Nova Agritech IPO GMP: ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? प्रॉफिट मिळणार की लॉस?

Nova Agritech IPO GMP in Marathi: नोव्हा अँग्री टेक आयपीओची अलॉटमेंट 29 जानेवारी 2024 ला झाली आहे. ज्यांना हा आयपीओ लागला नाही त्यांना 30 जानेवारी 2024 ला पैसे रिफंड केले जातील.

त्यासोबत ज्यांना हा आयपीओ लागला आहे त्यांना 30 जानेवारी 2024 ला Shares Demat अकाऊंटमध्ये मिळतील. नोव्हा अँग्री टेक आयपीओ 31 जानेवारी 2024 ला स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होणार आहे. आता इन्वेस्टरची नजर या आयपीओच्या ग्रे मार्केट प्रीमियमवर आहे.

Nova Agritech IPO GMP Today

बाजार निरीक्षकांनुसार, नोव्हा अँग्री टेक आयपीओची ग्रे मार्केट प्रिमियम (GMP) आज  24 आहे. मागच्या आठवड्यात GMP 20 होती. याचा अर्थ GMP ₹4 रुपायांनी वाढली आहे.

या IPO ची इश्यू किंमत ₹41 रुपये आहे. याचा अर्थ गुंतवणूकदाराला 65 रुपयांची लिस्टिंग किंमत मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे इन्वेस्टरना जवळजवळ 58% लिस्टिंग गेन मिळण्याची शक्यता आहे.

31 जानेवारी 2024 ला या आयपीओची लिस्टिंग बीएसई आणि एनएसई या दोन्ही स्टॉक एक्स्चेंजवर होणार आहे.

Parameter Amount (in INR)
IPO Price 41
Grey Market Premium 24
Listing Price (IPO + Premium) 65
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 (@marathifinance) 

What is Grey Market Premium 

कोणताही आयपीओ BSE आणि NSE सारख्या मोठ्या स्टॉक एक्स्चेंजवर लिस्ट होण्याआधी Unofficial मार्केटमध्ये त्या आयपीओच्या शेअर्सची खरेदी विक्री होते यालाच ग्रे मार्केट अस म्हणतात.

इथे शेअर्सची खरेदी विक्री ही over-the-counter market स्वरूपात केली जाते याचा अर्थ असा की इथे स्टॉक एक्स्चेंजचा काही संबंध येत नाही. ग्रे मार्केटमधील आयपीओची किंमत ही आयपीओच्या किंमतीपेक्षा वेगळी असू शकते.

ग्रे मार्केट प्रीमियमवरुन एखादा आयपीओ लिस्ट झाला की प्रॉफिट देईल की लॉस याचा अंदाज लावला जातो.

इतर महत्वाच्या पोस्ट वाचा 👉BLS-E Services IPO: अप्लाय करण्याआधी डीटेल माहिती वाचा (marathifinance.net)

Leave a Comment