Paytm News: भारताच्या Fintech कंपन्यांपैकी एक कंपनी म्हणजे पेटीएम, तिचे फाउंडर विजय शेखर शर्मा यांनी नुकत्याच Bloomberg ला दिलेल्या एक इंटरव्ह्यु सांगितले की, आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून पेमेंट आणि फिनान्शिअल सर्विसेस यामध्ये मोठा बदल आणणार आहोत. पेटीएम आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने वर्कफोर्स म्हणजेच एम्प्लॉयज्ञ कमी करायच्या तयारीत आहे.
पेटीएमने सांगितलं की AI चा वापर केल्याने Repetitive कामे करणे आम्हाला शक्य होत आहे त्यामुळे 10% वर वर्कफोर्स कमी करत आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून 10-15% एवढा एम्पलोयी कॉस्ट आम्ही वाचवू शकतो. असं करून पेटीएम एक प्रॉफिट बनवणारी कंपनी बनण्याच्या तयारीत आहे.
या न्यूजवर मराठी फायनान्सचे मत
आता पेटीएम आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून लोकांना कमी करते करत आहे, याचा अर्थ लोकांच्या नोकऱ्या जाणार. आणि खर बोलू तर ही तर सुरुवात आहे. भविष्यात अजून अशा अनेक कंपन्या करतील. त्यामुळ या सगळ्यासाठी आपण तयार राहायला पाहिजे. असे स्किल शिका जे आर्टिफिशल इंटेलिजन्स करू शकत नाही किंवा तुम्ही जे काही करता त्यात एवढे बेस्ट बना की तुम्हाला कोणी रीप्लेस नाही करू शकत नाही. (हे सगळ खूप सिरियस होत चालय राव)
इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👇
Motisons Jewellers IPO: अलॉटमेंट स्टेटस कसा चेक कराल?
DOMS Industries IPO Allotment Status: कसा आणि कुठे चेक कराल?
1 thought on “Paytm चे विजय शेखर शर्मा म्हणाले “आम्ही AI चा वापर करून 10% वर्कफोर्स कमी करू””