Share Market मधील काही मुख्य इंडेक्सचा आजचा परफॉर्मेंस खालीलप्रमाणे
[table id=6 /]
आज दिवसभरातील Share Market आणि Business जगतातील काही महत्वाच्या घडामोडी खालीलप्रमाणे
👉 Tata Technologies IPO ची शेअर मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री
Tata Technologies IPO मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवसी IPO 6.55 Times Subscribed झाला आहे.
या पैकी Retail Investor (म्हणजे आपल्यासारखी साधी माणसं) चा भाग जवळजवळ ५.४३ Times Subscribed झाला असून NII म्हणजे Non-institutional Investor चा भाग ११.६९ Times Subscribed झाला आहे. यासोबत QIB म्हणजे Qualified Institutional Buyers चा भाग ४.०८ Times Subscribed झाला आहे.
Tata Technologies IPO २२ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर पर्यंत चालू असेल. IPO ची किंमत ₹४७५-₹५०० रूपये आहे. एका लॉटमध्ये तुम्ही ३० शेअर्स घेऊ शकता ज्याची टोटल किंमत ज्याची किंमत ₹14,250 रूपये असेल. या IPO च्या मदतीने टाटा ग्रुप ₹3042.51 करोड रुपये जमा करायचा हेतू आहे.
Motilal Oswal या रिसर्च कंपनीने Tata Technologies IPO ला विकत घेण्याचा सल्ला दिला आहे.
👉 Mamaearth चा प्रॉफिट डबल होवून ३० करोड एवढा झाला
स्किनकेअर प्रॉडक्ट बनवणारी कंपनी Mamaearth ने सप्टेंबर तिमाही मध्ये ३० करोड प्रॉफिटची नोंद केली आहे. Mamaearth कंपनीचा रेव्हेन्यू २१ टक्के वाढून ₹४९६ करोड एवढा झाला आहे. कंपनी सांगत आहे की FY२४ (Financial Year २०२४) च्या पहिल्या ६ महिन्यात ३३% ने वाढ झाली आहे.
Mamaearth ने नुकताच १८२ करोड चा IPO शेअर मार्केटमध्ये आणला होता. यातील मुख्य भाग हा पुढील 4 वर्षांत केल्या जाणाऱ्या Ads च्या खर्चावर केला जाईल असे कंपनीचं म्हणणे आहे. Mamaearth च्या स्टॉकची सद्याची किंमत BSE वर ₹३५२ आहे.
👉 Air India वर DGCI ने 10 लाखाची पेनल्टी लावली
सगळ्यात आधी हे DGCA कोण आहे? Directorate General of Civil Aviation ही एक सरकारी कंपनी आहे जी Aviation संबंधित कामकाजावर लक्ष ठेवत असते. थोडक्यात सांगायच झाल तरविमाने बनविणाऱ्या किंवा फ्लाईट सर्व्हिस देणाऱ्या कंपन्यांना Regulate करते.
DGCA ने Air India वर ही पेनल्टी यासाठी लावली कारण त्यांनी DGCA काही नियम फॉलो केले नाहीत. जसं की फ्लाईटला उशीर झाल्यास पॅसेंजरना राहण्याची सोय न करणे, कार पार्किंग नाही, फ्लाईट कॅन्सल केल्यास पैसै रिफंड वेळेवर न देणे इ.
#BREAKING@DGCAIndia imposed a financial penalty of Rs 10 lakh on @airindia for not complying with DGCA regulations
This is for the second time that such financial penalty has been levied on Tata Group led Air India
Important: DGCA is also looking in the recent Indigo airline…
— Sameer Dixit (@sameerdixit16) November 22, 2023
👉 IREDA IPO दुसऱ्या दिवशी ४.५६ Times Subscribed करण्यात आला.
IREDA म्हणजेच Indian Renewable Energy Development Agency चा IPO २१ नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर ला हा IPO ४.५६ Times Subscribed केला गेला आहे.
IREDA IPO ची किंमत ₹३० -₹३२ शेअर अशी ठरवली गेली आहे. या IPO च्या मदतीने कंपनी ₹२,१५० करोड रुपये एवढी रक्कम जमा करण्याच्या प्रयत्नात आहे. IREDA IPO विकत घेतांना तुम्ही एका वेळी ४६० शेअर्स खरेदी करू शकता ज्याची टोटल किंमत ₹१४,७२० एवढी होते.
IREDA कंपनी बद्दल सांगायचं झाल तर १९८७ मध्ये या कंपनीची सुरुवात झाली असून ही १००% सरकारी मालकी असलेली कंपनी आहे. IREDA कंपनीच काम हेच आहे की ती विविध Renewable एनर्जी संबधीत प्रोजेक्टसाठी लोन देते. त्या सोबत IREDA आपल्या Clients ना Renewable एनर्जी प्रोजेक्ट संबधी मार्गदर्शन पण करते.
👉 CDSL भारताची पहिली Depository बनली आहे ज्यामध्ये १० करोड ॲक्टिव डिमॅट अकाउंट आहेत.
सगळ्यात आधी हे Depository म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा स्टॉक विकत घेता तेव्हा तो स्टॉक सुरक्षित ठेवायचं काम Depository करतात. Depository ला तुम्ही एक प्रकारचं लॉकर समजु शकता.
भारतामध्ये मुख्य दोन Depositories आहेत त्या म्हणजे CDSL (Central Depositories Services India Ltd.) आणि दुसरं म्हणजे NSDL (National Securities Depository Ltd.)
(जर तुम्ही Zerodha App वापरत असाल तर सेटिंगमध्ये जाऊन नक्की बघा तुमची Depository CDSL असेल)
CDSL becomes the first Indian depository to make a historic mark with 10 crores active demat accounts.
Equity culture is growing in India, and it will further grow exponentially. pic.twitter.com/YHwoWYtcAx
— Neetu Khandelwal (@T_Investor_) November 22, 2023