.
जॉइन टेलीग्राम चॅनल 👉 @marathifinance