Groww Nifty Total Market Index Fund (संपूर्ण माहिती)

Groww Mutual Fund ने नुकतंच Groww Nifty Total Market Index Fund सुरू केला आहे.

हा भारतातील पहिला टोटल मार्केट इंडेक्स फंड आहे. आता आपण Nifty आणि Sensex ला कॉपी करणारे फंड तर पाहिले आहेत. आता हे Total Market Index Fund काय नवीन भानगड आहे? आणि हेच आपण आजच्या पोस्टमध्ये नीट समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. 

Groww कधीपासून Mutual Fund विकायला लागली? 

असा प्रश्न मला पडला जेव्हा मी पहिल्यांदा न्यूजवर एकल की Groww आता Mutual Fund च्या बिझनेसमध्ये येणार आहे.

कारण आता पर्यंत Groww कंपनीला आपण एक ब्रोकिंग कंपनी म्हणून ओळखत आलो आहे जिथे तुम्ही तुमचं डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. आणि त्याच्या माध्यमातून विविध कंपन्यांचे शेअर्स आणि Mutual Funds मध्ये पैसे Invest करू शकता. पण हे Mutual Fund बिझनेस कधीपासून करायला लागले. 

याच वर्षी म्हणजे मे २०२३ मध्ये Groww कंपनीने Indiabulls या कंपनीचा Mutual Fund बिझनेस १७५ करोडला विकत घेतला आहे. फक्त कंपनीचे नाव बदलून Groww Mutual Fund अस करण्यात आले आहे. खर तर Groww ने काही नवीन Mutual Fund कंपनी सुरू केली नाहीये,हे आधी लक्षात घ्या.

Nifty Total Market Index काय आहे?

Nifty Total Market Index ला समजून घेण्याआधी तुम्हाला दोन गोष्टी नीट समजून घ्यावा लागतील. 

नंबर १: Nifty म्हणजे काय? 

Nifty 50 ही नॅशनल स्टॉक एकसचेंजची मार्केट इंडेक्स आहे. आता नावावरून समजल असेल की यामध्ये टोटल 50 कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्या भारताच्या टॉप 50 कंपन्या असतात. (Nifty काय आहे ते आपण थोडक्यात समजलो)

(अधिक माहितीसाठी हे वाचा:-सेन्सेक्स आणि निफ्टी काय आहे?)

नंबर २:- Total Market Index कशी बनते? 

यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नक्की किती प्रकारच्या कंपन्यां उपलब्ध आहेत हे समजून घेणे गरजेचं आहे. (यासाठी ही पोस्ट वाचू शकता) पण तरीही मी थोडक्यात समजवतो.  SEBI म्हणजे Securities Exchange Board of India ने मार्केटमधील कंपन्यांना विविध प्रकारच्या कॅटेगरीजमध्ये वाटून दिली आहे जस की, 

  • Large Cap Company – भारताची नंबर १ कंपनी ते भारताची १०० वी कंपनी अशा टोटल १०० कंपन्या या कॅटेगरीमध्ये येतात.
  • Mid Cap Company – भारताची १०१ नंबरची कंपनी ते अगदी २५० वी कंपनी. म्हणजे टोटल १५० कंपन्या या कॅटेगरीमध्ये येतात. 
  • Small Cap Company – भारताची २५१ नंबरची कंपनी ते अगदी ५०० वी कंपनी म्हणजे टोटल २५० कंपन्या या कॅटेगरीमध्ये येतात.
  • Micro Cap Company – आता तुम्हाला समजल असेल ना की याच्या पुढच्या कंपन्या म्हणजे ५०१ ते ७५० कंपनी अशा टोटल २५० कंपन्या या कॅटेगरीमध्ये येतात.

आता या सगळया कॅटेगरीमधील कंपन्यांना एकत्रित करून एक इंडेक्स बनते त्याला Total Market Index अस म्हणतात. आणि या इंडेक्समध्ये भारताच्या टोटल ७५० कंपन्या सामील आहेत. जेव्हा तुम्ही एखाद्या Total Market Index ला कॉपी करण्याऱ्या एखादया फंडमध्ये पैसे Invest करायचे ठरवता तेव्हा तुमचे पैसै थोडे थोडे करून या ७५० कंपन्यांमध्ये केले जातात.

(जर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की कोणती कंपनी नेमकी कोणत्या कॅटेगरीमध्ये सामील होईल हे कसं ठरवलं जात? तर तुम्ही ही पोस्ट नक्की वाचा:- Market Capitalization काय आहे?)

काय तुम्ही Total Market Index Fund मध्ये Invest केलं पाहिजे?

आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला तेव्हाच मिळेल जेव्हा आपण Total Market Index आणि Nifty50 या दोन इंडेक्सची तुलना करून बघू. पण त्या आधी जरा Total Market Index मध्ये असलेल्या टॉप 20 कंपन्यांवर लक्ष द्या. 

Nifty Total Market Index मधील टॉप 20 कंपन्या
(as of 4th Oct 2023)
HDFC Bank 13.73%
Reliance 9.49%
ICICI Bank 7.67%
Infosys 5.98%
ITC Ltd 4.68%
L&T 4.34%
TCS 4.27%
Axis Bank 3.64%
Kotak Bank 2.91%
SBI 2.68%
HUL 2.67%
Airtel 2.52%
Bajaj Finance 2.35%
Mahindra and Mahindra 1.67%
Maruti 1.62%
HCL 1.56%
Sun Pharma 1.48%
Titan 1.41%
NTPC 1.36%
Asian Paints 1.35%
Total % 77.38%

 

जर तुम्ही नीट लक्ष देऊन वरचा टेबल पाहिलात तर तुम्हाला आढळून येइल की या २० कंपन्यांपैकी फक्त १ कंपनी म्हणजे Airtel चा समावेश Nifty 50 या इंडेक्समध्ये होत नाही. आणि जर आपण Airtel ला टोटल % मधून बाजूला केलं तर…

77.38% – 2.52% = 74.86%

म्हणजेच जवळजवळ 75% कंपन्या या Nifty 50 या इंडेक्समध्ये उपलब्ध आहेत.

त्यामुळे तुम्ही फक्त Nifty 50 वाल्या इंडेक्समध्ये पैसे Invest केलेत तर जास्त सोयीचं होईल. कारण पूर्ण Total Market Index मध्ये पैसे Invest करून शेवटी 75% एवढी रक्कम ही टॉप 20 कंपन्यांमध्ये Invest केले जाते. त्यामुळे उगाच 750 कंपन्यांमध्ये तुमचे पैसै Invest करायची काही गरज नाही. 

दोन्ही इंडेक्सच्य 10 वर्षांच्या रिटर्नची तुलना करून बघू. 

आपण दोन्ही इंडेक्सच्या TRI ची म्हणजे Total Return Index ची तुलना केली तर आपल्याला पुढील गोष्ट लक्षात येते.

Nifty 50 असो की Total Market Index, या दोघांचा 10 वर्षांचा रिटर्न जवळजवळ Same आहे. त्यामूळे इंडेक्स फंडच्या नावाखाली उगाच Total Market Index फंड घेण्यात काही अर्थ नाही. कंपनी तुम्हाला सांगेल की तुम्हाला एकाच वेळी 750 कंपन्यांमध्ये Invest करायची संधी मिळेल. पण त्याचा काय फायदा जर रिटर्न तोच येणार आहे.

Groww Market Index Fund मध्ये पैसै Invest करायचे की नाही?

हा फंड ३ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर पर्यंत Subscribtion साठी ओपन राहणार आहे. पण खर बोलू तर या फंडमध्ये पैसै Invest करण्यात काही अर्थ नाही.  तुम्हाला जर इंडेक्स फंड हवा असेल तर Nifty 50 वाला एखादा फंड किंवा Sensex वाला एखादा फंड घ्या. थोडी जास्त रिस्क घेऊ शकतं असाल तर Nifty Next 50 वाला फंड घ्या.


मला खात्री आहे तुम्हाला या पोस्टमधून काहीतरी नवीन शिकायला मिळाल असेल. ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. भेटू आता अजून एक महितीशीर पोस्टमध्ये. Happy Investing!

Information Sources: - www.basunivesh.com, www.economictimes.com 

Leave a Comment