Mutual Fund SIP: नारायण मूर्ती, एलोन मस्क, जेफ बेजोस, आणि जेन्सन हुआंग यांच्या यशोगाथा एक महत्त्वाचा संदेश देतात – ownership किंवा मालकीची ताकद. हे उद्योजक त्यांच्या कंपन्यांचे 100% मालक नसले तरीही, त्यांच्या equity ownership मुळे ते जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकांमध्ये गणले जातात.
उदाहरणार्थ:
- नारायण मूर्तींकडे Infosys चा 4% हिस्सा आहे.
- एलोन मस्ककडे Tesla चा 20% हिस्सा आहे.
- जेफ बेजोसकडे Amazon चा 9% हिस्सा आहे.
- जेन्सन हुआंगकडे NVIDIA चा 4% हिस्सा आहे.
या यशस्वी उद्योजकांनी दाखवून दिले आहे की ownership हे संपत्ती निर्माण करण्याचे एक प्रभावी साधन आहे. तुम्हीही Mutual Fund SIP च्या माध्यमातून अशी मालकी मिळवू शकता आणि तुमच्या संपत्तीमध्ये दीर्घकालीन वाढ अनुभवू शकता.
तुम्हाला मालक का बनायला हवे?
Ownership म्हणजे व्यवसायाच्या यशात सहभागी होण्याचा एक मार्ग. तुम्ही थेट स्टॉक्स, व्यवसाय, किंवा Mutual Fund SIP च्या माध्यमातून equity own करता तेव्हा, त्या व्यवसायाच्या यशाचा तुम्हालाही फायदा होतो.
जसे की:
- व्यवसाय वाढला की, त्याची किंमत वाढते.
- त्याचा थेट परिणाम equity मालकांवर होतो.
श्रीमंत व्यक्तींनी हे सिद्ध केले आहे की 100% मालकी गरजेची नाही. परंतु तुम्ही मोठ्या मूल्याच्या व्यवसायाचा छोटा हिस्सा देखील ठेवला, तरी दीर्घकालीन फायदा होतो. Mutual Fund SIP हा अशा मालकी मिळवण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
Mutual Fund SIP च्या मदतीने मालक कसे बनायचे?
तुम्ही फक्त ₹500 प्रति महिना गुंतवून Mutual Fund SIP सुरू करू शकता. Infosys, TATA, किंवा Reliance यांसारख्या कंपन्यांचे थेट स्टॉक्स खरेदी करणे शक्य नसेल, तरीही Mutual Fund SIP तुम्हाला अप्रत्यक्ष मालकी मिळवण्याची संधी देते.
- SIP च्या माध्यमातून तुम्ही अनेक मोठ्या कंपन्यांचे स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करू शकता.
- ज्या फंडांमध्ये अशा यशस्वी कंपन्यांचे स्टॉक्स असतात, त्या फंडामध्ये गुंतवणूक करून तुम्ही त्या कंपन्यांचे अप्रत्यक्ष मालक बनता.
एक उदाहरण:
समजा तुम्ही ₹5,000 प्रति महिना Mutual Fund SIP सुरू करता. काही वर्षांतच, ही रक्कम वाढून मोठा पोर्टफोलिओ बनते. Infosys, TATA, आणि Reliance यांसारख्या कंपन्यांच्या यशामुळे, तुमच्या SIP ची किंमत वाढते. Mutual Fund SIP च्या माध्यमातून, तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्थिर व्यवसायांमध्ये हिस्सा मिळवता आणि त्यांच्या यशात भागीदार होता.
- ₹५,००० प्रत्येक महिन्याला
- एका इंडेक्स फंड मध्ये
- २५ वर्षांसाठी
- रिटर्न मिळेल १३% (एवढ पुरेसे आहे)
- २५ वर्षांनंतर ₹1,13,57,175 इतका पैसा मिळेल
- आणि जर प्रत्येक वर्षी या ₹५,००० मध्ये फक्त १०% वाढवली (महागाईला हरवण्यासाठी)
- २५ वर्षांनंतर ₹2,45,66,605 इतका पैसा मिळेल
निष्कर्ष:
Ownership ही संपत्ती निर्माण करण्याची गुरुकिल्ली आहे. श्रीमंत व्यक्तींनी याचा वापर करून प्रचंड यश मिळवले आहे. प्रत्येकासाठी स्वतःचा व्यवसाय उभा करणे शक्य नसले तरी, Mutual Fund SIP हा मालकी मिळवण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.
आजच तुमची Mutual Fund SIP सुरू करा आणि तुमच्या गुंतवणुकीत वेळोवेळी होणारी वाढ अनुभवून पहा. मालकी मिळवा, संपत्ती निर्माण करा, आणि तुमच्या आर्थिक स्वप्नांकडे वाटचाल करा!
ही पोस्ट वाचा: Mutual Fund SIP द्वारे तुम्हाला वेळेच स्वातंत्र्य कस मिळेल?