IRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) ने सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना निर्देश दिले आहेत की कोणतीही Insurance Policy कॅन्सल करताना तिची सरेंडर व्हॅल्यू पहिल्या वर्षापासून देण्यात यावी. या निर्णयाने इन्शुरन्स कंपन्यांना नुकसान होण्याची शक्यता आहे पण आपल्या सारख्या सामान्य पॉलिसीहोल्डरचा नक्कीच फायदा होणार आहे.
गूगल न्यूजवर फॉलो करा 👉 @marathifinance
सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय?
जेव्हा आपण एखादी Insurance Policy कॅन्सल करतो तेही पॉलिसी Mature होण्याच्या आधी, तेव्हा दिल्या गेलेल्या रकमेला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात.
गॅरंटीड रिटर्न वाले इन्शुरन्स प्रोडक्ट्स
तुम्ही जर बँकेमध्ये गेलात तर तिथे असे इन्शुरन्स प्रोडक्ट्स विकले जातात जिथे रिटर्न गॅरंटीड असतात. त्यासाठी तुम्हाला ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरावे लागतात. हे प्रीमियम कधीकधी पाच वर्ष किंवा सिंगल प्रीमियम असतात.
नवीन निर्णयानुसार, तुम्ही एखादी नवीन पॉलिसी घेऊन जेव्हा एक वर्ष प्रीमियम भराल आणि नंतर ती पॉलिसी कॅन्सल केलीत तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल.
आणि सगळ्यात महत्वाचं हा नियम गॅरंटीड रिटर्न वाले इन्शुरन्स पॉलिसीसाठी लागू होतो. हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीसाठी नाही. गॅरंटीड रिटर्न वाले इन्शुरन्स प्रोडक्ट्स असे असतात जिथे इन्शुरेंस पण मिळत आणि सोबत इन्वेस्टमेंट पण होतो. त्यामुळे हेल्थ इन्शुरेंस पॉलिसीसोबत याला कन्फ्युज करू नका.
ही पोस्ट वाचा 👉 Health Insurance क्लेमची समस्या? IRDAI चे नवे नियम तुमच्यासाठी फायद्याचे ठरणार!
पण आधीची परिस्थिती वेगळी होती
पूर्वी, जेव्हा तुम्ही गॅरंटीड रिटर्न वाले प्रोडक्ट्स घेत होतात आणि पॉलिसी Mature होण्याच्या आधी कॅन्सल करत होतात, तेव्हा तुम्हाला झिरो सरेंडर व्हॅल्यू किंवा काहीच पैसे मिळत नव्हते. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी कॅन्सल केल्यास तुम्हाला पॉलिसीच्या ३०-३५% एवढीच रक्कम सरेंडर व्हॅल्यू म्हणून मिळत होती.
आता, नवीन नियमानुसार तुम्ही पहिल्या वर्षानंतर जर Insurance Policy कॅन्सल केली तर तुम्हाला सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल. यामुळे अनेक इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रॉफिटवर फरक पडणार आहे. परंतु काही इन्शुरन्स कंपन्यांचे मत आहे की या निर्णयाने फारसा फरक पडणार नाही, कारण बहुतेक लोक एक वर्षाच्या आधी पॉलिसी सरेंडर करत नाहीत.
पॉलिसी होल्डर्सचा माईंडसेट बदलण्याची आवश्यकता
IRDAI ने सांगितले आहे की, पॉलिसी विकताना ती चालू ठेवण्यासाठी पॉलिसीहोल्डरचा माईंडसेट बदलला पाहिजे. यासाठी इन्शुरन्स कंपन्यांनी महत्त्वाची पावले उचलली पाहिजेत आणि चुकीच्या Insurance Policy विकणे बंद केले पाहिजे. कोणतीही पॉलिसी विकताना तिचे फायदे तसेच तोटे स्पष्ट केले पाहिजेत जेणेकरून कस्टमर पॉलिसी बंद करणार नाहीत किंवा प्रीमियम वेळेवर भरतील.
या निर्णयामुळे इन्शुरन्स कंपन्यांचा किती फायदा होईल हे निश्चित नाही, पण सामान्य पॉलिसी होल्डर किंवा कस्टमर यांना याचा नक्कीच फायदा होईल. IRDAI ने गेल्या काही वर्षात अनेक चांगले निर्णय घेतले आहेत जे सामान्य लोकांच्या हिताचे आहेत आणि यासाठी त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे.
ही पोस्ट वाचा 👉 हॉस्पिटल कोणतेही असो, तुमच्या खिशातून बिलाचे पैसे भरायची गरज नाही
FAQs (सतत विचारले जाणारे प्रश्न)
IRDAI ने कोणता नवीन निर्देश दिला आहे?
IRDAI ने निर्देश दिले आहेत की कोणतीही इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल करताना तिची सरेंडर व्हॅल्यू पहिल्या वर्षापासून देण्यात यावी.
सरेंडर व्हॅल्यू म्हणजे काय?
सरेंडर व्हॅल्यू म्हणजे जेव्हा आपण एखादी इन्शुरन्स पॉलिसी कॅन्सल करता, तेव्हा पॉलिसी Mature होण्याच्या आधी मिळणारी रक्कम.
गॅरंटीड रिटर्न वाले इन्शुरन्स प्रोडक्ट्स म्हणजे काय?
हे असे इन्शुरन्स प्रोडक्ट्स आहेत ज्यात तुम्हाला निश्चित रक्कम परत मिळते आणि त्यासाठी ठराविक कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागतो.
नवीन निर्देशानुसार सरेंडर व्हॅल्यू कधीपासून लागू होईल?
नवीन निर्देशानुसार, पॉलिसी घेतल्यानंतर एक वर्षानंतर जर पॉलिसी कॅन्सल केली तर सरेंडर व्हॅल्यू मिळेल.
या निर्देशांपूर्वी सरेंडर व्हॅल्यू कधी मिळायची?
पूर्वी, पॉलिसी Mature होण्याच्या आधी कॅन्सल केल्यास झिरो सरेंडर व्हॅल्यू मिळत होती किंवा कमी रक्कम मिळत होती. दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षी कॅन्सल केल्यास ३०-३५% सरेंडर व्हॅल्यू मिळत होती.
नवीन नियमानुसार इन्शुरन्स कंपन्यांवर काय परिणाम होईल?
नवीन नियमानुसार, पहिल्या वर्षानंतर पॉलिसी कॅन्सल केल्यास सरेंडर व्हॅल्यू दिली जाईल, ज्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांच्या प्रॉफिटवर काहीसा परिणाम होऊ शकतो.
IRDAI ने पॉलिसी होल्डर्सचा माईंडसेट बदलण्याबाबत काय सांगितले आहे?
IRDAI ने सांगितले आहे की पॉलिसी विकताना पॉलिसी होल्डरचा माईंडसेट बदलला पाहिजे, चुकीच्या पॉलिसी विकणे बंद केले पाहिजे, आणि पॉलिसीचे फायदे-तोटे स्पष्ट केले पाहिजेत जेणेकरून पॉलिसी होल्डर पॉलिसी कॅन्सल करणार नाही.
या निर्णयाचा सामान्य कस्टमरवर काय परिणाम होईल?
सामान्य कस्टमरला या निर्णयाचा नक्कीच फायदा होईल कारण त्यांना पॉलिसी कॅन्सल केल्यास पहिल्या वर्षापासून सरेंडर व्हॅल्यू मिळेल.